ख्रिस्ती आत्मिकता म्हणजे काय?

प्रश्नः ख्रिस्ती आत्मिकता म्हणजे काय? उत्तरः जेंव्हा आपण नव्याने जन्मतो, आपल्याला पवित्र आत्मा मिळतो जो आपल्याला मुक्तीच्या दिवसासाठी मुद्रित करतो (इफिसकरांस पत्र 1:13; 4:30). येशूने अभिवचन दिले की पवित्र आत्मा आपल्याला मार्ग दाखवून “सर्व सत्यात नेईल” (योहान 16:13). त्या सत्याचा भाग म्हणजे देवाच्या गोष्टी घेऊन त्यांना आपल्या जीवनात लागू करणे. जेंव्हा त्याला आपण लागू करतो,…

प्रश्नः

ख्रिस्ती आत्मिकता म्हणजे काय?

उत्तरः

जेंव्हा आपण नव्याने जन्मतो, आपल्याला पवित्र आत्मा मिळतो जो आपल्याला मुक्तीच्या दिवसासाठी मुद्रित करतो (इफिसकरांस पत्र 1:13; 4:30). येशूने अभिवचन दिले की पवित्र आत्मा आपल्याला मार्ग दाखवून “सर्व सत्यात नेईल” (योहान 16:13). त्या सत्याचा भाग म्हणजे देवाच्या गोष्टी घेऊन त्यांना आपल्या जीवनात लागू करणे. जेंव्हा त्याला आपण लागू करतो, तेंव्हा विश्वासू पवित्र आत्म्याला त्याचे/तिचे जीवन नियंत्रित करण्याची अनुमती देण्याचा निर्णय घेतो. नव्याने जन्मलेला विश्वासी पवित्र आत्म्याला किती प्रमाणापर्यंत त्याच्या जीवनावर नियंत्रण करण्याची आणि त्याचे मार्गदर्शन करण्याची परवानगी देतो यावर खरी ख्रिस्ती आत्मिकता अवलंबून आहे.

प्रेषित पौलाने विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यास सांगितले आहे. “द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा” (इफिसकरांस पत्र 5:18). या परिच्छेदातील काळ हा निरंतर असा आहे आणि म्हणून याचा अर्थ “आत्म्याने परिपूर्ण होत राहा” असा होतो. आत्म्याने परिपूर्ण होत राहणे म्हणजे स्वतःच्या दैहिक स्वभावाच्या इच्छांना समर्पित होण्यापेक्षा पवित्र आत्म्याला आपल्यावर नियंत्रण करण्याची परवानगी देणे. या परिच्छेदामध्ये पौल तुलना करत आहे. जेंव्हा एखादा द्राक्षरसाने मस्त होतो, तो झिंगलेला असतो आणि तो त्याच्या वागण्यातून अस्पष्ट आवाज (भाषा), अस्थिर चाल, आणि कमजोर निर्णय क्षमता सारखे विशिष्ठ स्वभाव वृत्ती दाखवतो. जसे एखादा व्यक्ती पिलेला आहे हे आपण तो ज्या स्वभाव वृत्ती दाखवतो त्यावरून सांगू शकतो, त्याचप्रमाणे नव्याने जन्मलेला विश्वासू ज्याला पवित्र आत्मा नियंत्रित करतो, तो त्याच्या स्वभाव वृत्ती दाखवतो. आपल्याला या स्वभाव वृत्ती गलतीकरांस पत्र 5:22-23 मध्ये पहावयास मिळतअसून तेथे त्यांना “आत्म्याचे फळ” असे संबोधले आहे. ही खरी ख्रिस्ती आत्मिकता आहे, जिला पवित्र आत्म्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्याद्वारे कार्य करून निर्माण केले जाते. ही स्वभाव वृत्ती स्वतःच्या परिश्रमांनी निर्माण केली जाऊ शकत नाही. एक नव्याने जन्मलेला विश्वासी ज्यावर पवित्र आत्म्याचे नियंत्रण आहे तो स्पष्ट आवाज, एक सारखी आत्मिक चाल, आणि देवाच्या वचनांवर आधारित निर्णय प्रदर्शित करेल.

म्हणून, ख्रिस्ती आत्मिकतेमध्ये आपल्या जीवनात पवित्र आत्म्याच्या सेवेला समर्पित करून प्रभू येशू ख्रीस्ताबरोबरच्या दररोजच्या संबंधामध्ये त्याला “जाणून घेणे आणि त्यामध्ये वाढणे” या निवडीचा समावेश होतो. याचा अर्थ असा आहे की, एक विश्वासू म्हणून आपण पवित्र आत्म्याबरोबर स्वीकार करण्याद्वारे आपला संवाद चालू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतो (1योहान 1:9). जेंव्हा आपण पाप करून पवित्र आत्म्याला खिन्न करतो (इफिसकरांस पत्र 4:30; 1 योहान 1: 5-8), आपण आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक अडथळा निर्माण करतो. जेंव्हा आपण आत्म्याला समर्पण करतो, तेंव्हा आपला संबंध खंडित होत नाही (1 थेस्सलनीकाकरांस पत्र 5:19). ख्रिस्ती आत्मिकता ही दैहिकता आणि पाप यांनी खंडित न होता ख्रिस्ताच्या आत्म्याबरोबरच्या सहभागीतेची जाणीव आहे. जेंव्हा एक नव्याने जन्मलेला विश्वासू सतत आणि वारंवार पवित्र आत्म्याच्या सेवेला समर्पित होण्याची निवड करतो तेंव्हा ख्रिस्ती आत्मिकता विकसित होते.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती आत्मिकता म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.