बायबल अश्लीलतेविषयी काय म्हणते? अश्लील गोष्टी पाहणे पाप आहे काय?

प्रश्नः बायबल अश्लीलतेविषयी काय म्हणते? अश्लील गोष्टी पाहणे पाप आहे काय? उत्तरः मोठ्या प्रमाणात, इंटरनेटवर सर्वात जास्त ज्या शब्दांचा शोध घेतला जातो त्यांचा संबंध अश्लीलतेशी आहे. अश्लीलता आज जगात सर्वत्र आहे. कदाचित इतर गोष्टींपेक्षा, सैतान लैंगितेचा विपर्यास करण्यात अधिक यशस्वी झाला आहे. त्याने जे चांगले आणि योग्य (पति आणि पत्नी यांच्यातील प्रेमळ समागम) हा घेतला…

प्रश्नः

बायबल अश्लीलतेविषयी काय म्हणते? अश्लील गोष्टी पाहणे पाप आहे काय?

उत्तरः

मोठ्या प्रमाणात, इंटरनेटवर सर्वात जास्त ज्या शब्दांचा शोध घेतला जातो त्यांचा संबंध अश्लीलतेशी आहे. अश्लीलता आज जगात सर्वत्र आहे. कदाचित इतर गोष्टींपेक्षा, सैतान लैंगितेचा विपर्यास करण्यात अधिक यशस्वी झाला आहे. त्याने जे चांगले आणि योग्य (पति आणि पत्नी यांच्यातील प्रेमळ समागम) हा घेतला आहे आणि त्याची जागी वासना, अश्लीलता, व्यभिचार, बलात्कार, आणि समलिंगी यौन संबंधास दिली आहे. सदा वाढत चाललेल्या दुष्टपणाच्या आणि अनैतिकतेच्या अत्यंत घसरड्या उतारावर अश्लीलता हे पहिले पाऊल ठरू शकते (रोमकरांस पत्र 6:19). अश्लीलतेच्या व्यसनात्मक स्वरूपाविषयी बरेच काही लिहिलेले आहे. ज्याप्रमाणे ड्रग्जचा वापर करणारा “त्याची उच्च पातळी” गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात आणि आणखी शक्तिशाली ड्रग्ज घेतो, त्याचप्रमाणे अश्लीलता व्यक्तीस स्थायी लैंगिक व्यसनांत आणि अनीतिमान इच्छांत आणखी खोलवर आढून नेते.

पापाचे तीन मुख्य वर्ग आहेत देहाची वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुसारकी (योहानाचे 1 ले पत्र 2:16). अश्लीलता निश्चितपणे आम्हाला देहवासनेकडे प्रवृत्त करते, आणि ती निश्चितपणे डोळ्यांची वासना आहे. फिलिप्पैकरांस पत्र 4:8 नुसार, अश्लीलता ज्या गोष्टींविषयी आम्ही विचार करावा त्यास खरोखर लायक नाही. अश्लीलता ही व्यसनकारक (करिंथकरांस 1 ले पत्र 6:12; पेत्राचे 2 रे पत्र 2:19), आणि विनाशकारक (नीतिसूत्रे 6:25-28; यहेज्केल 20:30; इफिसकरांस पत्र 4:19) आहे. आमच्या मनांत इतर लोकांविषयी वासना बाळगणे, जे अश्लीलतेचे सार आहे, देवाच्या दृष्टीने अपराध आहे (मत्तय 5:28). जेव्हा व्यक्तीच्या जीवनाचे वैशिष्ट्य अश्लीलतेप्रत नियमित समर्पित वृत्ती असते, तेव्हा ती हे दर्शविते की त्या व्यक्तीचे तारण झालेले नाही (करिंथकरांस 1 ले पत्र 6:9).

जे लोक अश्लीलतेत गुंतलेले आहेत, त्यांस देव विजय देऊ शकतो आणि देईल. आपण अश्लीलतेत गुंतले आहात काय आणि त्यापासून मुक्त होण्याची इच्छा धरता काय? येथे विजयाप्रत नेणारी काही पाऊले आहेत : 1) देवासमोर आपले पाप कबूल करा (योहानाचे 1 ले पत्र 1:9). 2) देवास विनंती करा की त्याने आपले मन शुद्ध करावे, नवीन करावे, आणि बदलून टाकावे (रोमकरांस पत्र 12:2). 3) देवास विनंती करा की त्याने आपले मन फिलिप्पैकरांस पत्र 4:8, 4 ने परिपूर्ण करावे 4) आपल्या देहास पवित्र राखण्यास शिकावे (थेस्सलनीकाकरांस 1 ले पत्र 4:3-4). 5) लैंगिक संबंधाचा योग्य अर्थ समजून घ्यावा आणि आपली ती गरज पूर्ण करण्यासाठी केवळ आपल्या जोडीदारावर अवलंबून राहावे (करिंथकरांस 1 ले पत्र 7:1-5). 6) हे समजून घ्या की जर आपण आत्म्यानुसार वागाल, तर आपण देहवासना पूर्ण करणारच नाही (गलतीकरांस पत्र 5:16). 7) आपणास चित्र प्रतीमा दिसून नयेत म्हणून व्यवहारिक पाऊले उचला. अश्लील चित्रे दिसू नये म्हणून आपल्या कम्प्यूटरवर ब्लॉकर लावा, दूरदर्शन आणि विडिओचा उपयोग मर्यादित करा, आणि दुसर्या ख्रिस्ती व्यक्तीस शोधून काढा जो आपणासाठी प्रार्थना करील आणि आपणास जबाबदार ठेवण्यात मदत करील.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबल अश्लीलतेविषयी काय म्हणते? अश्लील गोष्टी पाहणे पाप आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.