ख्रिस्ती मनन म्हणजे काय?

प्रश्नः ख्रिस्ती मनन म्हणजे काय? उत्तरः स्तोत्रसंहिता 19:14 सांगते, “हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनाचे विचार तुला मान्य असोत.” तर, मग ख्रिस्ती मनन म्हणजे काय, आणि ख्रिस्ती लोकांनी कसे मनन केले पाहिजे? दुर्दैवाने, “मनन” हा शब्द काहीतरी रहस्यमय गोष्टींवर भाष्य करू शकतो. काहींसाठी, मनन हे असामान्य स्थितीत बसून मन…

प्रश्नः

ख्रिस्ती मनन म्हणजे काय?

उत्तरः

स्तोत्रसंहिता 19:14 सांगते, “हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनाचे विचार तुला मान्य असोत.” तर, मग ख्रिस्ती मनन म्हणजे काय, आणि ख्रिस्ती लोकांनी कसे मनन केले पाहिजे? दुर्दैवाने, “मनन” हा शब्द काहीतरी रहस्यमय गोष्टींवर भाष्य करू शकतो. काहींसाठी, मनन हे असामान्य स्थितीत बसून मन साफ करणे आहे. काहींसाठी, मनन हे आपल्या सभोवताली असणाऱ्या आत्मिक जगाशी संवाद साधने आहे. यासारख्या संकल्पना निश्चितपणे ख्रिस्ती मननाची वैशिष्ठे नाहीत.

ख्रिस्ती मननाचे त्या प्रथांशी काही घेणेदेणे नाही ज्यांचा पाया पूर्वी प्रदेशातील गूढवाद आहे. अशा पद्धतींमध्ये लेक्तिओ डीविना, अलौकिक मनन, आणि चिंतनशील प्रार्थनेच्या अनेक प्रकारांचा समावेश होतो. त्यांचे मूळ हा धोकादायक आधार आहे की, आपल्याला त्याच्या वचनांद्वारे नाही तर मनन करण्याद्वारे, व्ययक्तिक प्रकटीकरणाद्वारे “देवाचा आवाज” ऐकण्याची गरज आहे. काही मंडळ्या अशा लोकांनी भरलेल्या आहेत जे असा विचार करतात की ते “देवापासून ऐकतात,” आणि बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात बोलतात आणि म्हणून ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अविनाशी विभागणी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. ख्रिस्ती लोकांनी देवाच्या वचनांचा त्याग करू नये, जो “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रालेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा मनुष्य पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा” (2 तीमथ्या 3:16-17). जर पवित्र शास्त्र हे प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्याला सुसज्ज करण्यास पूर्णपणे पुरेसे आहे, तर मग आपण असा कसा विचार करू शकतो की आपल्याला त्याऐवजी रहस्यमय अनुभवाची किंवा त्यामध्ये भर घालण्याची गरज आहे?

ख्रिस्ती मनन हे पूर्णपणे देवाचे वचन आणि ते त्याबद्दल काय प्रकट करते हे आहे. दाविदाला हे असे आढळले, आणि त्याने त्याचे वर्णन “जो मनुष्य परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो “धन्य” (स्तोत्रसंहिता 1:2) असे केले आहे. खरे ख्रिस्ती मनन ही एक सक्रीय विचार प्रक्रिया आहे, ज्याद्वारे आपण स्वतःला वचनाच्या अभ्यासासाठी देतो, त्याबद्दल प्रार्थना करतो, आणि आत्म्याद्वारे आपल्याला समजावून सांगण्यासाठी देवाला विनंती करतो, ज्याने आपल्याला “सर्व सत्यात” नेण्याचे वचन दिले आहे (योहान 16:13). जेंव्हा आपण दररोजची कामे करत असतो, तेंव्हा आपण या सत्याला आचरणात आणून स्वतःला वचनांसाठी जीवनाचे नियम आणि सराव असे समर्पित करतो. आपण देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे शिकविल्यामुळे या बाबी आत्मिक वाढ आणि देवाच्या गोष्टींमध्ये परिपक्व होण्यास कारणीभूत ठरतात.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती मनन म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.