बायबलमधील हरविलेली पुस्तके कोणती आहेत?

प्रश्नः बायबलमधील हरविलेली पुस्तके कोणती आहेत? उत्तरः बायबलमधील कोणतीही “हरवलेली पुस्तके” किंवा बायबलमधून काढून घेण्यात आलेली पुस्तके किंवा बायबलमधील हरवलेली पुस्तके नाहीत. बायबलमध्ये असावे अशी देवाची इच्छा असलेले प्रत्येक पुस्तक बायबलमध्ये आहे. बायबलमधील हरवलेल्या पुस्तकांच्या अनेक आख्यायिका आणि अफवा आहेत पण खरे तर ती पुस्तके हरवली नव्हती. उलट त्यांस नाकारण्यात आले होते. अक्षरशः शेकडो धार्मिक…

प्रश्नः

बायबलमधील हरविलेली पुस्तके कोणती आहेत?

उत्तरः

बायबलमधील कोणतीही “हरवलेली पुस्तके” किंवा बायबलमधून काढून घेण्यात आलेली पुस्तके किंवा बायबलमधील हरवलेली पुस्तके नाहीत. बायबलमध्ये असावे अशी देवाची इच्छा असलेले प्रत्येक पुस्तक बायबलमध्ये आहे. बायबलमधील हरवलेल्या पुस्तकांच्या अनेक आख्यायिका आणि अफवा आहेत पण खरे तर ती पुस्तके हरवली नव्हती. उलट त्यांस नाकारण्यात आले होते.

अक्षरशः शेकडो धार्मिक पुस्तके अगदी त्याच काळात लिहिली गेली जेव्हा बायबलच्या पुस्तकांचे लेखन केले गेले. यापैकी काही पुस्तकांमध्ये प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींची खरी माहिती आहे (उदाहरणार्थ 1 मॅकाबीज). इतर पुस्तकांमध्ये काही उत्तम आत्मिक शिकवण आहे (उदाहरणार्थ, शलमोनाची बुद्धीवचने). तथापि, ही पुस्तके देवाच्या प्रेरणेने लिहिलेली नाहीत. जर आपण वरीलपैकी कोणतीही पुस्तके वाचली, जसे वर उल्लेखिलेले अपोक्रायफा तर आपणास त्यांना दोषपात्र धार्मिक/ऐतिहासिक पुस्तके समजून घ्यावी लागेल, परमेश्वराद्वारे प्रेरित देवाचे अचूक वचन नाही (2 तीमथ्य 3:16-17).

थॉमसचे शुभवर्तमान, उदाहरणार्थ, तिसर्‍या किंवा चौथ्या शतकात लिहिलेले बनावटी लिखाण होते, ज्याचे लेखन प्रेषित थॉमसने केल्याचा दावा केला जातो. हे थॉमसने लिहिले नव्हते. प्रारंभिक ख्रिस्ती विश्वासणार्यांनी थॉमसचे शुभवर्तमान जवळजवळ सार्वत्रिकरित्या नाकारले. यात अनेक चुकीच्या आणि पाखंडी गोष्टी आहेत ज्या येशूने म्हटल्या किंवा केल्या असे मानले जाते. त्यापैकी काहीही (किंवा त्यातील अगदी थोडेसे देखील) सत्य नाही. उदाहरणार्थ, थॉमसच्या शुभवर्तमानात येशू अशा अर्थहीन गोष्टी म्हणतो की “धन्य धन्य तो सिंह ज्यास माणूस खाईल, आणि सिंह मनुष्य होईल” (म्हण 7) आणि “जी स्त्री स्वतःला पुरुष बनविल तिचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल” (म्हण 114).

बर्णबाचे शुभवर्तमान बायबलच्या बर्णबाने लिहिलेले नव्हती, तर एका पाखंडी व्यक्तीने लिहिलेले होते. फिलिप्पाच्या शुभवर्तमानाविषयी, पेत्राचे भविष्यवाणीचे पुस्तक इत्यादींविषयी असेच म्हणता येईल. ही सर्व पुस्तके आणि त्यांच्यासारखी इतर अनेक पुस्तके दांभिक आहेत, मुख्यत्वेकरून त्याचा अर्थ आहे “खोट्या लेखकाने लिहिलेले.”

एक देव आहे. बायबलमध्ये एक निर्माणकर्ता आहे. एक पुस्तक आहे. त्याच्यात कृपेची एक योजना आहे, जी आरंभापासून अंमलबजावणीद्वारे, पूर्ण होण्यापर्यंत नोंदविली गेली आहे. जगाच्या उत्पत्तीपूर्वी ठरविण्यापासून ते गौरवीकरणापर्यंत, बायबलमध्ये देवाने त्याच्या गौरवी स्तुतीसाठी आपल्या निवडलेल्या लोकांना सोडवून घेतल्याची गोष्ट आहे. पवित्र शास्त्रात देवाचे मुक्तिदायक उद्दिष्ट आणि योजना पवित्र शास्त्रात प्रकट होत असतांना, ज्या वारंवार येणाऱ्या विषयांवर सतत जोर दिला जात आहे ते विषय आहेत देवाचे चारित्र्य, पाप आणि आज्ञाभंग यांचा निवाडा, विश्वास आणि आज्ञाधारकपणाचा आशीर्वाद, प्रभु व तारणारा आणि पापासाठी त्याचे बलिदान, आणि येणारे राज्य आणि गौरव. देवाची इच्छा आहे की आम्हाला हे विषय माहित असावेत आणि समजले पाहिजेत कारण आपले जीवन आणि सार्वकालिक भविष्य यावर अवलंबून आहे. म्हणूनच, देव या महत्त्वपूर्ण माहितीपैकी कोणतीही “हरवू” देईल हे अकल्पनीय आहे. बायबल पूर्ण आहे, यासाठी की आपण जे वाचतो व समजून घेतो त्या आपण “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावे” (2 तीमथ्य 3:16-17).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबलमधील हरविलेली पुस्तके कोणती आहेत?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.