ख्रिस्ताचे न्यायासन म्हणजे काय?

प्रश्नः ख्रिस्ताचे न्यायासन म्हणजे काय? उत्तरः रोमकरांस पत्र 14:10-12 म्हणते, “कारण आपण सर्व देवाच्या न्यायासमोर उभे राहणार नाही… तर मग, आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवास हिशेब देईल.” करिंथकरांस 2 रे पत्र 5:10 आम्हास सांगते, “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते…

प्रश्नः

ख्रिस्ताचे न्यायासन म्हणजे काय?

उत्तरः

रोमकरांस पत्र 14:10-12 म्हणते, “कारण आपण सर्व देवाच्या न्यायासमोर उभे राहणार नाही… तर मग, आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवास हिशेब देईल.” करिंथकरांस 2 रे पत्र 5:10 आम्हास सांगते, “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो.” संदर्भात, हे स्पष्ट आहे की दोन्ही वचने ख्रिस्ती विश्वासणार्यांचा उल्लेख करीत आहेत, विश्वास न धरणार्यांचा नाही. म्हणून, ख्रिस्ताच्या न्यायासनात, अशा विश्वासणार्यांचा सहभाग आहे ज्यांस ख्रिस्ताला त्यांच्या जीवनाचा लेखा द्यावयाचा आहे. ख्रिस्ताचे न्यायासन तारण ठरवीत नाही; ते आमच्यावतीने ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे (योहानाचे 1 ले पत्र 2:2) आणि त्याच्यावरील आमच्या विश्वासाद्वारे (योहान 3:16) ठरविण्यात आले होते. आमच्या सर्व पापांची क्षमा करण्यात आली आहे, आणि आम्हास त्यांच्यासाठी कधीही दंडाज्ञा होणार नाही (रोमकरांस पत्र 8:1). आम्हास ख्रिस्ताच्या राजासनाकडे या दृष्टीने पाहाता कामा नये की देव आमच्या पापांच्या न्याय करील, तर देव आम्हास आमच्या जीवनांसाठी प्रतिफळ देईल. होय, जसे बायबल म्हणते त्याप्रमाणे, आम्हाला स्वतःचा हिशेब द्यावा लागेल. ह्याचा एक भाग अवश्य हा आहे की आम्हाला आम्ही केलेल्या पापांसाठी जाब द्यावा लागेल. तथापि, ख्रिस्ताच्या न्यायासनाचा मुख्य जोर त्या गोष्टीवर नसणार.

ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर, विश्वासणार्यांनी किती विश्वासूपणे ख्रिस्ताची सेवा केली या आधारे प्रतिफळ दिले जाईल (करिंथकरांस 1 ले पत्र 9:4-27; तीमथ्याला 2 रे पत्र 2:5). आमचा ज्यावर न्याय केला जाईल त्यापैकी काही गोष्टी असतील आम्ही मोठ्या आज्ञेचे पालन किती चांगल्याप्रकारे केले (मत्तय 28:18-20), पापावर आम्ही किती विजय मिळविला (रोमकरांस पत्र 6:1-4), आणि आम्ही आपल्या जीभेवर किती नियंत्रण ठेविले (याकोबाचे पत्र 3:1-9). बायबल सांगते की विश्वासणार्यांस त्यांनी किती विश्वासूपणे सेवा केली या आधारे वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुगूट दिला जाईल (करिंथकरांस 1 ले पत्र 9:4 -27; तीमथ्याला 2 रे पत्र 2:5).

वेगवेगळ्या मुकुटांचे वर्णन तीमथ्याला 2 रे पत्र 2:5, तीमथ्याला 2 रे पत्र 4:8, याकोबाचे पत्र 1:12, पेत्राचे 1 ले पत्र 5:4 आणि प्रकटीकरण 2:10 या वचनांत करण्यात आलेले आहे, याकोबाचे पत्र 1:12 या गोष्टीचा उत्तम सारांश आहे की आम्ही ख्रिस्ताच्या न्यायासनाविषयी कसा विचार केला पाहिजे : “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्याना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.”

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ताचे न्यायासन म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.