मंडळीच्या शासनाच्या स्वरूपाविषयी बायबल काय म्हणते?

प्रश्नः मंडळीच्या शासनाच्या स्वरूपाविषयी बायबल काय म्हणते? उत्तरः प्रभु आपल्या वचनात अत्यंत स्पष्टपणे सांगतो की पृथ्वीवर त्याची मंडळी कशी सुसंघटित व सुव्यवस्थित असली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे? सर्वप्रथम, ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे आणि तिचा सर्वश्रेष्ठ अधिकारी (इफिस 1:22; 4:15; कलस्सै 1:18). दुसरे म्हणजे स्थानिक मंडळी ही स्वायत्त असली पाहिजे, कुठलेही बाह्य नियंत्रण किंवा…

प्रश्नः

मंडळीच्या शासनाच्या स्वरूपाविषयी बायबल काय म्हणते?

उत्तरः

प्रभु आपल्या वचनात अत्यंत स्पष्टपणे सांगतो की पृथ्वीवर त्याची मंडळी कशी सुसंघटित व सुव्यवस्थित असली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे? सर्वप्रथम, ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे आणि तिचा सर्वश्रेष्ठ अधिकारी (इफिस 1:22; 4:15; कलस्सै 1:18). दुसरे म्हणजे स्थानिक मंडळी ही स्वायत्त असली पाहिजे, कुठलेही बाह्य नियंत्रण किंवा अधिकार तिच्या असता कामा नये, तिला स्वतःवर शासन चालविण्याचा हक्क असला पाहिजे आणि व्यक्ती किंवा संस्थेच्या पदाधिकार्यांद्वारे तिच्या जीवनात कुठलाही हस्तक्षेप नको (तीत 1:5). तिसरे म्हणजे, मंडळीवर आत्मिक पुढार्यांचे शासन असले पाहिजे ज्यात दोन मुख्य पदाधिकारी असावेत – वडील आणि डिकन.

“वडील” – हे मोशेच्या काळापासून इस्राएली लोकांमध्येनेतृत्व चालवीत असत. आम्ही त्यांस राजकारणाचे निर्णय घेतांना (2 शमु 5:3; 2 शमु 17:4,15), नंतरच्या इतिहासात राजाला सल्ला देतांना (1 राजे 20:7), आत्मिक बाबतीत लोकांचे प्रतिनिधित्व करतांना (निर्गमन 7:17; 24:1,9; गणना 11:6, 24-25) पाहतो. जुन्या कराराच्या प्रारंभिक भाषांतराने, सेप्टुआजिनने “वडील” या शब्दासाठी प्रेस्ब्यूटराॅस या शब्दाचा उपयोग केला आहे. नव्या करारात वापरलेला हा तोच ग्रीक शब्द आहे ज्याचे भाषांतर सुद्धा ”वडील“ आहे.

नवा करार अनेकदा वडिलांचा उल्लेख करतो ज्यांनी मंडळीचे पुढारी म्हणून आपली भूमिका पार पाडली (प्रे. कृत्ये 14:23, 15:2, 20:17; तीत 1:5; याकोब 5:14) और स्पष्टपण प्रत्येक मंडळीजवळ एकापेक्षा अधिक होते, कारण वचन सामान्यतः बहुवचनी स्वरूपात आढळतो. एकमेव अपवाद त्या उदाहरणांचा उल्लेख करते. यरूशलेमच्या मंडळीत, प्रेषितांसोबत वडील देखील पुढारी म्हणून भूमिका बजावीत (प्रे. कृत्ये 15:2-16:4). असे वाटते की वडिलाचे पद एपिस्कोपसच्या पदाच्या बरोबरीचे होते ज्याचे भाषांतर ”अध्यक्ष“ किंवा ”बिशप“ असे करण्यात आले आहे (प्रे. कृत्यें 11:30; 1 तीमथ्य. 5:17). ”वडील“ हा शब्द त्या पदाच्या गौरवाचा उल्लेख करीत असेल, तर ”बिशप/अध्यक्ष“ त्याच्या अधिकाराचे व कर्तव्याचे वर्णन करतो (1 पेत्र 2:25, 5:1-4). फिलिप्पै. 1:1 मध्ये, पौल बिशप व डिकनचे अभिवादन करतो, पण वडिलांचा उल्लेख करीत नाही, कारण अनुमानतः वडील आणि बिशप समान आहेत. तसेच, 1 तीमथ्य. 3:2, 8 बिशप आणि डिकन यांच्या पात्रता मांडतो, पण वडिलांच्या नाही. तीत 1:5-7 देखील या दोन संज्ञांस एकत्र जोडतात. डायकोनाॅसपासून ”डिकनच्या“ पदाचा अर्थ आहे ”घाणीतून“ मंडळीत एक सेवक पुढारीपन होते. डिकन्स हे वडिलांपासून वेगळे आहेत, त्यांस अशा पात्रता होत्या ज्या अनेक प्रकारे वडिलांच्या पात्रतासमान होत्या (1 तीमथ्य 3:8-13). डिकन्स आवश्यक त्या बाबतीत मंडळीचे सहाय्य करतात, जसे प्रे. कृत्ये 6 मध्ये लिहिले आहे.

