ख्रिस्ती लोकांनी सैन्यात दाखल होण्याविषयी बायबल काय म्हणते?

प्रश्नः ख्रिस्ती लोकांनी सैन्यात दाखल होण्याविषयी बायबल काय म्हणते? उत्तरः बायबलमध्ये सैन्यात सेवा करण्याविषयी बरीच माहिती समाविष्ट आहे. बायबलमध्ये सैन्याचे अनेक उल्लेख केवळ तुलना आहेत, तर अनेक वचने प्रत्यक्षपणे ह्या प्रश्नास उद्देशून आहेत. बायबल निश्चितपणे असे सांगत नाही की एखाद्या व्यक्तीने सैन्यात सेवा करावी की करू नये. त्याचवेळी, ख्रिस्ती लोग याविषयी आश्वस्त राहू शकतात की…

प्रश्नः

ख्रिस्ती लोकांनी सैन्यात दाखल होण्याविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः

बायबलमध्ये सैन्यात सेवा करण्याविषयी बरीच माहिती समाविष्ट आहे. बायबलमध्ये सैन्याचे अनेक उल्लेख केवळ तुलना आहेत, तर अनेक वचने प्रत्यक्षपणे ह्या प्रश्नास उद्देशून आहेत. बायबल निश्चितपणे असे सांगत नाही की एखाद्या व्यक्तीने सैन्यात सेवा करावी की करू नये. त्याचवेळी, ख्रिस्ती लोग याविषयी आश्वस्त राहू शकतात की सैनिक होने की पवित्र शास्त्रात मोठ्या मानाची गोष्ट आहे आणि आपण हे जाणू शकतो की अशी सेवा बायबलच्या विश्वदृष्टीस सुसंगत आहे.

सैन्य सेवेचे पहिले उदाहरण जुन्या करारात आढळून येते (उत्पत्ती 14), जेव्हा अब्राहामाचा पुतण्या लोट याला कदार्लागोमर, एलामचा राजा आणि त्याच्या मित्रांनी पकडून नेले. आपल्या घराण्यातील 318 प्रशिक्षित पुरुषांस घेऊन अब्राहाम लोटाच्या मदतीस धावून गेला आणि त्याने एलामींचा पराजय केला. येथे आपण शस्त्रसज्ज सैन्यास उत्तम कार्यात गुंतलेले पाहतो — निरपराध व्यक्तीस सोडविणे आणि त्याचे रक्षण करणे. इस्राएल राष्ट्राच्या इतिहासात, त्या राष्ट्राने उभे सैन्य तयार केले. देव दैवीय योद्धा होता आणि त्यांच्या सैन्यबळावाचून तो आपल्या लोकांचे रक्षण करील ह्या कारणास्तव सैन्य उभे करण्याबाबत इस्राएल दिरंगाई करीत असावा. इस्राएलमध्ये नियमित मजबूत सैन्य निर्माण केवळ शौल, दावीद, आणि शलमोनाद्वारे बलवान, केंद्रीभूत, राज्यसंस्थेच्या विकासानंतर घडले. स्थायी लष्कर उभारणारा पहिला व्यक्ती शौल होता (1 शमुवेल 13:2; 24:2; 26:2).

जे शौलाने सुरू केले, ते दाविदाने पुढे वाढविले. त्यांने सैन्य वाढविले, केवळ त्याच्याप्रत एकनिष्ठ असलेल्या लोकांचे सैन्य त्याने इतर प्रांतांतून उसने घेतले (2 शमुवेल 15:19-22) आणि त्याच्या सैन्याचे प्रत्यक्ष नेतृत्व मुख्य सेनापती, योआब याच्या हाती सोपविले. दाविदाच्या कारकीर्दीत, इस्राएल त्याच्या आक्रामक सैन्यधोरणांत अधिक आक्रमणशील झाले, अम्मोनासारख्या शेजारच्या क्षेत्रास त्याने आपल्या मुलूखात समावून घेतले (2 शमुवेल 11:1; 1 इतिहास 20:1-3). दाविदाने 24,000 पुरुषांच्या बारा गटांसोबत सैन्यात परिवर्तन करण्याची पद्धत स्थापन केली जे प्रतिमासी सेवेस हजर होत (1 इतिहास 27). शलमोनाच्या राज्यात जरी शांतता होती, तरीही त्याने सैन्याचा विस्तार केला, रथ आणि राऊत यांचा संग्रह केला (1 राजे 10:26). ख्रि. पू. 586 मध्ये इस्राएलचे (यहूदा) राजकीय अस्तित्व संपुष्टांत येईपर्यंत, हे सैन्यबळ वाढत गेले (शलमोन राजाच्या मृत्यूनंतर विभाजित राज्य झाल्यावरही).

नव्या करारात, जेव्हा रोमी शताधिपती (शंभर सैनिकांवरील अधिकारी) येशूजवळ आला तेव्हा येशूला आश्चर्य वाटले . येशूप्रत शताधिपतीची प्रतिक्रिया अधिकाराबाबतची त्याची स्पष्ट समज दाखविते, तसेच येशूवरील त्याचा विश्वास (मत्तय 8:5-13). येशूने त्याच्या व्यवसायाचा निषेध केला नाही. नव्या करारातील अनेक शताधिपतींची ख्रिस्ती, देवभिरू, आणि चरित्रवान पुरुष म्हणून वाखाणणी करण्यात आली आहे (मत्तय 8:5; 27:54; मार्क 15:39-45; लूक 7:2; 23:47; प्रेषितांची कृत्ये 10:1; 21:32; 28:16).

ठिकाणे आणि पदव्या बदलल्या असतील, पण आमचे शस्त्रसैन्य बायबलच्या शताधिपतीप्रमाणे महत्वाचे मानले पाहिजे. सैनिकाच्या पदाचा फार मान होता. उदाहरणार्थ, पौल एपफ्रदीत याचे वर्णन, ख्रिस्ती सहकारी, “सहसैनिक” असे करतो (फिलिप्पैकरांस पत्र 2:25). देवाची शस्त्रे धारण करण्याद्वारे प्रभुमध्ये बलवान होण्याचे वर्णन करण्यासाठी बायबल सेनेशी संबंधित शब्दांचा उपयोग करते (इफिसकरांस पत्र 6:10-20), ज्यात सैनिकाच्या शस्त्रसामुग्रीचा -शिरटोप, ढाल, आणि तलवारीचा समावेश आहे.

होय, बायबल सैन्यात सेवा करण्याच्या विषयास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सम्बोधित करते. चारित्र्य, प्रतिष्ठा आणि सन्मान याद्वारे आपल्या देशाची सेवा करणार्या स्त्रीपुरुषांनी ही खात्री करून घ्यावी की ते करीत असलेल्या नागरी सेवेस आमच्या सार्वभौम परमेश्वर देवाने क्षमा केली आहे आणि त्याचा आदर केला आहे. जे आदराने सैन्यात सेवा करतात ते सन्मान व कृतज्ञतेस पात्र आहेत.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती लोकांनी सैन्यात दाखल होण्याविषयी बायबल काय म्हणते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.