नश्वरात्मवाद बायबलवर आधारित आहे काय?

प्रश्नः नश्वरात्मवाद बायबलवर आधारित आहे काय? उत्तरः नश्वरात्मवाद अथवा सर्वनाशवाद ही अशी धारणा आहे की विश्वास न धरणारे अधोलोकात यातना भोगत अनंतकाळाचा अनुभव घेणार नाहीत, पण त्याऐवजी मृत्यूनंतर ते “नष्ट होतील.” अनेकांसाठी, अधोलोकात अनंतकाळ घालविण्याच्या कल्पनेच्या भयानकतेमुळे नश्वरात्मवादाची धारणा आकर्षक वाटते. काही परिच्छेद नश्वरात्मवादाच्या पक्षाने वाद घालत असलेली दिसतात, तरीही दुष्टांच्या भवितव्याविषयी बायबल जे काही…

प्रश्नः

नश्वरात्मवाद बायबलवर आधारित आहे काय?

उत्तरः

नश्वरात्मवाद अथवा सर्वनाशवाद ही अशी धारणा आहे की विश्वास न धरणारे अधोलोकात यातना भोगत अनंतकाळाचा अनुभव घेणार नाहीत, पण त्याऐवजी मृत्यूनंतर ते “नष्ट होतील.” अनेकांसाठी, अधोलोकात अनंतकाळ घालविण्याच्या कल्पनेच्या भयानकतेमुळे नश्वरात्मवादाची धारणा आकर्षक वाटते. काही परिच्छेद नश्वरात्मवादाच्या पक्षाने वाद घालत असलेली दिसतात, तरीही दुष्टांच्या भवितव्याविषयी बायबल जे काही म्हणते त्याकडे सर्वसमावेशक दृष्टी टाकली म्हणजे हे सत्य दिसून येते की अधोलोकातील शिक्षा सार्वकालिक आहे. खालीलपैकी एका अथवा अधिक सिद्धांतांसबंधीच्या गैरसमजामुळे नश्वरात्मवादाच्या धारणेचा उदय झाला आहे: 1) पापाचे परिणाम, 2) देवाचा न्याय, 3) अधोलोकाचे अथवा नरकाचे स्वरूप.

अधोलोकाच्या स्वरूपासंबंधाने, नश्वरात्मवादी अग्नीच्या सरोवराचा चुकीचा अर्थ लावतात. स्पष्टपणे, जर मनुष्यप्राण्यास जळत्या लाव्यात टाकण्यात आले, तर ती/तो अगदी लगेच भस्म होईल. तथापि, अग्नीचे सरोवर हे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचे क्षेत्र आहे. केवळ भौतिक शरीर अग्नीच्या सरोवरात टाकले जाणार नाही, तर मनुष्याचा देह, प्राण, आणि आत्मा टाकला जाईल. आध्यात्मिक स्वभाव भौतिक अग्नीने भस्म होऊ शकत नाही. असे दिसून येते की तारण न पावलेले अशा देहासमवेत पुनरूत्थित होतील जो तारण पावलेल्या समान सार्वकालिकतेसाठी तयार केलेला असेल (प्रकटीकरण 20:13; प्रेषितांची कृत्ये 24:15). ही शरीरे सार्वकालिक भवितव्यासाठी तयार केलेली आहेत.

सार्वकालिकता अथवा सनातनकाळ हा दुसरा पैलू आहे जो पूर्णपणे समजून घेण्यास नश्वरात्मवादी चुकतात. नश्वरात्मवादींचे म्हणणे बरोबर आहे की ग्रीक शब्द एओनियन, ज्याचे भाषांतर सामान्यतः “शाश्वत अथवा सनातन,” केले जाते त्याचा अर्थ व्याख्येनुसार “सार्वकालिक” नाही. तो विशिष्टरित्या “युगाचा” अथवा “एओनचा”, विशिष्ट कालावधीचा उल्लेख करतो. तथापि, हे स्पष्ट आहे की नव्या करारात, कधी कधी एओनियनचा उपयोग समयाच्या सार्वकालिक अवधीचा उल्लेख करण्यासाठी केला गेला आहे. प्रकटीकरण 20:10 सैतान, पशु, आणि खोटा संदेष्टा अग्नीच्या सरोवरात टाकले जातील असा उल्लेख करते आणि तेथे त्यांस “रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.” हे स्पष्ट आहे की हे तिघे अग्नीच्या सरोवरात टाकल्यानंतर “नष्ट होणार” नाहीत. तारण न पावलेल्यांचे भवितव्य वेगळे का असेल (प्रकटीकरण 20:14-15)? अधोलोकाच्या सार्वकालिक स्वरूपाचा सर्वात खात्रीलायक पुरावा आहे मत्तय 25:46, “‘ते (तारण न पावलेले) तर सार्वकालिक’ शिक्षा भोगावयास जातील; आणि नीतिमान् ‘सार्वकालिक जीवन उपभोगावयास’ जातील.” ह्या वचनात, दुष्टाच्या आणि नीतिमानाच्या भवितव्याचा उल्लेख करण्यासाठी तोच ग्रीक शब्द वापरलेला आहे. जर दुष्टांस केवळ “एका युगासाठी” पीडा भोगावयाची असेल, तर नीतिमान स्वर्गातील जीवनाचा अनुभव फक्त एका “युगासाठी” घेतील. जर विश्वासणारे सदाकाळ स्वर्गात राहतील, तर विश्वास न धरणारे अधोलोकात सर्वकाळ राहतील.

