नीतिमान ठरविले जाणे म्हणजे काय?

प्रश्नः नीतिमान ठरविले जाणे म्हणजे काय? उत्तरः सरळ शब्दात, नीतिमान ठरविले जाणे म्हणजे नीतिमान घोषित करणे, देवासोबत आपला संबंध सरळ करणे. नीतीमान ठरविणे म्हणजे परमेश्वराचे त्या लोकांस, जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात, नीतिमान घोषित करणे आहे. हे ख्रिस्ताच्या नीतीमत्त्वाच्या आधारे केले जाते जे त्यांच्या नावे जोडले जाते जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात (2 करिंथ 5ः21). जरी एक…

प्रश्नः

नीतिमान ठरविले जाणे म्हणजे काय?

उत्तरः

सरळ शब्दात, नीतिमान ठरविले जाणे म्हणजे नीतिमान घोषित करणे, देवासोबत आपला संबंध सरळ करणे. नीतीमान ठरविणे म्हणजे परमेश्वराचे त्या लोकांस, जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात, नीतिमान घोषित करणे आहे. हे ख्रिस्ताच्या नीतीमत्त्वाच्या आधारे केले जाते जे त्यांच्या नावे जोडले जाते जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात (2 करिंथ 5ः21). जरी एक सिद्धांत म्हणून नीतीमत्व हे संपूर्ण पवित्र शास्त्रात आढळत असले तरीही विश्वासणार्यांच्या संबंधाने नीतिमत्त्वाचे वर्णन करणारा मुख्य परिच्छेद आहे रोम 3ः21-26: “आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्त्व ते प्रकट झाले आहेय त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे; हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे; म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे” (रोम 3ः21-26).

आपल्या तारणाच्या वेळी आम्ही नीतिमान ठरविले गेलो, आम्हास नीतिमान घोषित करण्यात आले. नीतिमान ठरविणे आपल्याला नीतिमान ठरवित नाही, तर आपणास नीतिमान घोषित करते. आमचे नीतिमत्त्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या कार्यावर आपला विश्वास ठेवण्याद्वारे येते. त्याच्या बलिदानाने आपले पाप झाकले जाते, ज्यामुळे देव आपल्याला परिपूर्ण आणि निर्दोष म्हणून पाहू शकतो. कारण ख्रिस्तामध्ये विश्वासणारे म्हणून, देव जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा तो ख्रिस्ताचे स्वतःचे नीतिमत्व पाहतो. हे परिपूर्णतेसाठी देवाच्या मागणी पूर्ण करते; अशाप्रकारे, तो आपल्याला नीतिमान घोषित करतो – तो आपणास नीतिमान ठरवतो.

रोम 5ः18-19 याचा उत्तमप्रकारे सारांश मांडते: “तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील.” नीतिमत्वामुळे देवाची शांती आमच्या जीवनात राज्य करते. नीतिमत्वामुळे आम्हा विश्वासणार्यांस तारणाचे आश्वासन लाभते. नीतिमत्वाची वस्तुस्थिती देवास समर्थ करते की त्याने पवित्रीकरणाची प्रक्रिया आरंभ करावी – ती प्रक्रिया जिच्याद्वारे देव खरोखर आम्हास ते ठरवितो जे आम्ही आधीच स्थितीपरत्वे आहोत. “ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे” (रोम 5ः1).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

नीतिमान ठरविले जाणे म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.