बायबलच्या पुस्तकांचे लेखक कोण होते?

प्रश्नः बायबलच्या पुस्तकांचे लेखक कोण होते? उत्तरः शेवटी, मानवी लेखक असतांनाही बायबल देवाने लिहिले होते. दुसरे तीमथ्य 3:16 आपल्याला सांगते की बायबल “परमेश्वरप्रेरित” आहे. बायबलच्या मानवी लेखकांवर परमेश्वराने देखरेख केली, जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या लिखाणशैलीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करताना त्यांनी तेच लिहिले जे देवाने ठरविले होते. देवाचा हेतू नेमका काय नोंदवला. बायबलचा मजकूर देवाने सांगितला नाही,…

प्रश्नः

बायबलच्या पुस्तकांचे लेखक कोण होते?

उत्तरः

शेवटी, मानवी लेखक असतांनाही बायबल देवाने लिहिले होते. दुसरे तीमथ्य 3:16 आपल्याला सांगते की बायबल “परमेश्वरप्रेरित” आहे. बायबलच्या मानवी लेखकांवर परमेश्वराने देखरेख केली, जेणेकरून त्यांच्या स्वतःच्या लिखाणशैलीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करताना त्यांनी तेच लिहिले जे देवाने ठरविले होते. देवाचा हेतू नेमका काय नोंदवला. बायबलचा मजकूर देवाने सांगितला नाही, परंतु त्याने त्याचे परिपूर्ण मार्गदर्शन केले आणि पूर्णतया प्रेरित केले.

मानवी भाषेत सांगायचे तर, बायबल 15०० वर्षांच्या कालावधीत सुमारे 40 वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लेखकांनी लिहिले होते. यशया संदेष्टा होता, एज्रा एक याजक होता, मत्तय हा जकात वसूल करणारा होता, योहान एक मच्छीमार होता, पौल तंबू बनविणारा होता, मोशे मेंढपाळ होता, लूक एक वैद्य होता. 15 शतकांहून अधिक कालावधीत वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले असूनही बायबलमध्ये स्वतःचा विरोधाभास नाही आणि त्यात कोणत्याही त्रुटी नाहीत. लेखक सर्व भिन्न दृष्टिकोन सादर करतात, परंतु ते सर्व एकाच खर््या देवाची आणि तारणाचा एकच मार्ग – येशू ख्रिस्त याची घोषणा करतात (योहान 14:6; प्रेषितांची कृत्ये 4:12). बायबलमधील काही पुस्तके विशेषेकरून आपल्या लेखकाची नावे देतात. येथे बायबलची पुस्तके दिलेली आहेत आणि बायबलच्या विद्वानांच्या मते जो आहे त्याचे नावही दिले जात आहे, लेखनाच्या अनुमानित तारखेसह:

उत्पत्ति, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद = मोशे – ख्रि. पू. 1400

यहोशवा = यहोशवा – ख्रि. पू. 1350

शास्ते, रूथ, 1 शमुवेल, 2 शमुवेल = शमुवेल/नाथान/गाद – ख्रि. पू. 1000 – 900

1 राजे, 2 राजे = यिर्मया – ख्रि. पू. 600

1 इतिहास, 2 इतिहास, एज्रा, नहेम्या = एज्रा – ख्रि. पू. 450

एस्तेर = मोर्दकै – ख्रि. पू. 400

ईयोब = मोशे – ख्रि. पू. 1400

स्तोत्रे = अनेक भिन्न लेखक, बहुतेक दावीद – ख्रि. पू. 1000 – 400

नीतिसूत्रे, उपदेशक, शलमोनाचे गीतरत्न = शलमोन – ख्रि. पू. 900

यशया = यशया – ख्रि. पू. 700

यिर्मया, विलापगीत = यिर्मया – ख्रि. पू. 600

यहेजकेल = यहेजकेल – ख्रि. पू. 550

दानीएल = दानीएल – ख्रि. पू. 550

होशे = होशे – ख्रि. पू. 750

योएल = योएल – ख्रि. पू. 850

आमोस = आमोस – ख्रि. पू. 750

ओबद्या = ओबद्या – ख्रि. पू. 600

योना = योना – ख्रि. पू. 700

मीखा = मीखा – ख्रि. पू. 700

नहूम = नहूम – ख्रि. पू. 650

हबक्कूक = हबक्कूक – ख्रि. पू. 600

सफन्या = सफन्या – ख्रि. पू. 650 बी.सी.

हाग्गय = हाग्गय – ख्रि. पू. 520 बी.सी.

जखर्या = जखर्या – ख्रि. पू. 500 बी.सी.

मलाखी = मलाखी – ख्रि. पू. 430 बी.सी.

मत्तय = मत्तय – सन 55

मार्क = योहान मार्क – सन 50

लूक = लूक – सन 60

योहान = योहान – सन 90

प्रेषितांची कृत्ये = लूक – सन 65

रोम, 1 करिंथ, २ करिंथ, गलती, इफिस, फिलिप्पै, कलस्सै, 1 थेस्सल, २ थेस्सल, 1 तीमथ्य, २ तीमथ्य, तीत, फिलेमोन = पौल – सन 50-70

इब्री = अज्ञात, बहुधा पौल, लूक, बर्णबा किंवा अप्पुलोस – सन 65

याकोब = याकोब – सन 45

1 पेत्र, 2 पेत्र = पेत्र – सन 60

1 योहान, 2 योहान, 3 योहान = योहान – सन 90

यहूदा = यहूदा – सन 60

प्रकटीकरण = योहान – सन 90

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबलच्या पुस्तकांचे लेखक कोण होते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.