नश्वरात्मवाद्यांद्वारे अधोलोकात शाश्वतकाळ घालविण्याबाबत सतत जो दुसरा आक्षेप घेतला जातो तो हा आहे की विश्वास न धरणार्यास मर्यादित पापासाठी अधोलोकात सर्वकाळ घालविण्याची शिक्षा देणे देवास अन्यायाचे ठरेल. जो व्यक्ती 70 वर्षांचे जीवन, पापमय जीवन जगला त्याला/तिला उचलून, सर्वकाळसाठी शिक्षा देणे देवास कसे न्याय्य ठरू शकते? उत्तर हे आहे की आमच्या पापाचा परिणाम सार्वकालिक आहे कारण ते सनातन देवाविरुद्ध घडलेले आहे. जेव्हा राजा दावीदाने व्यभिचाराचे आणि खूनाचे पाप केले तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे” (स्तोत्र 51:4). दाविदाने बथशेबा आणि उरीया यांच्याविरुद्ध पाप केले होते: दावीद कसा दावा करू शकत होता की त्याने केवळ देवाविरुद्ध पाप केले? दावीद हे समजला होता की सर्व पाप हे शेवटी देवाविरुद्ध आहे. देव सनातन आणि अनंत आहे. परिणामतः, त्याच्याविरुद्ध केलेले सर्व पाप सार्वकालिक शिक्षेस पात्र आहे. आपण किती काळपर्यंत प्रार्थना करतो ही बाब नाही, तर ही देवाच्या चारित्र्याची बाब आहे ज्याच्याविरुद्ध आपण पाप करतो.

नश्वरात्मवादाचा आणखी एक व्यक्तिगत पैलू ही कल्पना आहे की जर आम्हाला हे माहीत असते की आमचे काही प्रियजन अधोलोकात सार्वकालिक यातना भोगत आहेत तर आम्हाला स्वर्गात आनंदित राहणे शक्य होणार नाही. तथापि, जेव्हा आम्ही स्वर्गात जाऊ तेव्हा आमच्याजवळ तक्रार करण्यासाठी अथवा दुःखी होण्यासाठी काहीच नसेल. प्रकटीकरण 21:4 आम्हास सांगते, “तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” जरी आमचे प्रियजन स्वर्गात नसतील, तरी आपण या गोष्टीशी 100 टक्के सहमत असू की त्यांचे स्थान ते नाही आणि येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्यांनी स्वतः नाकार केल्यामुळे त्यांस दंडाज्ञा झाली आहे (योहान 3:16; 14:6). हे समजणे कठीण आहे, पण आपण त्यांच्या उपस्थितीच्या उणीवेमुळे दुःखी होणार नाही. आमचे लक्ष या गोष्टीवर असता कामा नये की तेथे आमच्या प्रियजनांवाचून आम्ही स्वर्गात कसा आनंद अनुभवू, तर या गोष्टीवर असले पाहिजे की आपण आपल्या प्रियजनांस ख्रिस्तामधील विश्वासाप्रत कसा मार्ग दाखवू शकतो यासाठी की त्यांनी तेथे असावे.

कदाचित अधोलोक हे प्राथमिक कारण असेल ज्यासाठी देवाने आमच्या पापांचा दंड सहावयासाठी येशूस पाठविले. मृत्यूनंतर “नाहीसे होणे” यात भिण्यासारखी गोष्ट नाही, पण अधोलोकात शाश्वतकाळ घालविणे निश्चितच आहे. येशूचा मृत्यू हा अनंत मृत्यू होता, त्याने आमच्या पापाचा अनंत दंड सहन केला यासाठी की आम्हास तो शाश्वतकाळात अधोलोकात चुकवावा लागू नये (करिंथकरांस 2 रे पत्र 5:21). जेव्हा आम्ही त्याच्यावर आपला विश्वास ठेवितो, तेव्हा आमचे तारण होते, आम्हास क्षमा प्राप्त होते, आम्ही शुद्ध होतो, आणि स्वर्गात आम्हास सार्वकालिक घर प्राप्त होते. पण जर आपण देवाच्या सार्वकालिक जीवनाच्या देणगीचा नाकार करू, तर आपणास त्या निर्णयाचे सार्वकालिक परिणाम भोगावे लागतील.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

नश्वरात्मवाद बायबलवर आधारित आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.