बायबल वंशवाद, पूर्वग्रह, आणि वंशभेदाबद्दल काय म्हणते?

प्रश्नः बायबल वंशवाद, पूर्वग्रह, आणि वंशभेदाबद्दल काय म्हणते? उत्तरः ह्या चर्चेत सर्वप्रथम समजण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ एक वंश आहे — मानववंश. काॅकेशियन्स, आफ्रिकन्स, एशियन्स, भारतीय, अरब आणि यहूदी वेगवेगळे वंश नाहीत. तर, त्या मानववंशाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. सर्व मानवजातींजवळ सारखीच शारीरिक वैशिष्टे आहेत (अर्थात, थोड्या फार फरकाने). अधिक महत्वाचे हे आहे की, सर्व…

प्रश्नः

बायबल वंशवाद, पूर्वग्रह, आणि वंशभेदाबद्दल काय म्हणते?

उत्तरः

ह्या चर्चेत सर्वप्रथम समजण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ एक वंश आहे — मानववंश. काॅकेशियन्स, आफ्रिकन्स, एशियन्स, भारतीय, अरब आणि यहूदी वेगवेगळे वंश नाहीत. तर, त्या मानववंशाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. सर्व मानवजातींजवळ सारखीच शारीरिक वैशिष्टे आहेत (अर्थात, थोड्या फार फरकाने). अधिक महत्वाचे हे आहे की, सर्व मानवजात देवाच्या प्रतिरूपात आणि सदृश निर्माण करण्यात आली आहे (उत्पत्ती 1:26-27). देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आमच्यासाठी त्याचे जीवन वाहून देण्यास येशूला पाठविले (योहान 3:16). स्पष्टपणे “जगात” सर्व वंशसमूहांचा समावेश आहे.

देव पक्षपात करीत नाही (अनुवाद 10:17; प्रेषितांचे कृत्ये 10:34; रोमकरांस पत्र 2:11; इफिसकरांस पत्र 6:9), आणि आम्ही देखील करता कामा नये. याकोब 2:4 अशा लोकांचे वर्णन करते जे “दुर्विचारी न्यायाधीशाप्रमाणे” भेदभाव करतात. त्याऐवजी, आम्हाला आमच्या शेजार्यांवर आमच्यासारखी प्रीती केली पाहिजे (याकोब 2:8). जुन्या करारात, देवाने मानवजातीस दोन “वांशिक” गटात विभाजित केले: यहूदी आणि गैरयहूदी. यहूद्यांसाठी देवाचा हेतू हा होता की त्यांनी याजकांचे राज्य बनून, गैरयहूदी राष्ट्रांची सेवा करावी. त्याऐवजी, बरेचदा, यहूदी त्यांच्या दर्जासंबंधाने अहंकारी झाले आणि त्यांनी गैरयहूद्यांस तुच्छ लेखिले. येशू खिस्ताने या गोष्टीचा शेवट केला, त्याने शत्रूत्वाची मधली आडभिंत पाडली (इफिसकरांस पत्र 2:14). वंशवाद, पूर्वग्रह, आणि भेदभावाची सर्व स्वरूपे वधस्तभांवरील ख्रिस्ताच्या कार्यास अपमानकारक आहेत.

येशूने आम्हास आज्ञा दिली की जसा तो आमच्यावर प्रीती करतो तशी आम्ही एकमेकांवर प्रीती करावी (योहान 13:34). जर देव पक्षापातरहित आहे आणि आमच्यावर बिना पक्षापात प्रीती करतो, तर आम्हास देखील इतरांवर त्याच उच्च मापदंडाने प्रीती करण्याची गरज आहे. येशूने मत्तय 25 मध्ये शिकविले की जे काही आम्ही त्याच्या लहानात लहान भावांसाठी करतो, ते आम्ही त्याच्यासाठी करतो. जर आपण एखाद्या व्यक्तीशी तुच्छपणे वागतो, तर आपण देवाच्या प्रतिरूपात निर्मिलेल्या व्यक्तीशी गैरवर्तन करतो; आपण अशा व्यक्तीस दुखावितो ज्याच्यावर देव प्रीती करतो आणि ज्याच्यासाठी येशू मेला.

वेगवेगळ्या स्वरूपांत आणि वेगवेगळ्या प्रमाणांत, वंशवाद, हजारो वर्षांसाठी मानवजातीवर यातना ठरला आहे. सर्व जातीवंशांच्या बंधू आणि भगिनींनो, असे घडता कामा नये. वंशवाद, पूर्वग्रह, आणि भेदभाव यांस बळी पडलेल्यांनी क्षमा करण्याची गरज आहे. इफिसकरांस पत्र 4:32 घोषणा करते, “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्याठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.” वंशवादी कदाचित तुमच्या क्षमेस पात्र ठरणार नाहीत, परंतु आम्ही देखील देवाच्या क्षमेस पात्र नव्हतो. जे वंशवाद, पूर्वग्रह, आणि भेदभाव यांचे पालन करतात त्यांस पश्चाताप करण्याची गरज आहे. “तुम्ही मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा, आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा” (रोमकरांस पत्र 6:13). गलतीकरांस पत्र 3:28 पूर्णपणे खरे ठरो, “यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण येशूच्या ठायी एकच आहा.”

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबल वंशवाद, पूर्वग्रह, आणि वंशभेदाबद्दल काय म्हणते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.