देवावरील विश्वास आणि विज्ञान परस्परविरोधी आहेत काय?

प्रश्नः देवावरील विश्वास आणि विज्ञान परस्परविरोधी आहेत काय? उत्तरः विज्ञानाची व्याख्या “घटनेचे निरीक्षण, अभिज्ञान, वर्णन, प्रायोगिक तपास, आणि सैद्धान्तिक स्पष्टीकरण” अशी करण्यात आली आहे. विज्ञान ही एक पद्धत आहे जिचा उपयोग मानवजात नैसर्गिक विश्वाची आणखी समज प्राप्त करण्यासाठी करू शकतो. ते निरीक्षणाद्वारे विज्ञानाचा शोध आहे. विज्ञानातील प्रगती मानव तर्क आणि कल्पना यांचा उच्चांक दाखविते. तथापि,…

प्रश्नः

देवावरील विश्वास आणि विज्ञान परस्परविरोधी आहेत काय?

उत्तरः

विज्ञानाची व्याख्या “घटनेचे निरीक्षण, अभिज्ञान, वर्णन, प्रायोगिक तपास, आणि सैद्धान्तिक स्पष्टीकरण” अशी करण्यात आली आहे. विज्ञान ही एक पद्धत आहे जिचा उपयोग मानवजात नैसर्गिक विश्वाची आणखी समज प्राप्त करण्यासाठी करू शकतो. ते निरीक्षणाद्वारे विज्ञानाचा शोध आहे. विज्ञानातील प्रगती मानव तर्क आणि कल्पना यांचा उच्चांक दाखविते. तथापि, विज्ञानात ख्रिस्ती व्यक्तीचा विश्वास कधीही देवावरील आमच्या विश्वासासमान असता कामा नये. ख्रिस्ती व्यक्ती देवावर विश्वास ठेवू शकतो आणि विज्ञानांबद्दल आदर राखू शकतो, जोवर आम्ही हे लक्षात ठेवतो की कोणते सिद्ध आहे आणि कोणते नाही.

देवावरील आमची श्रद्धा विश्वासाची श्रद्धा आहे. त्याच्या पुत्रावर तारणासाठी आमचा विश्वास आहे, शिक्षणासाठी त्याच्या वचनात आमचा विश्वास आहे, आणि मार्गदर्शनासाठी त्याच्या पवित्र आत्म्याठायी आमचा विश्वास आहे. देवावरील आमचा विश्वास पूर्ण असावा, कारण आम्ही देवावर विश्वास ठेविला आहे, म्हणून आम्ही एका सिद्ध, सर्वसमर्थ, सर्वज्ञ उत्पन्नकत्र्यावर अवलंबून आहोत. विज्ञानावरील आमचा विश्वास बौद्धिक असला पाहिजे आणि त्यापेक्षा अधिक नाही. आम्ही अनेक मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी विज्ञानावर अवलंबून राहू शकतो, पण आपण चुका करण्यासाठी देखील विज्ञानांवर अवलंबून राहू शकतो. जर आपण विज्ञानावर विश्वास ठेवितो, तर आपण असिद्ध, पापमय, मर्यादित, मरणाधीन मनुष्यांवर अवलंबून राहतो. संपूर्ण इतिहासात विज्ञानाने अनेक गोष्टींबाबत चूक केली आहे, जसे पृथ्वीचा आकार, पावर्ड फ्लाईट, लसीकरण, रक्त संक्रामण, आणि प्रजननाच्या बाबतीतही. देव कधी चूक करीत नाही.

सत्याची भीती बाळगण्याचे कारण नाही, म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने चांगल्या विज्ञानाची भीती बाळगण्याचे कारण नाही. देवाने आमच्या विश्वाची कशी रचना केली हे शिकण्याद्वारे सर्व मानवजातीस सृष्टीच्या चमत्काराचे रसग्रहण करण्यात मदत मिळते. आमच्या ज्ञानाचा विस्तार करण्याद्वारे आम्हास रोग, अज्ञान, आणि गैरसमजूतीशी लढण्यात मदत प्राप्त होते. तथापि, जेव्हा विज्ञान आमच्या उत्पन्नकत्र्यावरील विश्वासापेक्षा मानव तर्कबुद्धीत अधिक विश्वास ठेवितो तेव्हा ते धोक्याचे ठरते. हे लोक धर्माबद्दल भक्तीभावना बाळगणार्या कोणत्याही लोकांपेक्षा वेगळे नाहीत; त्यांनी मनुष्यावरील विश्वासाची निवड केली आहे आणि त्या विश्वासाचा बचाव करण्यासाठी ते तथ्याचा शोध घेतील.

तरीही, अत्यंत बुद्धिवादी वैज्ञानिक, जे देवावर विश्वास करण्यास नाकार देतात ते सुद्धा, विश्वाच्या आमच्या समजात पूर्णतेची उणीव असल्याचे कबूल करतात. ते कबूल करतील की विज्ञानाद्वारे देवास अथवा पवित्र शास्त्रास सिद्ध करता येत नाही अथवा नासाबितही करता येत नाही. विज्ञान हे खरोखर एक निष्पक्ष शास्त्र आहे, ते केवळ सत्याचा शोध करते, कोणत्याही विषयाचा उत्कर्ष करीत नाही.

बहुतांश विज्ञान देवाचे अस्तित्व व कार्य याचे समर्थन करते. स्तोत्र 19:1 म्हणते, “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.” आधुनिक विज्ञान ब्रम्हांडाचा अधिक शोध घेते, त्यामुळे आम्हास सृष्टीचा आणखी पुरावा मिळतो. डीएनएची अद्भुत क्लिष्टता आणि प्रतिकरण, भौतिक शास्त्राचे गुंतागुंतीचे आणि अंतःपाशित नियम, येथे पृथ्वीवर परिस्थिती रासायनिकीमधील पूर्ण समरस्य सर्व मिळून बायबलच्या संदेशाचे समर्थन करतात. ख्रिस्ती व्यक्तीने सत्याचा शोध घेणार्‍या विज्ञानाचा स्वीकार करावा, पण “विज्ञानाच्या पुजार्यांचा” नाकार करावा जे परमेश्वर देवापेक्षा मानव ज्ञानास अधिक महत्वाचे स्थान देतात.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

देवावरील विश्वास आणि विज्ञान परस्परविरोधी आहेत काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.