ख्रिस्ती विज्ञान म्हणजे काय?

प्रश्नः ख्रिस्ती विज्ञान म्हणजे काय? उत्तरः ख्रिस्ती विज्ञानाची सुरूवात मेरी बेकर एडी (1821-1910) यांनी केली, ज्यांनी अध्यात्म आणि आरोग्याबद्दल नवीन कल्पना प्रस्थापित केल्या. 1866 मध्ये स्वतः बरे होण्याच्या अनुभवातून प्रेरित होऊन एडी यांनी पवित्रशास्त्र अभ्यास, प्रार्थना आणि उपचारांच्या विविध पद्धतींच्या संशोधनात अनेक वर्षे घालवली. याचा परिणाम जी उपचार पद्धत होती तिला 1879 मध्ये “ख्रिश्चन सायन्स”…

प्रश्नः

ख्रिस्ती विज्ञान म्हणजे काय?

उत्तरः

ख्रिस्ती विज्ञानाची सुरूवात मेरी बेकर एडी (1821-1910) यांनी केली, ज्यांनी अध्यात्म आणि आरोग्याबद्दल नवीन कल्पना प्रस्थापित केल्या. 1866 मध्ये स्वतः बरे होण्याच्या अनुभवातून प्रेरित होऊन एडी यांनी पवित्रशास्त्र अभ्यास, प्रार्थना आणि उपचारांच्या विविध पद्धतींच्या संशोधनात अनेक वर्षे घालवली. याचा परिणाम जी उपचार पद्धत होती तिला 1879 मध्ये “ख्रिश्चन सायन्स” असे संबोधले गेले. त्यांच्या “विज्ञान आणि आरोग्यासह शास्त्रवचनांची गुरुकिल्ली” या पुस्तकाने मन-शरीर-आत्म्याचा संबंध समजून घेण्यास नवे आधार दिले. त्यांनी पुढे जाऊन एक कॉलेज, एक चर्च, एक प्रकाशन उद्योग आणि “द ख्रिश्चन सायन्स मॉनिटर” या नावाचे आदरणीय वृत्तपत्र स्थापन केले. इतर गटांच्या समानतेमुळे, बरेचजण ख्रिस्ती विज्ञान हा एक गैर ख्रिस्ती संप्रदाय असल्याचे मानतात.

ख्रिस्ती विज्ञान शिकवते की देव सर्वांचा माता-पिता पूर्णपणे चांगला आणि पूर्णपणे आध्यात्मिक आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या खऱ्या स्वभावासहित देवाची सर्व सृष्टी ही दैवी निर्दोष आध्यात्मिक उपमा आहे. देवाची निर्मिती चांगली असल्याने रोग, मृत्यू आणि पाप यासारख्या वाईट गोष्टी मूलभूत वास्तवात भाग घेऊ शकत नाहीत. त्याऐवजी, या वाईट गोष्टी देवापासून दूर राहण्याचे परिणाम आहेत. प्रार्थना म्हणजे देवाजवळ जाण्याचा आणि मानवी आजार बरे करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. हे पवित्र शास्त्रापेक्षा वेगळे आहे, जे शिकवते की मनुष्याचा जन्म आदामाचे पतन झाल्यामुळे वारसाने मिळालेल्या पापामध्ये झाला आहे आणि ते पाप आपल्याला देवापासून वेगळे करते. ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाद्वारे देवाच्या वाचवणाऱ्या कृपेशिवाय आपण कधीही शेवटचा आजार म्हणजे पाप यातून बरे होणार नाही.

येशू आपले आध्यात्मिक आजार बरे करतो हे शिकवण्याऐवजी (यशया 53:5 पहा), ख्रिस्ती शास्त्रज्ञांनी येशूच्या सेवेला बरे करण्याचा दृष्टांत म्हणून पाहिले आणि ते असे मानतात की तारणासंदर्भात रोग बरे करण्याचे केंद्रीयत्व दाखवते. ख्रिस्ती शास्त्रज्ञ दररोज देवाची आणि देवाच्या प्रेमाची वास्तविकता जाणण्यासाठी आणि इतरांनी या समजबुद्धीचे सुसंवाद साधण्यासाठी, बरे होणारे परिणाम अनुभवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रार्थना करतात.

बहुतेक ख्रिस्ती शास्त्रज्ञांसाठी, आध्यात्मिक उपचार ही एक प्रभावी निवड आहे आणि परिणामी ते वैद्यकीय उपचारांच्या ऐवजी प्रार्थनेच्या सामर्थ्याकडे वळतात. सरकारी अधिका-यांनी मधून मधून या दृष्टिकोनाला आव्हान दिले आहे, विशेषत: जेंव्हा अशा परिस्थितीत अल्पवयीन मुलांवर वैद्यकीय उपचार रोखले जातात. तथापि, सभासदांचे आरोग्य-काळजीचे निर्णय घेण्याचे चर्चचे कोणतेही धोरण नाही.

ख्रिस्ती विज्ञानाला कोणतेही सेवक नाहीत. त्याऐवजी पवित्रशास्त्र आणि विज्ञान आणि आरोग्य चर्चचा मुख्य धर्मोपदेशक आणि उपदेशक म्हणून काम करतात. पवित्रशास्त्राचे धडे दररोज अभ्यासले जातात आणि प्रत्येक स्थानिक मंडळीच्या दोन निवडलेल्या सदस्यांद्वारे रविवारी मोठ्याने वाचले जातात. ख्रिस्ती विज्ञान चर्च साप्ताहिक साक्ष सभा घेतात, ज्यात मंडळीतील सदस्यांना उपचार आणि पुनर्जन्माचे अनुभव सांगितले जातात.

अस्तित्त्वात असलेल्या सर्व “ख्रिस्ती” संप्रदायापैकी, “ख्रिस्ती विज्ञान” हे सर्वात चुकीचे नाव दिले गेले आहे. ख्रिस्ती विज्ञान हे ख्रिस्ती किंवा विज्ञान या दोन्हींवरही आधारित नाही . ख्रिस्ती विज्ञान त्या सर्व मूल सत्यांना नकार देते जे एका प्रणालीला “ख्रिस्ती” बनवते. ख्रिस्ती विज्ञान, वस्तुतः विज्ञानाला विरोध करीत आहे आणि रहस्यमय नवीन-काळातील अध्यात्माकडे शारीरिक आणि आध्यात्मिक उपचार हा एक मार्ग असल्याचे दर्शवतो. ख्रिस्ती विज्ञान हे ख्रिस्तीविरोधी संप्रदाय म्हणून ओळखले आणि नाकारले जावे .

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती विज्ञान म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.