दहा आज्ञा काय आहेत?

प्रश्नः दहा आज्ञा काय आहेत? उत्तरः दहा आज्ञा हे बायबलमधील दहा नियम आहेत जे देवाने इस्राएल राष्ट्रास मिसर देशातून निर्गम झाल्यानंतर लगेच दिले. दहा आज्ञा ह्या मुख्यत्वेकरूप जुन्या करारातील नियमशास्त्रात समाविष्ट 613 आज्ञांचा सारांश आहे. प्रथम चार आज्ञांचा संबंध देवासोबत आमच्या नात्याशी आहे. शेवटच्या सहा आज्ञांचा संबंध एकमेकांसोबत आमच्या नात्याशी आहे. दहा आज्ञा बायबलमध्ये निर्गम…

प्रश्नः

दहा आज्ञा काय आहेत?

उत्तरः

दहा आज्ञा हे बायबलमधील दहा नियम आहेत जे देवाने इस्राएल राष्ट्रास मिसर देशातून निर्गम झाल्यानंतर लगेच दिले. दहा आज्ञा ह्या मुख्यत्वेकरूप जुन्या करारातील नियमशास्त्रात समाविष्ट 613 आज्ञांचा सारांश आहे. प्रथम चार आज्ञांचा संबंध देवासोबत आमच्या नात्याशी आहे. शेवटच्या सहा आज्ञांचा संबंध एकमेकांसोबत आमच्या नात्याशी आहे. दहा आज्ञा बायबलमध्ये निर्गम 20:1-17 आणि अनुवाद 5:6-21 यांत लिहिलेल्या आहेत आणि खालीलप्रमाणे आहेत:

1) “माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत” ही आज्ञा एका खर्या परमेश्वर देवास सोडून इतर कोणत्याही देवाची उपासना करण्याविरुद्ध आहे. इतर सर्व देव खोटी दैवते आहेत.

2) “आपल्यासाठी कोरींव मूर्ति करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर ईष्र्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना तिसर्याचैथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो; आणि जे माझ्यावर प्रेम करीतात व माझ्या आज्ञा पाळितात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करीतो.” ही आज्ञा देवाचे दृश्य प्रतीक, मूर्ती बनविण्याविरुद्ध आहे. आपण अशी कोणतीही प्रतिमा तयार करू शकत नाही जी देवाचे यथार्थ चित्रण करू शकेल. देवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मूर्ती तयार करणे म्हणजे खोट्या दैवताची उपासना करणे होय.

3) “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्यांची तो गय करणार नाही.” ही आज्ञा प्रभुचे नाव व्यर्थ घेण्याविरुद्ध आहे. आपण देवाचे नाव तुच्छ समजता कामा नये. आपण त्याच्या नावाचा उल्लेख फक्त आदरयुक्त भावनेने व सन्मानपूर्वक करण्याद्वारे त्यास आदर दिला पाहिजे.

4) “शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको; तू तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशींच्या आंत असलेला उपरी ह्यांनीही करू नये. कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसांवा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.” ही आज्ञा शब्बाथ (शनिवार, आठवड्याचा शेवटचा दिवस) दिवस प्रभुस समर्पित विश्रांतीचा दिवस म्हणून वेगळा ठेवण्यासाठी आहे.

5) “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे, त्यांत तू चिरकाळ राहशील.” ही आज्ञा सांगते की आपण नेहमी आपल्या आईवडिलांचा मान राखावा, त्यांच्याशी आदरपूर्वक वागावे.

6) “खून करू नको.” ही आज्ञा दुसर्या मानवप्राण्याचा जाणूनबुझून खून करण्याविरुद्ध आहे.

7) “व्यभिचार करू नको.” ही आज्ञा स्वतःच्या पती किंवा पत्नीस सोडून दृसर्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध स्थापन करण्याविरुद्ध आहे.

8) “चोरी करू नको.” ही आज्ञा आपली नसलेली वस्तू, ज्या व्यक्तीची ती आहे तिच्या परवानगीवाचून घेण्याविरुद्ध आहे.

9) “आपल्या शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको.” ही आज्ञा दुसर्या व्यक्तीची खोटी साक्ष देण्याविरुद्ध आहे. ही आज्ञा मुख्यतः खोटे बोलण्याविरुद्ध आहे.

10) “आपल्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजार्याच्या स्त्रीची अभिलाषा करू नको, आपल्या शेजार्याचा दास, दासी, बेल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तु ह्यांचा लोभ करू नको.” जे काही आमचे नाही त्याची इच्छा धरण्याविरुद्ध ही आज्ञा आहे. लोभ वरील यादी दिलेल्या आज्ञांपैकी एका आज्ञेचे उल्लंघन करू शकतो: खून, व्यभिचार, आणि चोरी. जर एखादी गोष्ट करणे चुक असेल, तर ते करण्याची इच्छा धरणे देखील चुकीचे आहे.

अनेक लोक दहा आज्ञांकडे नियमावली म्हणून पाहतात ज्याचे, जर आपण अनुसरण केले तर, आपणास मृत्यूनंतर स्वर्गात प्रवेशाचे आश्वासन आहे. या उलट, दहा आज्ञांचा हेतू लोकांस हे जाणून घेण्यास पात्र करणे होता की ते सिद्धरित्या नियमशास्त्राचे पालन करू शकत नाहीत (रोमकरांस पत्र 7:7-11), आणि म्हणून त्यांना देवाच्या दयेची आणि कृपेची गरज आहे. मत्तय 19:16 मधील श्रीमंत तरूणाने प्रतिपादन केले असले तरीही, कोणीही सिद्धपणे दहा आज्ञांचे पालन करू शकत नाही (उपदेशक 7:20). दहा आज्ञा हे दाखवितात की आम्ही सर्वांनी पाप केले आहे (रोमकरांस पत्र 3:23) आणि म्हणून आम्हाला देवाच्या दयेची आणि कृपेची गरज आहे, जी केवळ येशू ख्रिस्तामधील विश्वासाद्वारे उपलब्ध आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

दहा आज्ञा काय आहेत?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.