ख्रिस्ती व्यक्तीने आत्म-सन्मानाकडे कसे पाहिले पाहिजे?

प्रश्नः ख्रिस्ती व्यक्तीने आत्म-सन्मानाकडे कसे पाहिले पाहिजे? उत्तरः बरेच लोक आत्म-सन्मानाची व्याख्या “त्यांच्या कौशल्यांवर, कर्तृत्वावर, स्थितीवर, आर्थिक संसाधनांवर किंवा दिसणे इत्यादींच्या आधारित भावना” म्हणून करतात. या प्रकारच्या आत्मसन्मानामुळे एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र आणि अभिमानी वाटू शकते आणि तो आत्म-उपासनेत व्यस्त होऊ शकते, ज्यामुळे देवाबद्दलची आपली इच्छा कमी होते. याकोबाचे पत्र 4:6 आपल्याला सांगते की “देव गर्विष्ठांना…

प्रश्नः

ख्रिस्ती व्यक्तीने आत्म-सन्मानाकडे कसे पाहिले पाहिजे?

उत्तरः

बरेच लोक आत्म-सन्मानाची व्याख्या “त्यांच्या कौशल्यांवर, कर्तृत्वावर, स्थितीवर, आर्थिक संसाधनांवर किंवा दिसणे इत्यादींच्या आधारित भावना” म्हणून करतात. या प्रकारच्या आत्मसन्मानामुळे एखाद्या व्यक्तीला स्वतंत्र आणि अभिमानी वाटू शकते आणि तो आत्म-उपासनेत व्यस्त होऊ शकते, ज्यामुळे देवाबद्दलची आपली इच्छा कमी होते. याकोबाचे पत्र 4:6 आपल्याला सांगते की “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” जर आपण केवळ आपल्या ऐहिक संसाधनांवर विश्वास ठेवला, तर आपण अपरिहार्यपणे अभिमानावर आधारित मूल्याची भावना ठेवू. येशूने आम्हाला सांगितले कि, “त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा” (लूक 17:10).

याचा अर्थ असा नाही की ख्रिस्ती लोकांमध्ये कमी आत्मसन्मान असावा. याचा अर्थ एवढाच आहे की एक चांगली व्यक्ती असण्याची आपली भावना आपण काय करतो यावर अवलंबून न राहता आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत यावर अवलंबून असावी. आपण त्याच्यासमोर स्वतःला नम्र केले पाहिजे, आणि तो आपला सन्मान करेल. स्तोत्रसंहिता 16:2 आपल्याला आठवण करून देते कि, “मी परमेश्वराला म्हटले, “तूच माझा प्रभू आहेस, तुझ्यापरते मला सुख नाही.”” देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्यासाठी दिलेल्या उच्च किंमतीमुळे आपण मोलवान आहोत हे आपण जाणू शकतो.

एका अर्थाने, कमी आत्म-सन्मान गर्वाच्या उलट आहे. दुसऱ्या अर्थाने, कमी आत्म-सन्मान हा एक प्रकारचा अभिमान आहे. काही लोकांचा आत्म-सन्मान कमी असतो कारण लोकांना त्यांच्याबद्दल वाईट वाटले, त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावे, त्यांचे सांत्वन करावे असे त्यांना वाटते. कमी आत्म-सन्मान ही “माझ्याकडे पहा” ची अभिमानासारखीच घोषणा असू शकते. एकाच गंतव्यस्थानावर जाण्यासाठी फक्त एक वेगळा मार्ग लागतो, म्हणजेच स्व-आत्मसात करणे, स्वत: ची आवड आणि स्वार्थ असा मार्ग होय. त्याऐवजी, आपण निःस्वार्थी, स्वत:साठी मेलेले असून, आणि आपल्याला निर्माण केलेल्या आणि सांभाळणाऱ्या महान देवाकडे आपले सर्व लक्ष वेधले पाहिजे.

पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा देवाने आपल्याला त्याचे स्वतःचे लोक म्हणून विकत घेतले तेव्हा आपल्याला मूल्य दिले (इफिस 1:14). यामुळे, केवळ तोच सन्मानास आणि स्तुतीस पात्र आहे. जेव्हा आपल्याकडे योग्य आत्म-सन्मान असतो, तेव्हा आपल्याला गुलाम बनवणाऱ्या पापामध्ये सामील न होण्याइतके आपण स्वतःचे मोल करतो. आपण स्वतःला नम्रतेने वागवले पाहिजे, इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे (फिलि. 2:3). रोमकरांस पत्र 12:3 आपणास अशी चेतावणी देते हि, “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.”

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती व्यक्तीने आत्म-सन्मानाकडे कसे पाहिले पाहिजे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *