आपल्या पैश्यांचा व्यवहार करण्याविषयी बायबल काय म्हणते?

प्रश्नः आपल्या पैश्यांचा व्यवहार करण्याविषयी बायबल काय म्हणते? उत्तरः पैश्याच्या व्यवस्थापनाविषयी बायबलला बरेच काही म्हणावयाचे आहे. उसने घेण्यासंबंधी, बायबल सामान्यतः त्याविरूद्ध सल्ला देते. पाहा नीतिसूत्रे 6:1-5; 20:16; 22:7, 26-27: (“धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो…. हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यांतला तू होऊ नको. तुजजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे…

प्रश्नः

आपल्या पैश्यांचा व्यवहार करण्याविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः

पैश्याच्या व्यवस्थापनाविषयी बायबलला बरेच काही म्हणावयाचे आहे. उसने घेण्यासंबंधी, बायबल सामान्यतः त्याविरूद्ध सल्ला देते. पाहा नीतिसूत्रे 6:1-5; 20:16; 22:7, 26-27: (“धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो…. हातावर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यांतला तू होऊ नको. तुजजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण काढून तो नेईल”). वारंवार बायबल धनसंचय करण्याविरुद्ध ताकीद देते आणि प्रोत्साहन देते की त्याऐवजी आपण आध्यात्मिक संपत्तीच्या शोधात असावे. नीतिसूत्रे 28:20: “स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादांची रेलचेल होते; पण जो धनवान होण्याची उतावळी करितो त्याला शिक्षा झाल्यावाचून राहत नाही.” नीतिसूत्रे 10:15; 11:4; 19:11; 23:5 पाहा.

नीतिसूत्रे 6:6-11 ही वचने आळशीपणाविरुद्ध आणि त्याद्वारे उत्पन्न आर्थिक हानीसंबंधाने बुद्धी देऊ करतात. आम्हास कष्टाळू मुंगीचा विचार करावयास सांगण्यात आले आहे जी स्वतःसाठी अन्न साठवावयास श्रम करते. हा परिच्छेद काहीतरी लाभास्पद कार्य करण्याऐवजी झोपा काढण्याविरुद्ध ताकीद देतो. “आळशी” म्हणजे कामचुकार, सुस्त व्यक्ती आहे जो काम करण्याऐवजी विश्रांती घेतो त्याचा शेवट निश्चित आहे — दारिद्र्य आणि तुटवडा. दुसरीकडे असा व्यक्ती आहे ज्याला पैसा कमविण्याचे वेड लागले आहे. असा व्यक्ती, उपदेशक 5:10 नुसार, भरपूर पैसा मिळाल्यावरही कधीच सन्तुष्ट होत नाही आणि सतत आणखी प्रात करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. तीमथ्याला 1 ले पत्र 6:6-11 या वचनांत सुद्धा संपत्तीची इच्छा धरण्याच्या पाशाविरुद्ध ताकीद देण्यात आली आहे.

स्वतःसाठी संपत्तीचा संचय करण्याच्या इच्छेऐवजी, बायबलचा नमूना आहे घेण्यापेक्षा, देणे बरे. “हे ध्यानांत घ्या की: जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच मानाने कापणी करील; प्रत्येकाने आपआपल्या मनांत ठरविल्याप्रमाणे द्यावे दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो” (करिंथकरांस 2 रे पत्र 9:6-7). आम्हाला हे प्रोत्साहन देखील देण्यात आले आहे की जे काही देवाने आम्हाला दिले आहे त्याचे उत्तम कारभारी आम्ही बनावे. लूक 16:1-13 मध्ये, येशूने खालच्या स्तरावरील कारभारीपणाविरुद्ध ताकीद देण्यासाठी अप्रामाणिक कारभार्याचा दाखला सांगितला. गोष्टीचा सारांश हा आहे की “ह्यास्तव तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल?” (वचन 11). आम्हास आमच्या घराण्याची तरतूद करण्याची जबाबदारी देखील आहे, जसे तीमथ्याला 1 ले पत्र 5:8 हे वचन आम्हाला स्मरण करून देते: “जर कोणी स्वकीयांची विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाÚया माणसापेक्षा वाईट आहे.”

सारांश म्हणजे, पैश्यांचा प्रबंध करण्याविषयी बायबल काय म्हणते? उत्तराचा सारांश एका शब्दांत सांगता येईल — बुद्धी. आम्ही आपल्या पैश्याबाबत बुद्धिमत्तेने वागले पाहिजे. आम्ही आपला पैसा वाचविला पाहिजे, पण त्याचा संग्रह करता कामा नये. आम्ही पैसा खर्च करावा, परंतु विवेकबुद्धीने आणि संयम राखून. आम्ही प्रभुला परत दिले पाहिजे, आनंदाने व त्यागभावनेने. आम्ही इतरांची मदत करण्यासाठी आपल्या पैश्यांचा उपयोग केला पाहिजे., परंतु विवेकबुद्धीने व देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने. धनवान होणे चुकीचे नाही, पण पैश्याचा मोह धरणे चुकीचे आहे. गरीब होणे चुकीचे नाही, पण क्षुल्लक बाबींवर पैसा उधळणे चूक आहे. पैश्याचे व्यवस्थापन शहाणपणाने करावे हा बायबलचा सुसंगत संदेश आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

आपल्या पैश्यांचा व्यवहार करण्याविषयी बायबल काय म्हणते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.