येशू विवाहित होता का?

प्रश्नः येशू विवाहित होता का? उत्तरः येशू ख्रिस्त निश्चितपणे विवाहित नव्हता. आज असे मिथक प्रचलित आहेत जी ख्रिस्ताचे मरीया मगदलीनीशी लग्न झाल्याचे सांगतात. ही मान्यता पूर्णपणे खोटी आहे आणि त्याला धर्मसिद्धान्ताच्या दृष्टीने, ऐतिहासिकदृष्ट्या किंवा बायबलच्या दृष्टीने यास कोणताही आधार नाही. काही नॉस्टिक शुभवर्तमानांत येशूचा मरीया मग्दालीनीशी घनिष्ट संबंध असल्याचा उल्लेख आहे, परंतु त्यांच्यापैकी कोणीही असे…

प्रश्नः

येशू विवाहित होता का?

उत्तरः

येशू ख्रिस्त निश्चितपणे विवाहित नव्हता. आज असे मिथक प्रचलित आहेत जी ख्रिस्ताचे मरीया मगदलीनीशी लग्न झाल्याचे सांगतात. ही मान्यता पूर्णपणे खोटी आहे आणि त्याला धर्मसिद्धान्ताच्या दृष्टीने, ऐतिहासिकदृष्ट्या किंवा बायबलच्या दृष्टीने यास कोणताही आधार नाही. काही नॉस्टिक शुभवर्तमानांत येशूचा मरीया मग्दालीनीशी घनिष्ट संबंध असल्याचा उल्लेख आहे, परंतु त्यांच्यापैकी कोणीही असे सांगत नाही की येशू मरीया मग्दलीनीशी लग्न करतो, किंवा तिचा तिच्याशी कोणत्याही प्रकारचा प्रेमसंबंध होता. त्यांच्यातील सर्वात जवळचे कोणीतरी असे म्हणत आहे की येशूने मरीया मगदलीनीचे चुंबन घेतले, जे अगदी सहजपणे “मैत्रीपूर्ण चुंबन” चा संदर्भ असू शकते.पुढे, नॉस्टिक शुभवर्तमानामध्ये येशूने मरीया मग्दालीनीशी लग्न केल्याचे म्हटले असते तरीही त्यांस कोणताही अधिकार नव्हता कारण नॉस्टिक शुभवर्तमान बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यांची निर्मिती येशू ख्रिस्ताचा नॉस्टिक दृष्टिकोण देण्यासाठी करण्यात आली होती.

जर येशू विवाहित झाला असता तर बायबलमध्ये तसे सांगितले असते किंवा त्या वस्तुस्थितीबद्दल काही अस्पष्ट विधान दिले असते. अशा महत्त्वपूर्ण विषयावर पवित्र शास्त्र पूर्णपणे गप्प बसले नसते. बायबलमध्ये येशूची आई, दत्तक वडील, सावत्र भाऊ आणि सावत्र बहिणींचा उल्लेख आहे. येशूला एक पत्नी होती हे सांगण्याकडे ते का दुर्लक्ष करील? ज्यांनी विश्वास ठेवला/ शिकविले की येशू विवाहित होता, ते त्याला “मानवीय” बनविण्याच्या प्रयत्नात असे करत आहेत, जेणेकरून तो सामान्य, इतरांसारखा ठरेल. येशू फक्त देहधारी परमेश्वर होता यावर लोकांचा विश्वास ठेवू इच्छित नाहीत (योहान 1:1, 14; 10:30). म्हणूनच, ते येशूचे लग्न, मुले व एक सामान्य माणूस असल्याच्या कल्पित गोष्टी शोधून काढतात आणि त्यावर विश्वास ठेवतात.

दुय्यम प्रश्न असा होईल की, “येशू ख्रिस्त लग्न करू शकत होता?” लग्न केल्याबद्दल कोणतेही पाप नाही. विवाहामध्ये लैंगिक संबंध ठेवण्याविषयी काहीच पाप नाही. तर, होय, येशू विवाह करू शकला असता आणि तरीही तो देवाचा निष्पाप कोकरा आणि जगाचा तारणारा होऊ शकला असता. त्याचवेळी, येशू लग्न करावे असे बायबल आधारित कोणतेही कारण नाही. या वादाचा मुद्दा हा नाही. जे लोक येशू विवाहित होता असा विश्वास करतात तो असा विश्वास ठेवत नाही की तो निष्पाप आहे, किंवा तो मशीहा आहे. लग्न करण्यासाठी आणि मुलांस जन्म देण्यासाठी देवाने येशूला जगात पाठविले नाही. मार्क 10:45 आम्हाला सांगते की येशू का आला, “कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे.”

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

येशू विवाहित होता का?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.