मी ख्रिस्ती कसा बनू शकतो?

प्रश्नः मी ख्रिस्ती कसा बनू शकतो? उत्तरः ख्रिस्ती बनण्याचे पहिले पाऊल हे समजणे आहे की “ख्रिस्ती” या शब्दाचा अर्थ कार्य आहे. “ख्रिस्ती” हा मूळ शब्द पहिल्या शतकातील अंताकिया नगरात आला (प्रे. कृत्ये 11:26). हे शक्य आहे की पहिल्यांदा, “ख्रिस्ती” या शब्दाचा हेतू अपमान करणे होता. या शब्दाचा अर्थ मुख्यत्वेकरून आहे “लहान ख्रिस्त.” तथापि, मागील शतकांत,…

प्रश्नः

मी ख्रिस्ती कसा बनू शकतो?

उत्तरः

ख्रिस्ती बनण्याचे पहिले पाऊल हे समजणे आहे की “ख्रिस्ती” या शब्दाचा अर्थ कार्य आहे. “ख्रिस्ती” हा मूळ शब्द पहिल्या शतकातील अंताकिया नगरात आला (प्रे. कृत्ये 11:26). हे शक्य आहे की पहिल्यांदा, “ख्रिस्ती” या शब्दाचा हेतू अपमान करणे होता. या शब्दाचा अर्थ मुख्यत्वेकरून आहे “लहान ख्रिस्त.” तथापि, मागील शतकांत, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यानी येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून स्वतःची ओळख दाखविण्यासाठी “ख्रिस्ती” या शब्दाचा स्वीकार केला. ख्रिस्ती या शब्दाची सोपी व्याख्या आहे असा व्यक्ती जो येशू ख्रिस्ताचे अनुसरण करतो.

मी ख्रिस्ती का बनावे?

येशू ख्रिस्ताने ही घोषणा केली की “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तिसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे” (मार्क 10:45). मग प्रश्न उद्भवतो – आम्हाला मुक्ति मिळविण्याची गरज का होती? खंडणीची कल्पना ती किंमत आहे जी व्यक्तीला सोडविण्याच्या मोबदल्यात दिली जावी. अपहरणाच्या घटनांमध्ये कित्येकदा मुक्तीसाठी खंडणीच्या कल्पनेचा उपयोग केला जातो, ज्यात अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीला तोपर्यंत बंधक बनवून ठेवले जाते जोपर्यंत त्याच्या सुटकेसाठी किंमत दिली जात नाही.

आम्हाला दासत्वाच्या बंधनातून सोडविण्यासाठी येशूने खंडणी म्हणून किंमत दिली! कसले बंधन? पाप आणि त्याच्या परिणामांचे बंधन, देवापासून सार्वकालिक विभक्तीनंतर भौतिक मृत्यू. येशूला ही खंडणी देण्याची गरज का होती? कारण आम्हां सर्वांना पापाचा संसर्ग आहे (रोम. 3:23), आणि म्हणून देवापासून न्यायदंडास पात्र आहोत (रोम. 6:23). येशूने आमची खंडणी कशी दिली? आमच्या पापांचा भुर्दंड चुकविण्यासाठी वधस्तंभावर मरण्याद्वारे (1 करिंथ. 15:3; 2 करिंथ. 5:21). येशूच्या मृत्यूने आम्हां सर्वांच्या पापांची किंमत पर्याप्तपणे कशी चुकविली? येशू मानव रूपात परमेश्वर होता, देव आमच्यापैकी एक बनण्यासाठी पृथ्वीवर आला यासाठी की त्याने आम्हांसमान व्हावे आणि आमच्या पापांसाठी मरावे (योहान 1:1,14). देव म्हणून, येशूच्या मृत्यूचे अनंत मोल होते, जे संपूर्ण जगाच्या पापांचा दंड देण्यासाठी पुरेसे होते (1 योहान 2:2). येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या पुनरुत्थानाने हे दाखवून दिले की त्याच्या मृत्यू पुरेसे बलिदान होते, ज्याने खरोखर पाप आणि मृत्यू यावर विजय मिळविला.

मी ख्रिस्ती कसा बनू शकतो?

हा सर्वोत्तम भाग आहे. आमच्या प्रीत्यर्थ त्याच्या प्रेमामुळे, ख्रिस्ती बनणे देवाने अत्यंत सोपे केले. आपणास आपल्या पापांकरिता पुरेसे बलिदान म्हणून येशूच्या मृत्यूचा पूर्ण स्वीकार करून त्याला आपला तारणारा म्हणून ग्रहण करावयाचे आहे (योहान 3:16), पूर्णपणे आपला तारणारा म्हणून केवळ त्याच्यावर विश्वास ठेवावयाचा आहे (योहान 14:6; प्रे. कृत्ये 4:12). ख्रिस्ती बनणे म्हणजे विधि संस्कारांचे पालन करणे, चर्चला जाणे, अथवा काही विशिष्ट गोष्टी करणे व इतर गोष्टींपासून दूर राहणे नव्हे. ख्रिस्ती बनणे म्हणजे येशू ख्रिस्तासोबत व्यक्तीगत नाते स्थापन करणे होय. विश्वासाद्वारे येशू ख्रिस्तासोबत वैय्यक्तिक नाते व्यक्तीस ख्रिस्ती बनविते.

आपण ख्रिस्ती बनावयास तयार आहा का?

जर आपण येशू ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करण्याद्वारे ख्रिस्ती बनावयास तयार आहात, तर आपणास फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपणास हे समजते का व आपला हा विश्वास आहे का की आपण पाप केले आहे आणि परमेश्वरापासून न्यायदंडास पात्र आहा? आपणास हे समजते का व आपला हा विश्वास आहे का की येशूने आपली शिक्षा स्वतःवर घेतली व तो आपल्या जागी मरण पावला? आपणास हे समजते का व आपला हा विश्वास आहे का की त्याच्या मृत्यू आपल्या पापांची किंमत चुकवावयास पुरेसे बलिदान होता? जर या तीन प्रश्नांची उत्तरे आपण होय म्हणून देत असाल, तर आपला तारणारा म्हणून येशूठायी विश्वास ठेवा. विश्वासाने त्याच्या स्वीकार करा, केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा. ख्रिस्ती बनण्यासाठी इतकेच काय ते हवे!

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

मी ख्रिस्ती कसा बनू शकतो?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.