गर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

प्रश्नः गर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते? उत्तरः देव ज्या प्रकारच्या गर्वाचा द्वेष करतो (नीतिसूत्रे 8:13) आणि चांगल्या प्रकारे केलेल्या कामाबद्दल आपण ज्या प्रकारचा अभिमान बाळगू शकतो त्यामध्ये फरक आहे किंवा प्रियजनांच्या प्रप्तीवरती आपण ज्या प्रकारचा अभिमान व्यक्त करतो (2 करिंथ 7:4) त्यामध्ये फरक आहे. आत्म-नीतिमत्त्वामुळे किंवा स्वाभिमानामुळे उद्भवणारा गर्हा पाप आहे आणि देव त्याचा तिरस्कार…

प्रश्नः

गर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

उत्तरः

देव ज्या प्रकारच्या गर्वाचा द्वेष करतो (नीतिसूत्रे 8:13) आणि चांगल्या प्रकारे केलेल्या कामाबद्दल आपण ज्या प्रकारचा अभिमान बाळगू शकतो त्यामध्ये फरक आहे किंवा प्रियजनांच्या प्रप्तीवरती आपण ज्या प्रकारचा अभिमान व्यक्त करतो (2 करिंथ 7:4) त्यामध्ये फरक आहे. आत्म-नीतिमत्त्वामुळे किंवा स्वाभिमानामुळे उद्भवणारा गर्हा पाप आहे आणि देव त्याचा तिरस्कार करतो कारण त्याचा शोध घेण्यास हा अडथळा आहे.

स्तोत्रसंहिता 10:4 स्पष्ट करते की गर्विष्ठ लोक स्वतःशी इतके व्यस्त असतात की त्यांचे विचार देवापासून दूर असतात: “त्याच्या गर्वाने दुष्ट त्याचा शोध घेत नाही; त्याच्या सर्व विचारांमध्ये देवासाठी जागा नाही.” अशा प्रकारचे गर्विष्ठ अभिमान हे नम्रतेच्या भावनेच्या विरुद्ध आहे जे देव शोधतो: “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” (मत्तय 5:3). “आत्म्याचे दिन” ते आहेत जे त्यांची संपूर्ण आध्यात्मिक दिवाळखोरी ओळखतात आणि देवाच्या दैवी कृपेला बाजूला ठेवून त्यांची असमर्थता ओळखतात. दुसरीकडे, गर्विष्ठ लोक त्यांच्या अभिमानाने इतके आंधळे झाले आहेत की त्यांना वाटते की त्यांना देवाची गरज नाही किंवा त्याहून वाईट म्हणजे देवाने त्यांना जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे कारण ते त्याच्या स्वीकृतीस पात्र आहेत.

संपूर्ण शास्त्रामध्ये आपल्याला गर्वाच्या परिणामांबद्दल सांगितले जाते. नीतिसूत्रे 16:18-19 आपल्याला सांगते की “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.” सैतानाला गर्वामुळे स्वर्गातून बाहेर फेकण्यात आले (यशया 14:12-15). विश्वाचा योग्य शासक म्हणून स्वतः देवाची जागा घेण्याचा प्रयत्न करण्याचा स्वार्थी धैर्य त्याच्याकडे होता. परंतु देवाच्या अंतिम निर्णयामध्ये सैतानाला नरकात टाकले जाईल. जे लोक देवाच्या विरोधात उठतात त्यांच्यासाठी पुढे आपत्तीशिवाय काहीच नाही (यशया 14:22).

गर्वाने अनेक लोकांना येशू ख्रिस्ताला तारणहारा म्हणून स्वीकारण्यापासून रोखले आहे. पाप कबूल करणे आणि आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आपण अनंतकाळचे जीवन मिळवण्यासाठी काहीही करू शकत नाही हे स्वीकारणे हे अभिमानी लोकांसाठी सतत अडथळा आहे. आपण स्वतःबद्दल बढाई मारू नये; जर आपल्याला बढाई मारायची असेल तर आपण देवाच्या गौरवाची घोषणा केली पाहिजे. आपण स्वतःबद्दल जे बोलतो त्याचा अर्थ देवाच्या कामात काहीच नाही. देव आपल्याबद्दल जे सांगतो तेच फरक पाडते (2 करिंथ 10:18).

गर्व इतका पापी का आहे? गर्व म्हणजे देवाने साध्य केलेल्या गोष्टीचे श्रेय स्वतःला देणे. गर्व म्हणजे जे वैभव केवळ देवाचेच आहे ते घेणे आणि ते स्वतःसाठी ठेवणे. गर्व हा मूलतः आत्मपूजा आहे. देवाने आपल्याला सक्षम केले नसते आणि सांभाळून ठेवले नसते तर या जगात आपण जे काही साध्य करतो ते शक्य झाले नसते. “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (1 करिंथ 4:7). म्हणूनच आपण देवाला गौरव देतो आणि केवळ तोच त्यास पात्र आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

गर्वाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.