एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागु शकते काय?

प्रश्नः एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागु शकते काय? उत्तरः एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागू शकते कि नाही, हे पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही परंतू पवित्र शास्त्रातील त्या संबंधिचे सत्ये स्पष्ट करतात की ख्रिस्ती व्यक्तीला भुत लागू शकत नाही. भूतानी पछाडणे आणि भुताने त्रास देणे व प्रभाव पाडणे यात एक फार मोठा फरक आहे. भूत…

प्रश्नः

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागु शकते काय?

उत्तरः

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागू शकते कि नाही, हे पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही परंतू पवित्र शास्त्रातील त्या संबंधिचे सत्ये स्पष्ट करतात की ख्रिस्ती व्यक्तीला भुत लागू शकत नाही. भूतानी पछाडणे आणि भुताने त्रास देणे व प्रभाव पाडणे यात एक फार मोठा फरक आहे. भूत लागणे किवा भूत बाधा होणे ह्या मध्ये भुताने एखाद्या व्यक्तीचा सरळ आणि पूर्णपणे ताबा घेणे होय (मत्तय 17: 14-18; लूक 4: 33-35; 8: 27-33). भुताने केलेले अत्याचार किवा पाडलेला प्रभाव ह्यामध्ये भूतानी मनुष्यावर अध्यात्मिक हल्ला करणे किवा व्यक्तीला त्याच्या पापी जीवनास प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. लक्षात घ्या की संपूर्ण नवीन करारात अध्यात्मिक युद्धांचा परिपाठ करताना, आस्तीकांमधून (भूत म्हणजे 6: 10-18) भूत काढण्याच्या कोणत्याही सूचना नाहीत.त्याऐवजी विश्वासणार्यांना सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्याला बाहेर पळवून लावण्यास सांगितले जाते (याकोब 4: 7; 1 पेत्र 5: 8-9),

ख्रिस्ती लोकांमध्ये पवित्र आत्मा वास करतो. (रोमकरास पत्र 8: 9 -11; 1 करिंथ 3:16; 6: 1 9). नक्कीच पवित्र आत्मा भूतांना एखाद्या व्यक्ती मध्ये राहू देणार नाही जेथे तो स्वतः राहत आहे. ह्याचा आम्ही विचारही करू शकत नाही आणि हे अशक्य आहे की देव ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेल्या आपल्या एका मुलाला, (1 पेत्र 1: 18-19) ज्याला त्याने नवीन सृष्टी केले आहे (2 करिंथ 5:17) त्याच्यामध्ये भुताला राहण्याची परवानगी देऊ शकतो. एक विश्वासू म्हणून, आम्ही सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांबरोबर युद्ध करतो, परंतु आपल्या आतून नाही. प्रेषित योहान घोषित करतो की, “मुलानो,तुम्ही देवाचे आहा आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळविला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. ” (1 योहान 4: 4). आपल्यात कोण आहे? पवित्र आत्मा. जगात कोण आहे? सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना त्यामुळे विश्वासनाऱ्याने भूतांच्या जगावर मात केली आहे आणि विश्वासनाऱ्यावर भुतांनी दावा करावा हे अशास्त्रोक्त असून असला दावा शास्त्रीय पद्धतीने करता येत नाही.

भक्कम अशा शास्त्रोक्त पुराव्यानुसार ख्रिस्ती व्यक्ती भूतग्रस्त होवू शकत नाही. काही बायबल शिक्षक भूतग्रस्त हा शब्द ख्रिस्ती व्यक्तीवर भुताने घेतलेले नियंत्रण ह्या साठी वापरतात काहींनी असा युक्तिवाद केला की एखादा ख्रिस्ती व्यक्ती भूतग्रस्त होवू शकत नाही परंतू त्याला भूतबाधा होवू शकते. तात्विकरित्या भूतग्रस्त आणि भूतबाधा होणे ह्या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच होतो, आणि म्हणून शब्द बदलण्यामुळे सत्य बदलू शकत नाही. सत्य हे आहे की, भुते ख्रिस्ती व्यक्तीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा त्याचे पालन करू शकत नाही हे बदलत नाही. सैतानी प्रभाव आणि दडपशाही ही ख्रिस्ती लोकांसाठी वास्तविकता आहेत, यात काही शंका नाही, परंतु,एखादा ख्रिस्ती व्यक्ती भूतग्रस्त होणे किवा त्याला भूतबाधा होणे हे पवित्र शास्त्राप्रमाणे असे म्हटले जाऊ नये की एका ख्रिस्ती व्यक्तीला भूत बाधा झाली किवा तो भूतग्रस्त झाला.

“निश्चितपणे” भूतग्रस्त ह्या संकल्पनेच्या मागे बहुतेक कारण म्हणजे असे ख्रिस्ती लोक जे वैयक्तिक अनुभव दर्शवणारे आहेत जे एखाद्या भूताने नियंत्रित केले जाण्याचे पुरावे देतात. हे अतिशय महत्वाचे आहे की, आपण वैयक्तिक अनुभवामुळे शास्त्रवचनांना अर्थ लावण्यावर आपल्या अनुभवाचा परिणाम होऊ देत नाही. त्या ऐवजी, आपण पवित्र शास्त्रातील सत्याद्वारे आपल्या वैयक्तिक अनुभवाची छाननी करणे आवश्यक आहे (2 तीमथ्य 3: 16-17). ज्याला आम्ही भूतबाधा झाल्याचे दाखवण्याच्या, आणि तश्या वागणुकीचे प्रदर्शन करणारा ख्रिस्ती असल्याचा विचार करीत असतो त्यावरून आपली विचारधारा बदलता कामा नये तर आपण त्याची / तिच्या विश्वासाच्या सत्यतेवर प्रश्न निर्माण करू शकतो. त्या मुळे एखादी ख्रिस्ती व्यक्ती भूतांद्वारे सातावल्या जाऊ शकते किवा ती व्यक्ति काहीतरी गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असू शकते. पण अनुभवाची सांगड देवाच्या वचनासोबत झाली पाहिजे,तेव्हाच निर्णय घेता येवू शकेल.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला भूत लागु शकते काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.