जुन्या करारात देवाला पशूबळीची गरज का होती?

प्रश्नः जुन्या करारात देवाला पशूबळीची गरज का होती? उत्तरः पापांची तात्पुरती क्षमा मिळावी आणि येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण आणि पूर्ण बलिदानाचे पूर्वचित्रण करण्यासाठी देवाला प्राण्यांच्या बलिदानाची आवश्यकता होती (लेवीय 4:35, 5:10). पवित्र शास्त्रात पशुंचे बलिदान हा एक महत्वाचा विषय आहे कारण “रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही” (इब्री 9:22). जेव्हा आदाम आणि हव्वेने पाप केले तेव्हा देवाने…

प्रश्नः

जुन्या करारात देवाला पशूबळीची गरज का होती?

उत्तरः

पापांची तात्पुरती क्षमा मिळावी आणि येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण आणि पूर्ण बलिदानाचे पूर्वचित्रण करण्यासाठी देवाला प्राण्यांच्या बलिदानाची आवश्यकता होती (लेवीय 4:35, 5:10). पवित्र शास्त्रात पशुंचे बलिदान हा एक महत्वाचा विषय आहे कारण “रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही” (इब्री 9:22). जेव्हा आदाम आणि हव्वेने पाप केले तेव्हा देवाने त्यांच्यासाठी वस्त्र पुरवण्यासाठी देवाने प्राण्यांना ठार केले (उत्पत्ति 3:21). काईन व हाबेल परमेश्वरासाठी बलिदान घेऊन आले. काईनाचे अर्पण स्वीकारण्यात आले नाही कारण त्याने फळ आणले, तर हाबेलाचे अर्पण स्वीकारण्यात आले कारण तो “कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून” (उत्पत्ति 4:4-5) होता. पूर कमी झाल्यानंतर नोहाने देवाला प्राण्यांचा बळी दिला (उत्पत्ति 8:20-21).

देवाने ठरवून दिलेल्या विशिष्ट पद्धतीनुसार असंख्य बलिदान देण्याची आज्ञा देवाने इस्राएल राष्ट्राला दिली. प्रथम, प्राणी निष्कलंक असावा. दुसरे म्हणजे, बलिदान देणार््या व्यक्तीची त्या प्राण्याबरोबर समानता असणे आवश्यक होते. तिसरे म्हणजे, पशू अर्पण करणाऱ्या व्यक्तीला त्यास मृत्यू द्यावा लागत असे. विश्वासाने केल्यावर, या बलिदानामुळे पापांची क्षमा दिली जात असे. प्रायश्चित्ताच्या दिवशी दुसऱ्या बलिदानाची मागणी केली जात असे, लेवीय वचन 1 मध्ये याचे वर्णन आहे. जे क्षमा आणि पाप काढून टाकल्याचे दाखविते. प्रमुख याजकाने पापार्पणासाठी दोन बकरे घ्यावयाचे होते. एक बकरा इस्राएली लोकांसाठी पापार्पण म्हणून अर्पण केला जात असे (लेवीय 16:15), तर दुसरा बकरा रानात सोडला जात असे (लेवीय 16:20-22) पापार्पणामुळे क्षमा मिळाली तर दुसरा बकरा पाप दूर करीत असे.

तर मग आपण यापुढे पशूंचे बलिदान का देत नाही? पशंूच्या बलिदानांचा अंत झाला आहे कारण येशू ख्रिस्त हा अंतिम आणि परिपूर्ण यज्ञ होता. जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूला पाहिले तेव्हा त्याने येशूला बाप्तिस्मा घेण्यासाठी येताना पाहिले, आणि म्हणाला, “दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!”” (योहान 1:29). आपण स्वतःला विचारत असाल, पशू का? त्यांनी काय चूक केली? हा मुद्दा असा आहे की – पशंूनी कोणतेही पाप केले नाही, म्हणून बलिदान अर्पण करणाऱ्याच्या जागी त्यांचा मृत्यू झाला. येशू ख्रिस्तानेही कोणतेही पाप केले नाही परंतु मानवजातीच्या पापांसाठी त्याने स्वतःला स्वेच्छेने अर्पण म्हणून दिले (1 तीमथ्य 2:6). येशू ख्रिस्ताने आमचे पाप स्वतःवर घेतले आणि तो आमच्या जागी मरण पावला. २ करिंथ 5:21 मध्ये म्हटल्याप्रमाणे, “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.” वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने जे काही साध्य केले त्यावर विश्वास ठेवून आपण क्षमा मिळवू शकतो.

सारांश रूपात, पशूंच्या बलिदानाची आज्ञा देवाने दिली होती जेणेकरून व्यक्तीला पापाची क्षमा मिळावी. पशूने पर्याय किंवा ऐवजदार म्हणून काम केले – म्हणजेच, पापी व्यक्तीच्या जागी तो मरण पावला, परंतु केवळ तात्पुरते, म्हणूनच वारंवार बलिदान करणे आवश्यक होते. येशू ख्रिस्ताबरोबर पशंूचे बलिदान थांबले आहे. येशू नेहमीसाठी बलिदानाचा अंतिम ऐवजदार होता (इब्री 7:27) आणि आता देव आणि मानवांतील एकमेव मध्यस्थ आहे (1 तीमथ्य 2:5). प्राण्यांच्या बलिदानाने आमच्या वतीने ख्रिस्ताच्या बलिदानाचे पूर्वचित्र दिले. प्राण्यांच्या बलिदानामुळे पापांची क्षमा मिळू शकते असा एकमात्र आधार ख्रिस्त आहे जो आपल्या पापांसाठी स्वतःला बलिदान करणार होता आणि पापांची क्षमा देणार होता जे पशूंचे बलिदान केवळ समजावू शकत होते आणि त्याचे पूर्वचित्र देऊ शकत होते.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

जुन्या करारात देवाला पशूबळीची गरज का होती?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.