बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाऊ शकतात काय?

प्रश्नः बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाऊ शकतात काय? उत्तरः देव आपल्या वचनात भर घालण्यासाठी पुढील प्रकटीकरण मांडेल यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. बायबलची सुरुवात मानवजातीच्या आरंभापासून – उत्पत्तीपासून – होते आणि मानवतेच्या समाप्तीसह समाप्त होते जसे आपण जाणतो – प्रकटीकरण. दरम्यानची प्रत्येक गोष्ट विश्वासणारे म्हणून आपल्या फायद्यासाठी आहे, की आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाच्या सत्यासह…

प्रश्नः

बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाऊ शकतात काय?

उत्तरः

देव आपल्या वचनात भर घालण्यासाठी पुढील प्रकटीकरण मांडेल यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. बायबलची सुरुवात मानवजातीच्या आरंभापासून – उत्पत्तीपासून – होते आणि मानवतेच्या समाप्तीसह समाप्त होते जसे आपण जाणतो – प्रकटीकरण. दरम्यानची प्रत्येक गोष्ट विश्वासणारे म्हणून आपल्या फायद्यासाठी आहे, की आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाच्या सत्यासह सामथ्र्यवान व्हावे. हे आम्हाला 2 तीमथ्य 3:16 -17 वरून माहित होते, “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”

जर बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली गेली तर ते असे म्हणण्यासारखे आहे की आज आपल्याजवळ असलेले बायबल अपूर्ण आहे – ते आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सांगत नाही. जरी हे फक्त प्रकटीकरणाच्या पुस्तकावरच लागू पडले असले तरी, प्रकटीकरण 22:18-20 आपल्याला देवाच्या वचनात जोडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सत्याची शिकवण देते: “ह्या पुस्तकातील ‘संदेशवचने’ ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की, जो कोणी ‘ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव आणील; ‘आणि’ जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही ‘काढून टाकील’ त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील.”

बायबलच्या सध्याच्या 66 पुस्तकांत आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी आहेत. जीवनात अशी कोणतीही परिस्थिती नाही जी बायबलद्वारे संबोधित केली जाऊ शकत नाही. उत्पत्तीमध्ये ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट प्रकटीकरणात आढळतो. बायबल पूर्णपणे पूर्ण आणि पुरेशी आहे. देव बायबलमध्ये भर घालू शकला असता का? नक्कीच तो करू शकला असता. तथापि, बायबलमध्ये किंवा ईश्वरविज्ञानानुसार असे मानण्याचे कोणतेही कारण नाही की तो असे करणार आहे किंवा त्याला तसे करण्याची गरज आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबलमध्ये आणखी पुस्तके जोडली जाऊ शकतात काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.