येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान सत्य आहे का?

प्रश्नः येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान सत्य आहे का? उत्तरः पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताचे मृत्युनंतर पुनरुत्थान झाले याबद्दल निर्णायक पुरावा सादर करतात. येशूच्या पुनरुत्थानाचे मत्तय 28: 1-20; मार्क 16: 1-20; लूक 24: 1-53; आणि योहान 20: 1-21: 25 मध्ये पुरावे सादर केले आहे. पुनरुत्थान झालेला ख्रिस्त इतिहासाच्या पुस्तकात देखील दिसून येतो (प्रेषितांची कृत्ये 1: 1-11). या अहवालांत…

प्रश्नः

येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान सत्य आहे का?

उत्तरः

पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताचे मृत्युनंतर पुनरुत्थान झाले याबद्दल निर्णायक पुरावा सादर करतात. येशूच्या पुनरुत्थानाचे मत्तय 28: 1-20; मार्क 16: 1-20; लूक 24: 1-53; आणि योहान 20: 1-21: 25 मध्ये पुरावे सादर केले आहे. पुनरुत्थान झालेला ख्रिस्त इतिहासाच्या पुस्तकात देखील दिसून येतो (प्रेषितांची कृत्ये 1: 1-11). या अहवालांत तुम्हाला येशूच्या पुनरुत्थानाचे अनेक “पुरावे” प्राप्त होऊ शकतात. प्रथम शिष्यांमध्ये नाट्यमय बदल आहे. ते घाबरलेल्या आणि लपलेल्या पुरुषांच्या गटापासून परिवर्तीत होऊन जगात सुवार्ताचे मजबूत आणि शूर साक्षीदार झाले. त्यांच्या मध्ये नाट्यमय बदल फक्त त्यांनी पाहिलेल्या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातुंच घडू शकते, दुसरे काय?

दुसरे प्रेषित पौलाचे जीवन आहे. चर्चचा छळ करणारा पासून त्याला चर्चच्या प्रेषिता मध्ये कसे बदलले गेले? जेंव्हा पुनर्जीवित ख्रिस्ताने त्याला दमास्कस रस्त्यावर दर्शन दिले तेंव्हा त्यामध्ये आमुलाग्र बदल झाला(प्रेषितांची कृत्ये 9:1-6). तिसरा ठोस पुरावा रिक्त थडगे आहे. ख्रिस्त मरणातून जागा झाला नसता तर त्याचे शरीर कोठे गेले ? शिष्य आणि इतर लोकांनी जेथे त्याला दफन करण्यात आले होते ते कबर पाहिले. ते परत आले तेव्हा त्याचे शरीर तेथे नव्हते. देवदूताने घोषित केले की (मत्तय 28: 5-7) त्याने जाहीर केल्या प्रमाणे येशू मरणातून उठला. त्याच्या पुनरुत्थानाचा चौथा आणि अतिरिक्त पुरावा म्हणजे त्याने अनेक लोकांना दिलेले दर्शन होय. (मत्तय 28: 5, 9, 16-17; मार्क 16: 9; लूक 24: 13-35 योहान 20:19, 24, 26-29, 21 : 1-14; प्रेषितांची कृत्ये 1: 6-8; 1 करिंथकर 15: 5-7).

येशूच्या पुनरुत्थानाचा दुसरा पुरावा म्हणजे प्रेषितांनी येशूच्या पुनरुत्थानाला दिलेले सर्वात जास्त महत्व आहे. येशूच्या पुनरुत्थानाचा एक महत्वाचा उतारा 1 करिंथकर 15 या प्रकरणा मध्ये आहे, या मध्ये येशूच्या पुनरुत्थानाला समजणे आणि त्यात विश्वास ठेवणे महत्वाचे आहे हे प्रेषित पौलाने स्पष्ट केले आहे. पुनरुत्थान खालील कारणांसाठी महत्त्वाचे ठरते: 1) जर ख्रिस्त मरणातून उठविला गेला नसता, तर श्रद्धाळू लोक सुद्धा नसते (1 करिंथकर 15: 12-15). 2) ख्रिस्त मरणातून उठविला गेला नाही, तर पापासाठी त्याचे बलिदान पुरेसे ठरले नसते (1 करिंथकर 15: 16-19) होते. येशूचे पुनरुत्थानाद्वारे ईश्वराने त्याचा मृत्यु आपल्या पापांचे प्रायश्चित म्हणून स्वीकारले होते असे सिद्ध करते. तो फक्त मरण पावला असता व मृत पडून राहिला असता, तर असे सूचित झाले असते की त्याचे बलिदान पुरेसे नव्हते. त्याचा परिणाम म्हणून, विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्यांच्या पापांसाठी क्षमा मिळाली नसती आणि ते मेल्यानंतर (1 करिंथकर 15: 16-19) मेलेलेच राहीले असते. अनंतकाळचे जीवन (योहान 3:16) म्हणून अशी काही गोष्ट होणार नव्हती. “पण आता प्रत्यक्षात ख्रिस्त मृत्यूतून उठविला गेला आहे, जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे” (1 करिंथकर 15:20 एनएएस).

शेवटी, पवित्र शास्त्र हे गोष्ट स्पष्ट करते की येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अनंतकाळचे जीवन (1 करिंथकर 15: 20-23) प्राप्त होईल. प्रथम करिंथकर 15 येशूच्या पुनरुत्थानामुळे त्याने पापावर कसा विजय मिळविला आणि पापावर विजय मिळून जगण्यासाठी शक्ती प्रदान करतो त्याचे वर्णन केले आहे(1 करिंथकर 15: 24-34). हे आम्हाला प्राप्त होणार्या पुनरुत्थान तेजस्वी शरीराच्या रूपाचे वर्णन करतो (1 करिंथकर 15: 35-49). ते येशूच्या पुनरुत्थानाचे एक परिणाम म्हणून, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांना मृत्यू वर अंतिम विजय मिळून देईल असे घोषित करते (1 करिंथकर 15: 50-58).

ख्रिस्ताचे पुनरुत्थान किती तेजस्वी सत्य आहे! “म्हणून, माझ्या प्रिय बंधूंनो, दृढ उभे राहा. कशानेही विचलित होऊ नका. नेहमी प्रभुमध्ये स्वतःला लीन करा तुम्हाला माहित आहे की तुमचे काम व्यर्थ जाणार नाही (1 करिंथकर 15:58). बायबल नुसार, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान निश्चितपणे खरे आहे. बायबल पुनरुत्थानाचे नोंद करते, या घटनेचे 400 लोक साक्षीदार होते असे त्यात नोंदविलेले आहे, आणि पुढे येशूच्या पुनरुत्थानाचे ऐतिहासिक सत्य म्हणून महत्त्वपूर्ण ख्रिश्चन शिकवण तयार केली.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान सत्य आहे का?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.