जुना करार विरुद्ध नवीन करार – फरक काय आहे?

प्रश्नः जुना करार विरुद्ध नवीन करार – फरक काय आहे? उत्तरः बायबल जरीे एकसंध पुस्तक आहे, तरी जुना करार आणि नवीन करार यांत फरक आहे. अनेक प्रकारे ते पूरक आहेत. जुना करार आधारभूत आहे; नवीन कराराचा पाया देवाकडून पुढील प्रकटीकरणावर बांधला आहे. जुना करार अशी तत्त्वे प्रस्थापित करतो जी नवीन करारातील सत्यतेचे स्पष्टीकरण करतात. जुन्या…

प्रश्नः

जुना करार विरुद्ध नवीन करार – फरक काय आहे?

उत्तरः

बायबल जरीे एकसंध पुस्तक आहे, तरी जुना करार आणि नवीन करार यांत फरक आहे. अनेक प्रकारे ते पूरक आहेत. जुना करार आधारभूत आहे; नवीन कराराचा पाया देवाकडून पुढील प्रकटीकरणावर बांधला आहे. जुना करार अशी तत्त्वे प्रस्थापित करतो जी नवीन करारातील सत्यतेचे स्पष्टीकरण करतात. जुन्या करारात अनेक भविष्यवाण्या आहेत ज्यांची परिपूर्णता नवीन करारात झाली आहे. जुना करार एका ढपझ जातीचा ढपझ इतिहास मांडतो; नवीन करार एका ढपझव्यक्तीवरढपझ लक्ष केन्द्रीत करतो. जुना करार पापाविरुद्ध देवाचा क्रोध दर्शवितो (त्याच्या कृपेच्या ओझरत्या दर्शनासोबत); नवीन करार पापी लोकांवर (त्याच्या क्रोधाच्या ओझरत्या दर्शनासोबत) देवाची कृपा दाखवितो.

जुना करार मशीहाविषयी भविष्यवाणी करतो (यशया 53 पहा), आणि नवीन करार मशीहा कोण आहे हे प्रकट करतो (योहान 4:25 आणि 26). जुना करार देवाचे नियमशास्त्र देण्याची नोंद करतो आणि येशू मशीहाने हे नियमशास्त्र कसे पूर्ण केले ते नवीन करार दाखवतो (मत्तय 5:17; इब्री 10:9). जुन्या करारात, देवाचे व्यवहार मुख्यतः त्याच्या निवडलेल्या लोकांसोबत, यहूद्यांसोबत आहेत, नवीन करारात, देवाचे व्यवहार मुख्यतः त्याच्या चर्चशी आहेत (मत्तय 16:18). जुन्या करारात वचन दिलेले आशीर्वाद (अनुवाद 29:9)) नवीन करारांतर्गत आत्मिक आशीर्वादांसाठी मार्ग देतात (इफिस 1:3).

ख्रिस्ताच्या येण्याशी संबंधित जुन्या कराराच्या भविष्यवाण्या, जरी आश्चर्यकारकपणे तपशीलवार असल्या तरी, त्यात थोडीफार संदिग्धता होती जी नवीन करारात स्पष्ट झालेली आहे. उदाहरणार्थ, संदेष्टा यशया मशीहाच्या मृत्यूविषयी (यशया 53) आणि मशीहाच्या राज्याच्या स्थापनेविषयी बोलला (यशया 26) व त्या दोन घटनांच्या कालक्रमाविषयी कोणतेही संकेत दिले नव्हते – त्याचे दुःख आणि राज्य-निर्माण यांस सहस्राब्दीद्वारे वेगळे केलेले असेल. नवीन करारामध्ये हे स्पष्ट झाले की मशीहाचे ढपझदोनदाढपझ आगमन होईल: पहिल्यांदा तो दुःख सहन करील व मरण पावले (आणि पुन्हा उठेल) आणि दुसर््यांदा तो त्याचे राज्य स्थापित करील.

पवित्र शास्त्रातील देवाचे प्रकटीकरण पुरोगामी असल्यामुळे, नवीन करारामध्ये त्या तत्वांवर मुख्यत्वेकरून लक्ष केन्द्रित करण्यात आले आहे ज्यांचा परिचय जुन्या करारामध्ये करण्यात आला होता. येशू हा खरा मुख्य याजक कसा आहे आणि त्याचे एक बलिदान जे केवळ पूर्वछाया होते, मागील सर्व बलिदानांची जागा कसे घेते हे वर्णन इब्री लोकांच्या पुस्तकात केले आहे. जुन्या कराराचा वल्हांडणाचा कोकरा (एज्रा 6:20) नवीन करारात देवाचा कोकरा बनतो (योहान 1:29). जुना करार नियमशास्त्र देतो. नवीन करार स्पष्ट करतो की नियमशास्त्र मनुष्यांना त्यांची तारणाची गरजा दर्शविण्यासाठी होते आणि कधीही तारणाचे साधन होण्यासाठी योजिलेले नव्हते (रोम 3:19).

जुन्या कराराने आदामासाठी स्वर्ग गमावलेला पाहिला; दुसर्या आदामाद्वारे (ख्रिस्ताने) स्वर्ग कसा परत मिळविला गेला हे नवीन करारात नमूद केले आहे. जुना करार जाहीर करतो की मनुष्य पापाद्वारे देवापासून विभक्त झाला होता (उत्पत्ति 3), आणि नवीन करार घोषणा करतो की मनुष्य परमेश्वरासोबत आपले नाते पुन्हा स्थापन करू शकतो (रोम 3 आणि 6). जुन्या करारात मशीहाच्या जीवनाची भविष्यवाणी होती. शुभवर्तमानात येशूच्या जीवनाची नोंद आहे, आणि पत्रे त्याच्या जीवनाचा अर्थ लावतात आणि त्याने केलेल्या सर्व गोष्टींना आपण कसा प्रतिसाद द्यावा ते सांगतात.

सारांश रूपात, जुना करार ख्रिस्ताच्या येण्याची पायाभरणी करतो जो जगाच्या पापांसाठी स्वतःला बलिदान करणार होता (1 योहान 2:2). नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या सेवेची नोंद आहे आणि त्यानंतर त्याने काय केले आणि आम्ही कसा प्रतिसाद द्यायचा याविषयी लिहिले आहे. दोन्ही करार समान पवित्र, दयाळू आणि नीतिमान देवास प्रकट करतात जो पापास शिक्षा देतो पण प्रायश्चित्ताच्या यज्ञाद्वारे पाप्यांना वाचवू इच्छितो. दोन्ही करारांमध्ये देव स्वतःला आमच्यावर प्रकट करतो आणि विश्वासाद्वारे आपण त्याच्याकडे कसे येऊ शकतो हे दर्शवितो (उत्पत्ति 15:6; इफिस 2:8).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

जुना करार विरुद्ध नवीन करार – फरक काय आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.