भूतांविषयी पवित्र शास्त्र काय सांगते?

प्रश्नः भूतांविषयी पवित्र शास्त्र काय सांगते? उत्तरः प्रकटीकरण 12:9मध्ये दर्शविल्याप्रमाणे भुते हे पतन पावलेले देवदूत आहेत: “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दुंतास टाकण्यात आले”. सैतानाचे स्वर्गातून खाली पडणे यशया 14:12-15 व यहज्केल 28:12-15…

प्रश्नः

भूतांविषयी पवित्र शास्त्र काय सांगते?

उत्तरः

प्रकटीकरण 12:9मध्ये दर्शविल्याप्रमाणे भुते हे पतन पावलेले देवदूत आहेत: “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दुंतास टाकण्यात आले”. सैतानाचे स्वर्गातून खाली पडणे यशया 14:12-15 व यहज्केल 28:12-15 मध्ये सूचकतेने वर्णन केले आहे. जेव्हा सैतान पडला तेव्हा त्याने त्याच्यासोबत काही देवदूताना घेतले-प्रकटीकरण 12:4 नुसार एक तृतीयांश देवदूत सैतानासोबत होते. यहुदाचे पत्र वचन 6 सुद्धा त्या देवदूतांचा उल्लेख करते ज्यांनी पाप केले. म्हणून पवित्र शास्त्राच्या दृष्टीने, भूते हे पतन पावलेले देवदूत आहेत ज्यांनी सैतानासोबत देवाच्याविरुद्ध बंड करणे पसंत केले.

भूतांपैकी काहींना त्यांच्या पापाकरिता “निरंतरच्या बंधनात, निबीड काळोखामध्ये” आधीच बंदिस्त केले आहे (यहुदाचे पत्र वचन 6). इतरांना हिंडण्याची मुभा आहे आणि त्यांचा “काळोखातील जगाचे अधिपति आणि स्वर्गीय राज्यातील दुष्ट आत्मिक शक्ति” असा ईफिस 6:12 व (कलस्से 2:15) मध्ये उल्लेख केला आहे. भुते किवा दुरात्मे अजून त्यांचा पुढारी ह्या नात्याने सैतानाचे अनुसरण करतात आणि देवाची योजना निष्फळ करण्याच्या प्रयत्नांत ते पवित्र देवदुतांसोबत यूद्ध करतात व देवाच्या लोकांच्या मार्गात अडचणी आणतात (दानिएल 10:13).

भूतांना आत्मिक अस्तित्व असल्यामुळे एका शाररिक देहाचा ताबा घेण्याचे सामर्थ्य त्यांच्यापाशी असते. सैतानी ताबा तेव्हा घडून येतो जेव्हा एका व्यक्तीचे शरीर पुर्णपणे एका भुताद्वारे नियंत्रित केले जाते. देवाच्या लेकराच्या बाबत हे घडून येवू शकत नाही कारण ख्रिस्तात असलेल्या विश्वासणार्‍याच्या हृदयात पवित्र आत्मा वास करतो.

त्याच्या जगीक सेवा कार्याच्या दरम्यान, येशूने पुष्कळ भूतांचा सामना केला. अर्थात त्यांच्यापैकी कोणीही ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या तुलनेचा नव्हता. “लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणिले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालविली” (मत्तय 8:16). भूतांवर येशूचा अधिकार त्या पुराव्यांपैकी एक “पुरावा” होता की तो खरोखर देवाचा पुत्र होता (लुक 11:20). ज्या भुतानी येशूचा सामना केला त्यांना माहीत होते की तो येशू कोण होता आणि ते त्याला घाबरले: “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? [भुते] ओरडली. “नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय?” (मत्तय 8:29). भूतांना माहीत आहे की त्यांचा अंत यातनामय असेल.

सैतान आणि त्याची भुते आता देवाच्या कार्याचा नाश करणे आणि त्यांना शक्य झाले तर कोणालाही फसविणे ह्या कडे लक्ष पुरवीत आहेत (1 पेत्र 5:8; 2 करिंथ 11:14-15). भूतांचे वर्णन अशुद्ध आत्मे (मत्तय 10:1), परत अशुद्ध आत्मे (मार्क 1:27), असत्य वदविणारे आत्मे (1 राजे 22:23) व सैतानाचे दूत (प्रकटीकरण 12:9) असे केले आहे. सैतान आणि त्याची भुते जगाला फसवितात (2 करिंथ 4:4), खोटे सिद्धांत सर्वत्र फैलवतात (1तिमथ्य 4:1), ख्रिस्तीलोकांवर हल्ला करतात (2 करिंथ 12:7; 1 पेत्र 5:8) आणि पवित्र देवदुतांसोबत लढाई करतात (प्रकटी 12:4-9).

भुते-पतन पावलेले देवदूत देवाचे शत्रू आहेत, परंतू ते पराजित झालेले शत्रू आहेत. ख्रिस्ताने “सत्ताधीशांना व अधिकार्‍यांना नाडून” आणि “वधस्तंभवार जयोत्सवकरून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले” (कलस्से 2:15). जर आपण देवाला समर्पित होतो आणि सैतानाचा विरोध करतो तर आपणास भय धरण्यासारखे काहीही नाही. “जगांत हो आहे त्याच्यापेक्षा तुम्हांत हो आहे तो मोठा आहे” (1 योहान 4:4).

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

भूतांविषयी पवित्र शास्त्र काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.