आपल्या कुटुंबामध्ये प्रथमिकतेची क्रमवारी कशी असायला हवी?

प्रश्नः आपल्या कुटुंबामध्ये प्रथमिकतेची क्रमवारी कशी असायला हवी? उत्तरः पवित्र शास्त्र कौटुंबिक नात्यांमधील प्रथमिकतेसाठी क्रमाक्रमाने अशी क्रमवारी देत नाही. तथापि, आपण वचनामध्ये पाहू शकतो आणि कौटुंबिक नात्यांमधील प्रथमिकतेसाठी सामान्य तत्वे शोधू शकतो. देव निश्चितच प्रथमस्थानी येतो: अनुवाद 6:5, “तु आपला देव ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.” एखाद्या व्यक्तीचे हृदय, प्राण,…

प्रश्नः

आपल्या कुटुंबामध्ये प्रथमिकतेची क्रमवारी कशी असायला हवी?

उत्तरः

पवित्र शास्त्र कौटुंबिक नात्यांमधील प्रथमिकतेसाठी क्रमाक्रमाने अशी क्रमवारी देत नाही. तथापि, आपण वचनामध्ये पाहू शकतो आणि कौटुंबिक नात्यांमधील प्रथमिकतेसाठी सामान्य तत्वे शोधू शकतो. देव निश्चितच प्रथमस्थानी येतो: अनुवाद 6:5, “तु आपला देव ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.” एखाद्या व्यक्तीचे हृदय, प्राण, आणि शक्ती या सर्वांनी मिळून त्या व्यक्तीने देवावर प्रेम करण्यासाठी देवाला प्रथम प्राथमिकता बनवण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे.

जर तुमचे लग्न झाले असेल, तर तुमचा जोडीदार त्याच्या नंतर येतो. लग्न झालेल्या पुरुषाने जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केले तसे त्याने त्याच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे (इफिस 5:25). देवाच्या आज्ञेचे पालन आणि त्याला गौरव दिल्यानंतर ख्रिस्ताची पहिली प्राथमिकता मंडळी होती. हे उदाहरण आहे ज्याचे अनुसरण पतीने केले पाहिजे: प्रथम देव, नंतर त्याची पत्नी. त्याच्यप्रकारे, पत्नींनी “जसे त्या देवाच्या अधीन असतात” तसे त्यांच्या पतीच्या अधीन असले पाहिजे (इफिस 5:22). तत्व हे आहे की, स्त्रीसाठी तिच्या प्रथमिकतेमध्ये तिचा पती देवानंतर दुसऱ्या स्थानावर असायला पाहिजे.

आपल्या प्रथमिकतेमध्ये जर पती आणि पत्नी देवानंतर दुसऱ्या स्थानवर आहेत, आणि ज्याअर्थी पती आणि पत्नी हे एकदेह आहेत (इफिस 5:31), तर मग हे कारण आहे की, लग्नाच्या नात्याचा परिणाम—मुले—ही त्याच्यानंतरची प्राथमिकता असली पाहिजे. पालकांनी देवभक्तीची आवड असेल अशी मुलांची वाढ करायची आहे ती अशा लोकांची पुढची पिढी असेल जी देवावर त्यांच्या संपूर्ण अंतःकरणाने प्रेम करेल (नीतीसुत्रे 22:6; इफिस 6:4), आणि हे दाखवून देईल की, देव प्रथमस्थानी येतो. इतर सर्व कौटुंबिक नात्यामध्ये याला प्रतिबिंबित केले पाहिजे.

अनुवाद 5:16 आपल्याला आपल्या आईवडिलांचा आदर करण्यास सांगते, जेणेकरून आपण दिर्घायु होऊ आणि जेणेकरून गोष्टी आपल्याबाबतीत चांगल्या घडतील. वयाच्या मर्यादेचा कोणताही उल्लेख केलेला नाही, जो आपल्याला यावर विश्वास करण्याकडे नेतो की, जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहेत, तोपर्यंत आपण त्यांचा आदर केला पाहिजे. निश्चितच, एकदा का मुल प्रौढावस्थेत पोचले, की मग त्याने त्यांच्या आज्ञांचे पालन करणे अत्यंत आवश्यक नाही (“मुलांनो, तुमच्या आईवडिलांच्या आज्ञांचे पालन करा….”), परंतु त्यांचा आदर करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, प्रथमिकतेच्या क्रमवारीमध्ये देव, आपला जोडीदार, आणि आपली मुले यानंतर पालक येतात. पालकांच्यानंतर एखाद्याच्या कुटुंबातील बाकीचे राहिलेले येतात (1 तीमथ्या 5:8).

एखाद्याच्या विस्तृत कुटुंबाच्या प्रथमिकतेच्या यादीमध्ये त्यानंतर सहविश्वासी येतात. रोम 14 आपल्याला सांगते की, आपल्या भावाचा न्याय करू किंवा त्याला तुच्छ मानू नको (व.10) किंवा असे काही करू नको ज्याने सह ख्रिती व्यक्तीला “अडथळा” होईल किंवा तो अत्मिकदृष्ट्या पाडेल. 1 करिंथच्या पुस्तकातील बराचसा भाग मंडळीने ऐक्यामध्ये, एकमेकांवर प्रेम करत कसे राहिले पाहिजे या पौलाच्या सूचनांचा आहे. आपल्या ख्रिस्तामधील बंधुंसाठी इतर बोध संदर्भित करतात की, “प्रीतीने एकमेकांचे दास व्हा” (गलती 5:13); “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे” (इफिस 4:32); “एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उन्नती करा” (1 थेस्सलनी 5:11), आणि “आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास एकमेकांकडे लक्ष देऊ” (इब्री 10:24). शेवटी, उरलेले सर्व जग येते (मत्तय 28:19), ज्याला आपण सुवार्ता सांगितली आणि ख्रिस्ताचे शिष्य बनवले पाहिजे.

शेवटी, प्रथमिकतेचा आत्मिक क्रम देव, जोडीदार, मुले, पालक, वस्तृत कुटुंब, ख्रिस्तामधील बंधू आणि भगिनी, आणि नंतर उर्वरित जग असा आहे. जरी काहीवेळेस एखाद्या व्यक्ती पेक्षा दुसऱ्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करून निर्णय घेतला पाहिजे, तरी आपल्या कोणत्याही नात्याकडे दुर्लक्ष करण्याचे आपले ध्येय नाही. पवित्रशास्त्रीय समतोल आपल्या कुटुंबाच्या आतील आणि बाहेर असणाऱ्या सर्व नात्यातील प्रथमिकतेला पूर्ण करण्यास आपल्याला समर्थी बनवण्यास देवाला परवानगी देतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

आपल्या कुटुंबामध्ये प्रथमिकतेची क्रमवारी कशी असायला हवी?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.