पोईमेन हा शब्द ज्याचे भाषांतर मंडळीच्या मानवी पुढार्यांच्या संदर्भात “पाळक” असे करण्यात आले आहे, नव्या करारात केवळ एकदा आढळून येतो, इफिस 4:11 या वचनात: “आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले.” अनेक जण ”पाळक“ आणि “शिक्षक” या दोन्ही शब्दांचा संबंध एका पदाशी जोडतात, पाळक-शिक्षक. हे शक्य आहे की पाळक-शिक्षक हा विशिष्ट स्थानिक मंडळीचा आत्मिक मेंढपाळ असे.

वरील परिच्छेदांवरून असे दिसून येई की नेहमीच अनेक वडीलजण असत, पण यामुळे हे नाकारता येत नाही की परमेश्वर विशिष्ट वडिलांस शिक्षकाची कृपादाने देतो आणि इतरांस प्रशासनाचे, प्रार्थनची कृपादाने इत्यादी देतो (रोम 12:3-8; इफिस 4:11). हे देखील नाकारता येत नाही की परमेश्वर त्यांस अशा सेवेत पाचारण करतो ज्यात ते त्या कृपादानांचा उपयोग करतील (प्रे. कृत्ये 13:1). अशाप्रकारे, एक वडील ”पाळक“ म्हणून तयार होईल, दुसरा बहुसंख्य सदस्यांस भेट देईल कारण त्याला दयेचे कृपादान लाभले आहे, दुसरा संस्थेच्या लहानसहान गोष्टी हाताळण्याच्या अर्थाने “अधिकार“ चालवील. अनेक मंडळ्या ज्यात पाळक आणि डिकन मंडळ आहेत, अनेक वडिलांसोबत कार्य करतात ज्यात ते सेवेचे ओझे उचलतात आणि निर्णय घेण्याबाबत एकत्र मिळून कार्य करतात. पवित्र शास्त्रात निर्णयात मंडळीचा सुद्धा बराच वाटा असे. अशाप्रकारे, निर्णय घेणारा “हुकुमशहा” पुढारी (मग त्याला वडील म्हणा, किंवा बिशप, किंवा पाळक) पवित्र शास्त्राविपरीत (प्रे. कृत्ये 1:23; 6:3,5; 15:22, 30; 2 करिंथ 8:19) आहे. त्याचप्रमाणे, मंडळीचे शासन असलेले चर्च वडिलांस किंवा मंडळीच्या पुढार्यांच्या मदतीस महत्व देत नाही.

सारांश म्हणजे, बायबल शिकविते की पुढारीपणात वडिलांच्या बहुलतेचा समावेश आहे (बिशप/अध्यक्ष) डिकन्सच्या गटासोबत जे मंडळीची सेवा करतात. पण ‘पाळकाच्या’ मुख्य भूमिकेत ते वडिलांपैकी एकाद्वारे सेवा करविण्यासाठी वडिलांच्या अनेकतेच्या हे विपरीत नाही (जसे त्याने प्रे. कृत्येमध्ये काहींला मिशनरी म्हणून पाचारण केले) आणि त्यांस मंडळीस कृपादाने म्हणून देतो (इफिस 4:11). अशाप्रकारे, मंडळीत अनके वडील असतील, पण सर्व वडिलांस पाळकाच्या भूमिकेत सेवा करावयास पाचारण नाही. पण, वडिलांपैकी एकास, पाळकास अथवा ”शिकविणार्‍या वडिलास“ इतर वडिलांच्या तुलनेत निर्णय घेण्याचा अधिकार नाही.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

मंडळीच्या शासनाच्या स्वरूपाविषयी बायबल काय म्हणते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.