परमेश्वराला कोणी निर्माण केले; परमेश्वर कोठून आला?

प्रश्नः परमेश्वराला कोणी निर्माण केले; परमेश्वर कोठून आला? उत्तरः निरीश्वरवादी आणि साशंक लोकां कडून एक सामान्य वाद ऐकला मिळतो की जर सर्व गोष्टींच्या अस्तित्वासाठी कारणाची गरज असते तर मग परमेश्वराच्या अस्तित्वासाठी देखील करणाची गरज आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की जर परमेश्वर करणाची आवश्यकता आहे तर तो परमेश्वर नाही आहे (आणि जर परमेश्वर परमेश्वर नाही…

प्रश्नः

परमेश्वराला कोणी निर्माण केले; परमेश्वर कोठून आला?

उत्तरः

निरीश्वरवादी आणि साशंक लोकां कडून एक सामान्य वाद ऐकला मिळतो की जर सर्व गोष्टींच्या अस्तित्वासाठी कारणाची गरज असते तर मग परमेश्वराच्या अस्तित्वासाठी देखील करणाची गरज आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की जर परमेश्वर करणाची आवश्यकता आहे तर तो परमेश्वर नाही आहे (आणि जर परमेश्वर परमेश्वर नाही आहे तर, अर्थातच परमेश्वर नाही आहे). या मूलभूत प्रश्नाचा एक किंचित जास्त अत्याधुनिक प्रकार असा आहे “परमेश्वर कोणी निर्माण केले?” प्रत्येकाला माहित आहे की अस्तित्वहीनतेतून अस्तित्व निर्माण होत नाही. त्यामुळे, परमेश्वर जर “अस्तित्व” आहे तर त्याला एखादे कारण असणे आवश्यक आहे, हो की नाही?

हा प्रश्न थोडा भ्रामक आहे कारण हा प्रश्न खोटा समज पसरवितो की परमेश्वर कोठून तरी आला आहे आणि नंतर विचारतो तो कोठून आला असू शकतो. याचे उत्तर असे की हा प्रश्न अगदी अर्थहीन आहे. हे असा प्रश्न विचारन्यासारखे आहे “निळ्या रंगाचा वास कसा असतो? निळा रंग वास असणाऱ्या गोष्टीमध्ये समाविष्ट होत नाही, त्यामुळे असा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. तशाच प्रकारे, परमेश्वर निर्माण करणे किंवा होणे या वर्गात बसत नाही. परमेश्वर कारणाशिवाय आहे आणि तो अनिर्मित आहे -तो फक्त अस्तित्वात आहे.

आम्हाला हे कसे कळेल? हे आपल्याला माहीत आहे की जर काहीही नसेल तर त्यातून काहीच बाहेर येत नाही. त्यामुळे, केंव्हाच काहीच अस्तित्वात नसते, तर कधीही काहीच अस्तित्वात आले नसते. पण गोष्टी अस्तित्वात आहेत. त्यामुळे कधीच अस्तित्वहीनता नसते, काहीतरी नेहमीच अस्तित्वात असणारच. ती नेहमी -विद्यमान असणाऱ्या गोष्टीला आपण परमेश्वर म्हणतो आहे. परमेश्वर हा कारणाशिवाय अस्तित्व असून त्यानेच या ब्रह्मांडात प्रत्येक गोष्ट अस्तित्वात आणली आहे. परमेश्वर अनिर्मित निर्माणकर्ता असून त्याने ब्रह्मांड आणि त्यातील प्रत्येक गोष्ट निर्माण केली आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

परमेश्वराला कोणी निर्माण केले; परमेश्वर कोठून आला?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.