नास्तिकतावाद म्हणजे काय?

प्रश्नः नास्तिकतावाद म्हणजे काय? उत्तरः नास्तिकतावाद हा दृष्टिकोन आहे की देवाचे अस्तित्व नाही. नास्तिकतावाद नवा विचार नाही. स्तोत्र 14:1, जे दाविदाने ख्रि. पू. 1000 मध्ये लिहिले होते, त्यात नास्तिकतेचा उल्लेख करण्यात आला आहेः “मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” अलीकडील आंकडे़वारीनुसार नास्तिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते, जगभरात 10 टक्के नास्तिक आहेत. का म्हणून अधिकाधिक…

प्रश्नः

नास्तिकतावाद म्हणजे काय?

उत्तरः

नास्तिकतावाद हा दृष्टिकोन आहे की देवाचे अस्तित्व नाही. नास्तिकतावाद नवा विचार नाही. स्तोत्र 14:1, जे दाविदाने ख्रि. पू. 1000 मध्ये लिहिले होते, त्यात नास्तिकतेचा उल्लेख करण्यात आला आहेः “मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” अलीकडील आंकडे़वारीनुसार नास्तिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते, जगभरात 10 टक्के नास्तिक आहेत. का म्हणून अधिकाधिक लोक नास्तिक होत आहेत? नास्तिकतावाद खरोखर ते तर्कसंगत मत आहे काय ज्याचा नास्तिकतावादी दावा करतात?

नास्तिकतावाद अस्तित्वात का आहे? देव स्वतःस लोकांवर का प्रकट करीत नाही, तो हे सिद्ध का करीत नाही की तो अस्तित्वात आहे? खात्रीने जर देव केवळ प्रकट झाला, तर हा विचार दूर होईल, प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवील! येथे समस्या ही आहे की तो अस्तित्वात आहे हे लोकांस पटविण्याची त्याची इच्छा नाही. देवाची अशी इच्छा आहे की लोकांनी विश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवावा (पेत्राचे 2रे पत्र 3:9) आणि विश्वासाने तारणाच्या त्याच्या देणगीचा स्वीकार करावा (योहान 3:16). देवाने जुन्या करारात अनेकदा त्याच्या अस्तित्वाचे स्पष्टपणे प्रदर्शन केले (उत्पत्ति 6-9; निर्गम 14:21-22; 1 राजे 18:19-31). लोकांनी देव अस्तित्वात असल्याचा विश्वास धरला काय? होय. ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त होऊन देवाकडे वळले काय? नाही. जर व्यक्ती विश्वासाने देवाच्या अस्तित्वाचा स्वीकार करावयास इच्छुक नसेल, तर तो/ती निश्चितच विश्वासाने येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करावयास तयार नाही (इफिसकरांस पत्र 2:8-9). देवाची इच्छा आहे की लोकांनी ख्रिस्ती बनावे, केवळ देवावर विश्वास ठेवणारे नव्हे (जे विश्वास धरतात की देव आहे).

बायबल आम्हास सांगते की देवाच्या अस्तित्वाचा विश्वासाने स्वीकार केला पाहिजे. इब्री लोकांस पत्र 11:6 घोषणा करते, “आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषविणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाÚयाने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍याना तो प्रतिफळ देणारा आहे.” बायबल आम्हास आठवण करून देते की जेव्हा आम्ही विश्वासाने देवावर विश्वास आणि भरवंसा ठेवितो तेव्हा: “येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेविला आहे; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य” (योहान 20:29).

देवाच्या अस्तित्वाचा विश्वासाने स्वीकार केला पाहिजे, पण याचा अर्थ हा नाही की देवावरील विश्वास अथवा श्रद्धा अतार्किक आहे. देवाच्या अस्तित्वासाठी अनेक उत्तम वाद आहेत. बायबल शिकविते की देवाचे अस्तित्व विश्वात (स्तोत्र 19:1-4), निसर्गात (रोमकरांस पत्र 1:18-22), आणि आमच्या स्वतःच्या अंतःकरणात (उपदेशक 3:11) स्पष्टपणे दिसून येते. इतके सर्व म्हटल्यानंतरही, देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही; त्याचा स्वीकार विश्वासाने केला पाहिजे.

त्याचवेळी, नास्तिकतेवर आस्था बाळगण्यासाठी तितकाच विश्वास लागतो. “देवाचे अस्तित्व नाही” असे सुनिश्चित विधान करणे म्हणजे प्रत्येक विषयासंबंधी प्रत्येक गोष्ट जाणत असल्याचा आणि विश्वात सर्वत्र गेले असल्याचा आणि पाहण्यासारखे जे आहे ते सर्वकाही पाहिल्याचा दावा करणे होय. अर्थात, कोणताही नास्तिक व्यक्ती हे दावे करणार नाही. तथापि, जेव्हा ते असे म्हणतात की देव मुळी अस्तित्वात नाही तेव्हा ते मुख्यतः असेच प्रतिपादन करीत असतात. नास्तिक व्यक्ती हे सिद्ध करू शकत नाहीत की देव, उदाहरणार्थ, सूर्याच्या नाभीकेंद्रात राहतो, अथवा गुरूच्या ढगांखाली, अथवा दूरवरच्या कुठल्या आकाशगंगेत राहतो. ही ठिकाणे आमच्या निरीक्षण क्षमतेच्या पलीकडील आहेत, म्हणून हे सिद्ध करता येत नाही की देव अस्तित्वात नाही. आस्तिक होण्यासाठी जितका विश्वास लागतो तितकाच विश्वास नास्तिक होण्यासाठी लागतो.

नास्तिकतावाद सिद्ध करता येत नाही, आणि देवाचे अस्तित्व विश्वासाने स्वीकार केले जावे. स्पष्टपणे, ख्रिस्ती हा ठाम विश्वास करतात की देव आहे, आणि हे कबूल करतात की देवाचे अस्तित्व ही विश्वासाची बाब आहे. त्याचवेळी, आपण ह्या कल्पनेचा नाकार करतो की देवावरील विश्वास हा अतार्किक आहे. आपण विश्वास करतो की देवाचे अस्तित्व स्पष्टपणे दिसून येते, तीव्रतेने जाणवते, आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने आणि वैज्ञानिकदृष्ट्या आवश्यक असल्याचे सिद्ध करता येते. “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते. दिवस दिवसाशी संवाद करितो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करिते. वाचा नाही; शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही. तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात. सूर्यासाठी आकाशांत त्याने मंडप घातला आहे” (स्तोत्र 19:1-4).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

नास्तिकतावाद म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.