ख्रिश्चन अपोलोजेटीक्स काय आहे?

प्रश्नः ख्रिश्चन अपोलोजेटीक्स काय आहे? उत्तरः भाषेतील “अपोलोजी” हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा मूळ अर्थ “बचाव करणे” असा आहे. ख्रिश्चन अपोलोजेटीक्स हे ख्रिस्ती विश्वासाचे संरक्षण करण्याचे शास्त्र आहे. असे अनेक संशयवादी आहेत जे देवाच्या अस्तित्वावर शंका घेतात आणि/किंव्हा पवित्र शास्त्राच्या देवावरील विश्वासावर आक्रमण करतात. पुष्कळ समालोचक आहेत जे पवित्र शास्त्राच्या प्रेरणेवर आणि अचूकतेवर…

प्रश्नः

ख्रिश्चन अपोलोजेटीक्स काय आहे?

उत्तरः

भाषेतील “अपोलोजी” हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे ज्याचा मूळ अर्थ “बचाव करणे” असा आहे. ख्रिश्चन अपोलोजेटीक्स हे ख्रिस्ती विश्वासाचे संरक्षण करण्याचे शास्त्र आहे. असे अनेक संशयवादी आहेत जे देवाच्या अस्तित्वावर शंका घेतात आणि/किंव्हा पवित्र शास्त्राच्या देवावरील विश्वासावर आक्रमण करतात. पुष्कळ समालोचक आहेत जे पवित्र शास्त्राच्या प्रेरणेवर आणि अचूकतेवर आक्रमण करतात. असे पुष्कळ खोटे शिक्षक आहेत जे खोट्या शिकवणींना प्रोत्साहन देतात आणि ख्रिस्ती विश्वासाचे महत्त्वपूर्ण सत्य नाकारतात. अशा चळवळींचा सामना करणे आणि त्याऐवजी ख्रिस्ती देव आणि ख्रिस्ती सत्याला प्रोत्साहन देणे हे ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चे काम आहे.

साधारणता ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चे मुख्य वचन 1पेत्राचे पत्र 3:15 आहे, तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या …” ख्रिस्ती लोकांनी आपल्या विश्वासाचे रक्षण करण्यास सर्वस्वी असमर्थता दर्शविण्यास कोणतीही कारणे चालणार नाहीत. हरएक ख्रिस्ती व्यक्ती त्याच्या किंवा तिच्या विश्वासाच्या वाजवी कारणाचे सादरीकरण करण्यास सक्षम असला पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ख्रिश्चन अपोलोजेटीक्स मध्ये तज्ञ असलाच पाहिजे असे नाही. तथापि, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला तो काय विश्वास करतो, तो का विश्वास करतो, ते इतरांसोबत कसे सांगावे, आणि असत्यापासून आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून त्याचे संरक्षण कसे करावे याविषयी माहित असणे आवश्यक आहे.

ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चा दुसरा पैलू ज्याकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते ते म्हणजे 1 पेत्राचे पत्र 3:15 च्या उत्तरार्धातील उत्तरार्ध, “तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या …” अपोलोजेटीक्स च्या द्वारे ख्रिस्ती विश्वासाचे संरक्षण करत असताना त्यामध्ये कधीही उद्धटपणा, राग किंवा अनादरपणा यांचा समावेश असू नये. ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चा वापर करत असताना आपण आपल्या बचावात मजबूत राहण्याचे आणि त्याचबरोबर आपल्या सादरीकरणात ख्रिस्ताच्या स्वभावासारखे असण्याचे गाढ प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर आपण वादविवाद जिंकला पण एखाद्या व्यक्तीला आपल्या वृत्तीने ख्रिस्तापासून आणखी दूर केले तर आपण ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चा खरा हेतू गमावला आहे.

ख्रिश्चन अपोलोजेटीक्स च्या दोन प्राथमिक पद्धती आहेत. पहिली पद्धत, क्लासिक अपोलोजेटीक्स म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये ख्रिस्ती संदेश सत्य असल्याचे पुरावे दिले जातात. दुसरी पद्धत, प्रीसपोजीशनल अपोलोजेटीक्स म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये ख्रिस्ती-विरोधी पदाच्या मागे असलेल्या प्रीसपोजिशन्स (पूर्वकल्पित कल्पना, गृहितके) यांचा सामना करणे समाविष्ट आहे. कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे याची ख्रिश्चन अपॉलोजेटिक्सच्या दोन पद्धतींचे समर्थन करणारे लोक बहुतेकदा चर्चा करतात. व्यक्ती आणि परिस्थितीनुसार दोन्ही पद्धती वापरणे हे खूप अधिक फायद्याचे असल्याचे दिसते.

ख्रिश्चन अपोलोजेटीक्स हे फक्त असहमत असणाऱ्या लोकांसाठी विश्वासाची आणि सत्याची वाजवी बचाव सादर करते. ख्रिश्चन अपोलोजेटीक्स ही ख्रिस्ती जीवनाची एक आवश्यक बाजू आहे. आपणा सर्वांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आणि आपल्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी सर्वदा तयार व सुसज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे (मत्तय 28:18-20; 1 पेत्राचे पत्र 3:15). हाच ख्रिश्चन अपोलोजेटीक्स चा सार आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिश्चन अपोलोजेटीक्स काय आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.