महासंकट काय आहे? महासंकट सात वर्ष राहील हे आपणास कसे ठाऊक आहे?

प्रश्नः महासंकट काय आहे? महासंकट सात वर्ष राहील हे आपणास कसे ठाऊक आहे? उत्तरः महासंकट हा भावी सात वर्षाचा कालखंड आहे जेव्हा देव त्याचे इस्राएलचे अनुशासन समाप्त करेल आणि अविश्वासणार्‍या जगासाठी त्याच्या न्यायाला अंतिम स्वरूप देईल. त्यासर्व लोकांनी बनलेली मंडळी जीने पापासाठी दंडित होण्यापासून स्वतहाला वाचविण्याकरिता प्रभू येशूच्या व्यक्तित्वावर व कार्यावर विश्वास ठेवला आहे ती…

प्रश्नः

महासंकट काय आहे? महासंकट सात वर्ष राहील हे आपणास कसे ठाऊक आहे?

उत्तरः

महासंकट हा भावी सात वर्षाचा कालखंड आहे जेव्हा देव त्याचे इस्राएलचे अनुशासन समाप्त करेल आणि अविश्वासणार्‍या जगासाठी त्याच्या न्यायाला अंतिम स्वरूप देईल. त्यासर्व लोकांनी बनलेली मंडळी जीने पापासाठी दंडित होण्यापासून स्वतहाला वाचविण्याकरिता प्रभू येशूच्या व्यक्तित्वावर व कार्यावर विश्वास ठेवला आहे ती मंडळी महासंकटाच्या दरम्यान उपस्थित रहाणार नाही. अंतराळात उचलले जाणे म्हणून परिचित असलेल्या घटनेत ही मंडळी पृथ्वीवरून दूर नेली जाईल (1थेस्स 4:13-18; 1 करिंथ 15:51-53). येणार्‍या क्रोधापासून मंडळी वाचविली गेली आहे (1थेस्स 5:9). संपूर्ण पवित्र शास्त्रात प्रभूचा दिवस (यशया 2:12; 13:6-9; योएल 1:15; 2:1-31; 3:14; 1 थेस्स 5:2); अरिष्ट व संकट (अनुवाद 4:30; सफन्या 1:1); महासंकट ज्याचा संदर्भ अधिक प्रखरतेने सात वर्षाच्या काळाच्या दुसर्‍या अर्ध्या भागाशी (उत्तरार्धाशी) आहे (मत्तय 24:21); संकटाचा दिवस किवा वेळ (दानिएल 12:1; सफन्या 1:15); यकोबाचा क्लेशमय (यीर्मया 30:7), अश्यासारख्या इतर नावांनी महासंकटाचा संदर्भ दिलेला आहे.

महासंकटाचा उद्देश व त्याची वेळ समजून घेण्यासाठी दानिएल 9:24-27 चे आकलन आवश्यक आहे. हा उतारा 70 सप्तकांविषयी सांगतो जी “तुझ्या लोकांत” विरुद्ध जाहीर केलेली आहेत. दानिएलाचे लोक यहुदी व इस्राएल राष्ट्र आहेत आणि दानिएल 9:24 एका कालखंडाविषयी सांगतो जो देवाने “आज्ञाभंगाची समाप्ति व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा” हे घडून येण्यासाठी दिलेला आहे. देव जाहीर करतो की, “सत्तर सप्तके” ह्यासर्व गोष्टी पूर्ण करतील. ही वर्षांची 70 सप्तके किवा 490 वर्षे आहेत. (काही भाषांतर वर्षांच्या 70 सप्तकांचा संदर्भ देतात). दानिएलातील ह्या शास्त्र भागाच्या दुसर्‍या भागाद्वारे ह्या गोष्टीला बळकटी आणली आहे. दानिएलाला सांगितले आहे की येरुशलेमेचा जिर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून “सात सप्तके व 62 सप्तके (एकूण 69 सप्तके) लोटल्या नंतर अभिषिक्ताचा वध होईल. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर येरुशलेमेचा जिर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून वर्षांच्या 69 सप्तकानंतर (483 वर्ष ) अभिषिक्ताचा वध होईल. पवित्र शास्त्र विषयक इतिहासकारांनी खात्री केली आहे की, येरुशलेमेचा जिर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून येशू वधस्तंभावर खिळला जाई पर्यंत 483 वर्षांचा काळ लोटला गेला आहे. त्यांच्या स्वर्ग व नर्काच्या सिद्धांताच्या (भावी गोष्टी –घटना) दृष्टीकोणाकडे लक्ष न देता पुष्कळ ख्रिस्ती विद्वानांना दानिएलाच्या 70 सप्तकांविषयी वरील आकलन आहे.

