त्रिनीटेरीनिजम म्हणजे काय? त्रिनीटेरीनिजम पवित्रशास्त्रीय आहे काय?

प्रश्नः त्रिनीटेरीनिजम म्हणजे काय? त्रिनीटेरीनिजम पवित्रशास्त्रीय आहे काय? उत्तरः ट्रीनेटेरीनिजम ही एक अशी शिकवण आहे की देव त्रीएक आहे, त्याने स्वत: ला तीन समान आणि सह-चिरस्थायी व्यक्ती असल्याचे प्रकट केले आहे. त्रीनिती अर्थात ट्रिनीटी च्या विस्तृत पवित्र शास्त्रीय सादरीकरणासाठी, कृपया त्रिनिटी बद्दल पवित्र शास्त्र काय शिकवते याविषयीचा आमचा लेख पहा. ख्रिस्ती जीवन आणि तारण या…

प्रश्नः

त्रिनीटेरीनिजम म्हणजे काय? त्रिनीटेरीनिजम पवित्रशास्त्रीय आहे काय?

उत्तरः

ट्रीनेटेरीनिजम ही एक अशी शिकवण आहे की देव त्रीएक आहे, त्याने स्वत: ला तीन समान आणि सह-चिरस्थायी व्यक्ती असल्याचे प्रकट केले आहे. त्रीनिती अर्थात ट्रिनीटी च्या विस्तृत पवित्र शास्त्रीय सादरीकरणासाठी, कृपया त्रिनिटी बद्दल पवित्र शास्त्र काय शिकवते याविषयीचा आमचा लेख पहा. ख्रिस्ती जीवन आणि तारण या संदर्भात त्रिनीटेरीनिजमच्या महत्त्वविषयी चर्चा करणे आहे हा या लेखाचा उद्देश आहे.

“माझे तारण होण्यासाठी मला त्रीनितीवर विश्वास ठेवावा लागेल काय? बर्‍याचदा असा प्रश्न आपणाला विचारला जातो, याचे उत्तर होय आणि नाही असे आहे. एखाद्या व्यक्तीच्या तारण्यासाठी त्याला ट्रीनेटेरीनिजम चे प्रत्येक घटक पूर्णपणे समजून घेणे आणि त्याच्याशी सहमत असणे आवश्यक आहे काय? याचे उत्तर नाही असे आहे. ट्रीनेटेरीनिजममध्ये असे काही पैलू आहेत काय जे तारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात? याचे उत्तर होय असे आहे. उदाहरणार्थ, तारणाच्या सिद्धांतामध्ये ख्रिस्ताचे दैवत्व अतिशय महत्त्वाची आहे. जर येशू परिपूर्ण नाही तर त्याच्या मृत्यूने पापाचा दंड भरला नसता. जर येशू पवित्र नसता तर तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा (योहान 1:29) झाला नसता. येशूच्या दैवी स्वरूपाचा अपवित्र शास्त्रीय परिणाम हा तारणाचा चुकीचा दृष्टिकोण असा होतो. प्रत्येक “ख्रिस्ती” पंथ जे येशुंच्या दैवियतेला नाकारतात ते हे देखील शिकवतात की आपण आपल्या तारण प्राप्तीसाठी ख्रिस्ताच्या मृत्युमध्ये स्वतःची कामे जोडली पाहिजेत. ख्रिस्ताचे खरे आणि पूर्ण दैवत्व जो ट्रीनेटेरीनिजम चा एक पैलू आहे तो या संकल्पनेचे खंडन करतो.

त्याचबरोबर, आपण हे देखील जाणून आहोत कि खरोखर ख्रिस्तावर ठेवणारे असे पुष्कळ लोक आहेत जी त्रिनीटेरीनिजमचे पूर्णपणे अनुसरण करत नाहीत. जरी आपण प्रकार अर्थात मोडॅलीसम नाकरत असलो तरी तरी देव तीन व्यक्ती नाही तर त्याने स्वतःला तीन प्रकारात अर्थात “मोड्ज” मध्ये प्रकट केले आहे असे मानून एखाद्या व्यक्तीचे तारण होऊ शकते हे आपण नाकारू शकत नाही. त्रीनिती एक असे रहस्य आहे, जे कोणत्याही मर्यादित मनुष्याला अगदी पूर्णपणे समजत नाही. आपण तारण प्राप्त करण्यासाठी येशू ख्रिस्त जो अवतरलेला तारणारा देव त्याच्यावर विश्वास ठेवावा अशी देवाची मागणी आहे. तारण प्राप्त करण्यासाठी देवपरीज्ञान शास्त्राच्या प्रत्येक नियमांचे पालन करण्याची देव मागणी करीत नाही. नाही, तारणासाठी ट्रीनेटेरीनिजमच्या सर्व बाबी संपूर्णपणे समजून घेणे आणि त्यांच्याची सहमत असणे आवश्यक नाही.

आमचा हा ठाम विश्वास आहे कि त्रिएक पंथ अर्थात त्रिनीटेरीनिजम हा पवित्र शास्त्रीय आधारित सिद्धांत आहे. विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनात देव, तारण आणि सध्याच्या जीवनात देवाची सुरू असलेली कामे समजून घेण्यासाठी पवित्र शास्त्रीय त्रिनीटेरीनिजम समजणे आणि त्यावर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आम्ही स्पष्टपणे जाहीर करतो. याच बरोबर, असे काही धार्मिक पुरुष जे ख्रिस्तीचे खरे अनुयायी आहेत ज्यांचे त्रिनीटेरीनिजम च्या बाबींशी मतभेद आहेत. परिपूर्ण सिद्धांतामुळे आपले तारण झाले नाही हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपला अतिउत्कृष्ट परिपूर्ण तारणारा याच्यावर विश्वास ठेवल्याने आपले तारण झाले आहे (योहान 3:16). आपल्या तारणासाठी त्रिनीटेरीनिजमच्या पैलूंवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे काय? याचे उत्तर होय असे आहे. तारणासाठी आपल्याला त्रिनीटेरीनिजमच्या सर्व भागांत पूर्णपणे सहमत असणे आवश्यक आहे काय? याचे उत्तर नाही असे आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

त्रिनीटेरीनिजम म्हणजे काय? त्रिनीटेरीनिजम पवित्रशास्त्रीय आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.