देव प्रत्येकावर प्रेम करतो अथवा केवळ ख्रिस्ती लोकांवर?

प्रश्नः देव प्रत्येकावर प्रेम करतो अथवा केवळ ख्रिस्ती लोकांवर? उत्तरः एक अर्थ आहे ज्यामध्ये देव संपूर्ण जगातील प्रत्येकावर प्रेम करतो (योहान 3:16; 1 योहान 2:29 रोम 5:8). हे प्रेम सशर्त नाही – ते देवाच्या चारित्र्यात रुजले आहे आणि तो प्रेमळ देव आहे यावर आधारित आहे (1 योहान 4:8, 16). देवाचे प्रत्येकावर असलेले प्रेम त्याची “दयाळू…

प्रश्नः

देव प्रत्येकावर प्रेम करतो अथवा केवळ ख्रिस्ती लोकांवर?

उत्तरः

एक अर्थ आहे ज्यामध्ये देव संपूर्ण जगातील प्रत्येकावर प्रेम करतो (योहान 3:16; 1 योहान 2:29 रोम 5:8). हे प्रेम सशर्त नाही – ते देवाच्या चारित्र्यात रुजले आहे आणि तो प्रेमळ देव आहे यावर आधारित आहे (1 योहान 4:8, 16). देवाचे प्रत्येकावर असलेले प्रेम त्याची “दयाळू प्रीती” म्हणून समजता येते कारण याचा परिणाम असा होतो की देव लोकांना त्यांच्या पापांसाठी त्वरित शिक्षा देत नाही (रोम 3:23; 6:23). “आपल्या स्वर्गातील पित्याचे….कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.”(मत्तय 5:45). हे प्रत्येकावरील देवाच्या प्रेमाचे दुसरे उदाहरण आहे – त्याचे दयाळू प्रेम, त्याचे परोपकार केवळ ख्रिस्ती लोकांसाठी नव्हे तर सर्वांसाठी प्रगट केले जातात.

जगावर देवाचे दयामय प्रेम देखील यात दिसून येते ज्यायोगे देव लोकांना पश्चात्ताप करण्याची संधी देतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.’ (2 पेत्र 3:9). देवाचे बिनशर्त प्रेम त्याच्या तारणाच्या सामान्य पाचारणाशी संबंधित आहे आणि ज्यास बहुतेकदा त्याची परवानगी किंवा परिपूर्ण इच्छा म्हटले जाते – देवाच्या इच्छेची ही ती बाजू आहे जी त्याची मनोवृत्ती प्रकट करते आणि त्याला काय आवडते हे ठरवते.

तथापि, प्रत्येकावर देवाचे प्रेम आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजण वाचविला जाईल (मत्तय 25-26). देव पापाकडे दुर्लक्ष करणार नाही, कारण तो न्यायी देव आहे (2 थेस्सल1:6). पाप कायमचे शिक्षेवाचून राहू शकत नाही (रोम 3:25-26). जर देवाने पापांकडे दुर्लक्ष केले आणि त्याने कायमचा सृष्टीमध्ये विनाश ओढवून घेण्यास परवानगी दिली तर ते प्रेम असणार नाही. देवाच्या दयावान प्रीतीकडे दुर्लक्ष करणे, ख्रिस्तास नाकारणे किंवा आम्हासाठी विकत घेतलेल्या तारणास नकार देणे (2 पेत्र 2:1) सदासर्वकाळसाठी देवाच्या क्रोधाच्या अधीन होणे आहे (रोम 1:18), त्याच्या प्रेमाच्या नाही.

पापींना नीतिमान ठरविणारी देवाची प्रीती सर्वांनाच दिली जात नाही, फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाÚ्यांना (रोम 5:1) दिली जाते. देवाची प्रीती जी लोकांना त्याच्याजवळ आणते प्रत्येकास दिली जात नाही, फक्त जे देवाच्या पुत्रावर प्रेम करतात त्यांना (योहान 14:21). या प्रेमाचा देवाचे ”कराराचे प्रेम“ म्हणून विचार केला जाऊ शकतो, आणि हे सशर्त आहे, जे लोक तारणासाठी येशूवर विश्वास ठेवतात त्यांनाच ते दिले जाते (योहान 3:36). जे प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर बिनशर्त, सुरक्षितपणे, कायमचे प्रेम केले जाते.

देव सर्वांवर प्रेम करतो का? होय, तो सर्वांवर दया आणि कृपा दाखवतो. तो ख्रिस्तीतर लोकांपेक्षा ख्रिस्ती लोकांवर अधिक प्रीति करतो का? नाही, त्याच्या दयाळू प्रेमाच्या बाबतीत नाही. देव ख्रिस्तीतर लोकांपेक्षा ख्रिस्ती लोकांवर वेगळ्याप्रकारे प्रीति करतो का? होय; कारण विश्वासणार्यांनी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला आहे, त्यांचे तारण झाले आहे. ख्रिस्ती विश्वासणार्यांशी देवाचे अनन्य नाते आहे ज्यामध्ये केवळ ख्रिस्ती विश्वासणार्यांना देवाच्या शाश्वत कृपेवर आधारित क्षमा लाभली आहे. प्रत्येकासाठी देवाजवळ असलेल्या बिनशर्त, दयाळू प्रेमाने आम्हास विश्वासाकडे आणले पाहिजे, कृतज्ञतेने सशर्त, कराराचे प्रेम त्यांस प्राप्त होते जे येशू ख्रिस्ताला तारणाार म्हणून स्वीकारतात.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

देव प्रत्येकावर प्रेम करतो अथवा केवळ ख्रिस्ती लोकांवर?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.