ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थबोध? आमची स्वप्ने देवाकडून आहेत काय?

प्रश्नः ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थबोध? आमची स्वप्ने देवाकडून आहेत काय? उत्तरः ळवजफनमेजपवदेण्वतह ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थ सांगणारी सेवा नाही. आम्ही स्वप्नांचा अर्थ संागत नाही. आमचा दृढ विश्वास आहे की व्यक्तीची स्वप्ने आणि त्यांचा अर्थ ही ती व्यक्ती आणि देव यांच्यातील बाब आहे..भूतकाळात देव कधीकधी लोकांशी स्वप्नात बोलत असे. उदाहरणे आहेत योसेफ, याकोबाचा मुलगा (उत्पत्ति 37:5-10); योसेफ, मरीयेचा…

प्रश्नः

ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थबोध? आमची स्वप्ने देवाकडून आहेत काय?

उत्तरः

ळवजफनमेजपवदेण्वतह ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थ सांगणारी सेवा नाही. आम्ही स्वप्नांचा अर्थ संागत नाही. आमचा दृढ विश्वास आहे की व्यक्तीची स्वप्ने आणि त्यांचा अर्थ ही ती व्यक्ती आणि देव यांच्यातील बाब आहे..भूतकाळात देव कधीकधी लोकांशी स्वप्नात बोलत असे. उदाहरणे आहेत योसेफ, याकोबाचा मुलगा (उत्पत्ति 37:5-10); योसेफ, मरीयेचा पती (मत्तय 2:12-22); शलमोन (1 राजे 3:5-15); आणखी इतर कित्येक (दानिएल 2:1; 7:1; मत्तय 27:19). संदेष्टा योएल याची भविष्यवाणी सुद्धा आहे (योएल 2:28), जिचा उल्लेख प्रेषित पेत्राने प्रेषितांची कृत्ये 2:17 यात केला आहे, ज्यात देव स्वप्नांचा उपयोग करतो असा उल्लेख आहे. अशाप्रकारे जर देवास वाटल्यास, तो स्वप्नांद्वारे बोलू शकतो.

तथापि, आपण हे लक्षात ठेविले पाहिजे की बायबल हे परिपूर्ण आहे, आतापाासून तो सनातनकाळापर्यंत जे काही आम्ही जाणून घेण्याची गरज आहे ती प्रत्येक गोष्ट त्यात प्रकट आहे. याचा अर्थ असा नाही की देव चमत्कार करीत नाही अथवा आज स्वप्नांद्वारे बोलत नाही, पण जे काही देव बोलतो, मग ते स्वप्नांद्वारे, दृष्टांताद्वारे, विचाराद्वारे, अथवा “शांत सौम्य वाणीद्वारे” असो, जे काही त्याने त्याच्या वचनात आधीच सांगितले आहे त्याच्याशी त्याचे पूर्ण सामंजस्य असेल. स्वप्ने पवित्र शास्त्राचा अधिकार बळकावू शकत नाहीत.

जर आपण स्वप्न पाहिले आणि आपणास वाटते की ते कदाचित देवाने आपणास दिले आहे, तर प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाद्वारे त्याचे परीक्षण करा आणि खात्री करून घ्या की पवित्र शास्त्राशी त्याचे स्वरसाम्य आहे. तसे असल्यास, प्रार्थनापूर्वक विचार करा की आपल्या स्वप्नास प्रतिसाद म्हणून आपण काय करावे असे देवास वाटेल (याकोब 1:5). पवित्र शास्त्रात, जेव्हा कधी कोणी देवाकडून स्वप्नाचा अनुभव करीत असे, तेव्हा देव नेहमीच त्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करीत असे, मग प्रत्यक्ष त्या व्यक्तीस असो, स्वर्गदूताद्वारे असो, वा दुसर्या संदेशदात्याद्वारे असो (उत्पत्ति 40:5-11; दानिएल 2:45; 4:19). जेव्हा देव आमच्याशी बोलतो, तेव्हा तो ह्या गोष्टीची खात्री करून घेतो की त्याचा संदेश आम्हाला स्पष्ट समजावा.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती स्वप्नांचा अर्थबोध? आमची स्वप्ने देवाकडून आहेत काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.