येरूशलेमेचा जिर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्ताचा वध होईपर्यंत 483 वर्षांचा काळ लोटला जाण्यासोबत, दानिएल 9:24 च्या भाषेत एक सात वर्षाचा काळ पूर्ण होण्यासाठी शिल्लक राहतो: “आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावे आणि जो परम पवित्र त्याला अभिषेक करावा”. हा शेवटचा सात वर्षांचा काळ महासंकटाचा काळ म्हणून ओळखला जातो-ती एक अशी वेळ आहे जेव्हा देव त्याच्या पापासाठी इस्राइलचा न्याय करण्याची प्रक्रिया पूर्ण करतो.

सात वर्षाच्या महासंकटाच्या काळाच्या अल्प ठळक गोष्टी दानिएल 9:27 मध्ये दिल्या आहेत: “तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करील; अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबलि बंद करील, उध्वस्त करणारा अमंगलाच्या पंखांवर आरुढ होवून येईल व ठरलेल्या समाप्ती पर्यंत उध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.” हे वचन ज्या व्यक्तीबद्दल सांगितले आहे त्या व्यक्तिविषयी येशू म्हणतो “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” (मत्तय 24:15), आणि प्रकटीकरण 13मध्ये त्या व्यक्तिला “श्वापद” म्हटले आहे. दानिएल 9:27 म्हणते की श्वापद सात वर्षांसाठी एक करार करेल, परंतू ह्या सप्तकाच्या मध्यभागी (साडेतीन वर्ष महासंकटाच्या काळात) यज्ञबली बंद करून तो हा करार मोडेल. प्रकटीकरण 13 स्पष्टीकरण करते की श्वापद त्याच्या स्वतहाची मूर्ति मंदिरात ठेवेल आणि जगाला त्याची उपासना करण्यासाठी भाग पाडेल. प्रकटीकरण 13:5 सांगते की श्वापद 42 महिन्याच्या कालावधीसाठी हे करेल तेव्हा ते पाहणे सोपे आहे ही एकूण वेळेची लांबी 84 महीने किवा 7 वर्षे आहे. दानिएल 7:25 सुद्धा पहा जेथे एक काळ, दोन काळ व अर्धा काळ (एक काळ=1वर्ष, दोन काळ=2वर्ष, अर्धा काळ=अर्धा वर्ष, एकूण साडेतीन वर्षांचा काळ) ह्याचा संदर्भसुद्धा “महासंकटाच्या” काळाशी आहे, सात वर्षाच्या महासंकटाच्या काळाचा शेवटचा अर्धा भाग तेव्हा श्वापदाचा अधिकार असेल.

महासंकटाविषयी पुढील संदर्भान्साठी प्रकटीकरण 11:2-3 पहा, 1260 दिवस व 42 महिन्यांविषयी सांगते आणि दानिएल 12:11-12 पहा जे 1290 दिवस व 1335 दिवसांविषयी सांगते. दानिएल 12 मध्ये असलेल्या जादा दिवसात राष्ट्रांच्या न्यायासाठी शेवटचा काळ (मत्तय 25:31-46) आणि ख्रिस्ताच्या हजार वर्षाच्या राज्याला उभारण्यासाठी लागणारा काळ (प्रकटीकरण 20:4-6) समाविष्ट असू शकतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

महासंकट काय आहे? महासंकट सात वर्ष राहील हे आपणास कसे ठाऊक आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.