देव पापी व्यक्तीची प्रार्थना ऐकतो का/त्याचे उत्तर देतो का?

प्रश्नः देव पापी व्यक्तीची प्रार्थना ऐकतो का/त्याचे उत्तर देतो का? उत्तरः योहान 9:31 घोषणा करते, “आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.” असेही म्हटले जातेे की “पापी व्यक्तीकडून ऐकलेली एकमेव प्रार्थना म्हणजे तारणाची प्रार्थना होय.“ परिणामी, काही जणांचा असा विश्वास आहे…

प्रश्नः

देव पापी व्यक्तीची प्रार्थना ऐकतो का/त्याचे उत्तर देतो का?

उत्तरः

योहान 9:31 घोषणा करते, “आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.”

असेही म्हटले जातेे की “पापी व्यक्तीकडून ऐकलेली एकमेव प्रार्थना म्हणजे तारणाची प्रार्थना होय.“ परिणामी, काही जणांचा असा विश्वास आहे की देव विश्वास न करणाऱ्याची प्रार्थना ऐकत नाही आणि/किंवा त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर कधीच देत नाही. जरी या संदर्भात, योहान 9:31 असे म्हणते की देव विश्वास न धरणाऱ्याद्वारे चमत्कार करीत नाही. 1 योहान 5:14-15 आपल्याला सांगते की देव या आधारे प्रार्थनांचे उत्तर देतो की त्या प्रार्थना त्याच्या इच्छेनुसार आहेत किंवा नाहीत. हे तत्व, कदाचित, विश्वास न करणाऱ्यासाठी लागू आहे. जर एखादा विश्वास न करणारा ेत्याच्या इच्छेनुसार देवाची प्रार्थना करीत असेल तर देवाला त्याच्या इच्छेनुसार – अशा प्रार्थनेचे उत्तर देण्यापासून काहीही रोखू शकत नाही.

काही शास्त्रवचनांमध्ये असे वर्णन आहे की देव विश्वास न करणाऱ्याच्या प्रार्थना ऐकतो व त्यांचे उत्तर देतो. यापैकी बहुतेक उदाहरणांमध्ये, प्रार्थना सामील होती. एक किंवा दोन उदाहरणांत, देवाने अंतःकरणाच्या आक्रोशाला उत्तर दिले (हे सांगितलेले नाही की तो आक्रोश देवाकडे वळलेला होता की नाही). यापैकी काही उदाहरणांमध्ये, प्रार्थना पश्चात्तापांसह केलेली दिसते. परंतु इतर बाबतीत, प्रार्थना फक्त ऐहिक गरज किंवा आशीर्वादासाठी होती, आणि देवाने दयेस स्मरून किंवा कळकळीचा धावा ऐकून किंवा त्या व्यक्तीच्या विश्वासाला उत्तर दिले होते. येथे त्याच्यावर विश्वास न करणाऱ्या काही लोकांद्वारे केलेल्या प्रार्थनेविषयी काही परिच्छेद आहेत:

निनवेच्या लोकांनी निनवेला वाचवले जावे अशी प्रार्थना केली (योना 3:5-10). देवाने या प्रार्थनेचे उत्तर दिले व त्याने धमकावल्याप्रमाणे निनवे शहराचा नाश केलो नाही.

हागारने देवाला आपल्या मुलाचे, इश्माएलचे संरक्षण करण्याची विनंती केली (उत्पत्ति 21:14-19). देवाने केवळ इश्माएलचे रक्षण केले नाही तर त्याला खूप आशीर्वाद दिला.

1 राजे 21:17-29 मध्ये, विशेषतः 27-29 ंमध्ये अहाबाने उपवास करतो आणि त्याच्या वंशासाठी एलीयाने केलेल्या भविष्यवाणीबद्दल शोक करतो. देव त्याचे उत्तर देतो आणि अहाबाच्या काळात संकटे आणत नाही.

सोर आणि सिदोन भागातील विदेशी स्त्रीने प्रार्थना केली की येशू तिच्या मुलीचे भूत काढीेल (मार्क 7:24-30). येशूने त्या स्त्रीच्या मुलीतून भूत काढले.

प्रेषितांची कृत्ये 10 मधील रोमन सेनाधिकारी कर्नेल्याकडे प्रेषित पेत्राला पाठवण्यात आले कारण कर्नेल्य हा नीतिमान मनुष्य होता. प्रेषितांची कृत्ये 10:2 सांगते की कर्नेल्याने “नियमितपणे देवाची प्रार्थना करीत असे.”

देव अशी अभिवचने देतो जी सर्वांना (तारण पावलेले आणि तारण न पावलेले यांस समान रूपात) लागू आहेत, जसे यिर्मया 29:13: “तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन.” प्रेषितांची कृत्ये 10:1-6 मध्ये कर्नेल्यासाठी हेच होते. पण अशी अनेक आश्वासने आहेत जी परिच्छेदांच्या संदर्भानुसार केवळ ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी आहेत. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यानी येशूला तारणारा म्हणून स्वीकारले आहे म्हणून त्यांना आवश्यकतेच्या वेळी साहाय्य प्राप्त करण्यासाठी कृपेच्या सिंहासनाजवळ येण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे (इब्री लोकांस 4:14-16). आम्हाला सांगितले जाते की जेव्हा आम्ही देवाच्या इच्छेनुसार काही मागतो, तेव्हा तो ते ऐकतो आणि आम्ही मागितलेले आम्हास देतो (1 योहान 5:14-15). ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थनेसंबंधी इतर अनेक अभिवचने आहेत (मत्तय 21:22; योहान 14:13; 15:7). तर, होय, अशी काही उदाहरणे आहेत ज्यात देव त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्याच्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही. त्याच वेळी, त्याच्या कृपेने आणि दयेने, देव त्यांच्या प्रार्थनांना प्रतिसाद म्हणून त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्याच्या जीवनात हस्तक्षेप करू शकतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

देव पापी व्यक्तीची प्रार्थना ऐकतो का/त्याचे उत्तर देतो का?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.