पतीचा शोध करत असताना मी काय पहिले पाहिजे?

प्रश्नः पतीचा शोध करत असताना मी काय पहिले पाहिजे? उत्तरः जेंव्हा एक ख्रिस्ती स्त्री पतीचा शोध करते, तेंव्हा तिने अशा मनुष्याचा शोध केला पाहिजे जो “देवाच्या स्वतःच्या मनासारखा” असला पाहिजे (प्रेषित 13:22). आपल्यातील कोणाचाही सर्वात महत्वाचा नातेसंबंध कोणता असेल तर तो आपला येशू ख्रीस्ताबरोबर असलेला व्ययक्तिक नातेसंबंध. हा नातेसंबंध इतर सर्व नातेसंबंधांच्या आधी येतो. जर…

प्रश्नः

पतीचा शोध करत असताना मी काय पहिले पाहिजे?

उत्तरः

जेंव्हा एक ख्रिस्ती स्त्री पतीचा शोध करते, तेंव्हा तिने अशा मनुष्याचा शोध केला पाहिजे जो “देवाच्या स्वतःच्या मनासारखा” असला पाहिजे (प्रेषित 13:22). आपल्यातील कोणाचाही सर्वात महत्वाचा नातेसंबंध कोणता असेल तर तो आपला येशू ख्रीस्ताबरोबर असलेला व्ययक्तिक नातेसंबंध. हा नातेसंबंध इतर सर्व नातेसंबंधांच्या आधी येतो. जर आपला प्रभुशी थेट संबंध जसा असायला हवा तसा असेल, तर आपल्यातून त्याची वास्तविकता आपल्या बाजूच्या नातेसंबंधात प्रतिबिंबित होते. म्हणून, संभाव्य पती हा असा मनुष्य असला पाहिजे ज्याचे सर्व लक्ष्य देवाच्या वचनाच्या आज्ञेत चालणे आणि असे जीवन जगणे ज्याच्याद्वारे तो देवाला गौरव देऊ शकेल यावर केंद्रित असले पाहिजे (1 करिंथ 10:31).

इतर कोणते गुण आहेत ज्यांना पाहिले पाहिजे? प्रेषित पौल तीमथ्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रातील 3 ऱ्या अधिकारात अशा गुणांना देतो ज्यांना आपण एका पतीमध्ये शोधले पाहिजे. हा परिच्छेद मंडळीमधील पुढाऱ्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आहे. तथापि, या गुणांनी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाला शोभा आणली पाहिजे जो “देवाच्या मनाच्या अनुसार” चालतो. या गुणांचा समभाषिक अनुवाद पुढीलप्रमाणे केला जाऊ शकतो: एक मनुष्य संयमी आणि त्याची वर्तणूक नियंत्रित असली पाहिजे, गर्वाने भरलेला नसावा परंतु गंभीर मानसिक वृत्तीचा असावा, त्याच्या भावनांवर स्वामित्व करण्यास सक्षम असावा, इतरांच्यावर दया करणारा, संयमाने शिकवण्यास सक्षम असावा, माद्यापानासाठी स्वतःस दिलेला किंवा देवाच्या कोणत्याही दानाचा अनियंत्रितपणे उपयोग करणारा नसावा, हिंसाचाराकडे कल नसलेला, जास्त लक्ष जीवनातील तपशीलांवर केंद्रित न करता देवावर केंद्रित करणारा, गरम डोक्याचा किंवा पातळ चमडीचा नसावा जेणेकरून सहजपणे अपराध करू शकेल, आणि इतरांना मिळालेले वरदान बघून जळण्यापेक्षा देवाने जे दिले आहे त्यासाठी त्याचे आभार मानणारा असावा.

वरती दिलेले गुण अशा मनुष्याचे वर्णन करतात जो सक्रियपणे परिपक्व विश्वासी बनण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहे. अशा प्रकारच्या मनुष्याला एखाद्या स्त्रीने संभाव्य पती म्हणून शोधायला हवे. होय, शारीरिक आकर्षण, समान रुची, एकमेकांना पूरक अशा मजबुती आणि कमजोरी, आणि मुलांसाठीची इच्छा या सुद्धा विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. तरी, या गोष्टी आत्मिक गुणांच्या तुलनेत दुय्यम असल्या पाहिजेत ज्यांना एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषामध्ये बघायला पाहिजे. असा मनुष्य ज्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता, ज्याचा आदर करू शकता, आणि देवभक्तीच्या मार्गावर ज्याचे अनुसरण करू शकता तो दिसण्यास सुंदर, कीर्ती, सामर्थ्य, किंवा पैसे असलेल्या मनुष्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे.

शेवटी, जेंव्हा पती होण्यासाठी एखाद्याला “शोधता” तेंव्हा आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेला समर्पित झाले पाहिजे. प्रत्येक स्त्रीला तिच्या स्वप्नातील “आकर्षक राजकुमार” मिळावा असे वाटत असते, परंतु वास्तविकता ही आहे की, ती कदाचित जितक्या त्रुटी तिच्यामध्ये आहेत तितक्याच त्रुटी असलेल्या मनुष्याशी लग्न करेल. नंतर, देवाच्या दयेने ते त्यांचे उरलेले आयुष्य एकमेकांचे भागीदार आणि सेवक कसे बनू शकतो हे शिकण्यात एकत्रितपणे व्यतीत करतील. आपण आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या दुसऱ्या नातेसंबंधात (लग्न) प्रवेश करताना भावनेच्या आहारी न जाता, डोळे मोठे उघडे ठेऊन करायला हवा. आपण आपल्या जीवनाचे लक्ष्य प्रभू आणि तारणाऱ्या बरोबर असणाऱ्या सर्वात महत्वाच्या नातेसंबंधावर केंद्रित करायला हवे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पतीचा शोध करत असताना मी काय पहिले पाहिजे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.