मनुष्याचे प्राण कसे उत्पन्न करण्यात आले?

प्रश्नः मनुष्याचे प्राण कसे उत्पन्न करण्यात आले? उत्तरः मानवी प्राण कसा उत्पन्न होतो यावर दोन बायबलदृष्ट्या वाजवी विचार मांडण्यात येतात. ट्रॅड्यूशियनिझम या सिद्धांतानुसार भौतिक शरीरासोबत शारीरिक पालकांद्वारे प्राण निर्माण केला जातो. ट्रॅड्यूशियनिझमचा आधार खालीलप्रमाणे आहे: (अ) उत्पत्ति 2:7 मध्ये, देवाने आदामामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, ज्यामुळे आदाम “जिवंत प्राणी” झाला. पवित्र शास्त्रात कोठेही देव पुन्हा ही…

प्रश्नः

मनुष्याचे प्राण कसे उत्पन्न करण्यात आले?

उत्तरः

मानवी प्राण कसा उत्पन्न होतो यावर दोन बायबलदृष्ट्या वाजवी विचार मांडण्यात येतात. ट्रॅड्यूशियनिझम या सिद्धांतानुसार भौतिक शरीरासोबत शारीरिक पालकांद्वारे प्राण निर्माण केला जातो. ट्रॅड्यूशियनिझमचा आधार खालीलप्रमाणे आहे: (अ) उत्पत्ति 2:7 मध्ये, देवाने आदामामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, ज्यामुळे आदाम “जिवंत प्राणी” झाला. पवित्र शास्त्रात कोठेही देव पुन्हा ही क्रिया करीत असल्याची नोंद नाही. (ब) आदामाला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात एक पुत्र झाला (उत्पत्ति 5:3). जरी देवाने त्यांच्यात श्वास फुंकला नाही, तरी आदामाचे वंशज “जिवंत प्राणी” असल्यासारखे दिसते. (क) उत्पत्ति 2:2-3 असे दर्शवित असल्यासारखे दिसून येते की देवाने आपले उत्पत्तिचे कार्य बंद केले. (ड) आदामाच्या पापाचा परिणाम सर्व मनुष्यांवर होतो – शारीरिकरित्या आणि आत्मिकरित्या – जर शरीर आणि प्राण हे दोन्ही पालकांकडून येत असेल तर हे अर्थपूर्ण वाटते. ट्रॅड्यूशियनिझमची कमकुवतता अशी आहे की संपूर्ण शारीरिक प्रक्रियेद्वारे अमूर्त आत्मा कसा निर्माण केला जाऊ शकतो हे अस्पष्ट आहे. जर शरीर आणि आत्मा एकसंधपणे जोडलेले असतील तरच ट्रॅड्यूशियनिझम सत्य असू शकते.

सृष्टिवाद असे मत आहे की जेव्हा मानवाची गर्भधारणा होते तेव्हा देव एक नवीन प्राण निर्माण करतो. प्रारंभिक मंडळीच्या अनेक प्रणेत्यांनी सृष्टीवादाचे समर्थन केले आणि त्याला शास्त्रीय आधारही आहे. प्रथम, पवित्रशास्त्र प्राणाच्या उत्पत्तीस शरीराच्या उत्पत्तीपासून वेगळे करते (उपदेशक 12:7; यशया 42:5; जखर्‍या 12:1; इब्री 12:9). दुसरे म्हणजे, जर देव गरजेच्या क्षणी प्रत्येक प्राण तयार करतो तर प्राण आणि शरीराचे वेगळेपण दृढ आहे. सृष्टिवादाची कमकुवतता अशी आहे की त्यामध्ये देव सतत नवीन मानवी प्राण निर्माण करीत असतो, तर उत्पत्ति 2:2-3 असे दर्शवितो की देवाने निर्माण करणे बंद केले आहे. तसेच, संपूर्ण मानवी अस्तित्व – शरीर, प्राण आणि आत्मा – यांस पापाचा संसर्ग झाला आहे आणि देव प्रत्येक मानवासाठी एक नवीन प्राण तयार करतो, मग तो प्राण पापाने कसा संक्रमित झाला?

तिसरा दृष्टिकोन, ही एक संकल्पना आहे की देवाने एकाच वेळी सर्व मानवी आत्मा निर्माण केले आणि गर्भधारणेच्या क्षणी तो प्राण मनुष्याला “जोडत” जातो, परंतु या मतास बायबलचे समर्थन नाही. या मतानुसार स्वर्गात “प्राणांचे कोठार” आहे जेथे देव प्राण साठवून ठेवतो जे मानवी शरीराशी जोडल्या जाण्याच्या प्रतीक्षेत असतात. पुन्हा, या मताला बायबलचे समर्थन नाही, आणि सामान्यतः “नवीन युग” किंवा पुनर्जन्माची मानसिकता असलेले लोक या मताचा पाठपुरावा करतात.

ट्रॅड्यूशियनवादी विचार बरोबर असो किंवा सृष्टिवादी दृष्टिकोन बरोबर असो, दोघेही सहमत आहेत की गर्भधारणेपूर्वी प्राण अस्तित्वात नसतो. ही बायबलमधील स्पष्ट शिकवण वाटते. गर्भधारणेच्या क्षणी देव नवीन मानवी प्राण निर्माण करीत असो, किंवा प्राण उत्पन्न करण्यासाठी देवाने मनुष्याच्या पुनरुत्पादक प्रक्रियेची रचना केली असो वा नसो, देव प्रत्येक मानवी प्राणाच्या निर्मितीसाठी शेवटी जबाबदार असतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

मनुष्याचे प्राण कसे उत्पन्न करण्यात आले?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.