शांत प्रार्थना – हे पवित्र शास्त्रीय आहे काय?

प्रश्नः शांत प्रार्थना – हे पवित्र शास्त्रीय आहे काय? उत्तरः पावित्र शास्त्र आपल्याला हन्नाच्या आवाज न येणाऱ्या शांत प्रार्थनेचे उदाहरण देते (1 शमुवेल 1:10,13), परंतु शांतपणे प्रार्थना करण्याच्या कोणत्याची सूचना यामध्ये पाहायला मिळत नाहीत. याचा अर्थ असा नाही की शांत प्रार्थना मोठ्याने प्रार्थना करण्यापेक्षा कमी वैध आहे – हन्नाच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यात आले होते. देव…

प्रश्नः

शांत प्रार्थना – हे पवित्र शास्त्रीय आहे काय?

उत्तरः

पावित्र शास्त्र आपल्याला हन्नाच्या आवाज न येणाऱ्या शांत प्रार्थनेचे उदाहरण देते (1 शमुवेल 1:10,13), परंतु शांतपणे प्रार्थना करण्याच्या कोणत्याची सूचना यामध्ये पाहायला मिळत नाहीत. याचा अर्थ असा नाही की शांत प्रार्थना मोठ्याने प्रार्थना करण्यापेक्षा कमी वैध आहे – हन्नाच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यात आले होते. देव जितक्या सहजपणे आपले शब्द ऐकू शकतो तितक्याच सहजतेने तो आपले विचारही ऐकू शकतो (सोत्रसंहिता 139:23; यीर्मया 12:3). येशुंना परुशी लोकांचे दुष्ट विचार माहित होते (मत्तय 12:24-26; लूक 11:17). ज्याला आपले विचार जाणून घेण्यासाठी आपले शब्द ऐकण्याची गरज नाही त्या आपल्या देवाकडून आपण जे काही करू, बोलू किंवा विचार करू ते लपलेले नाही. आपण बोललेल्या किंवा न बोलता त्याचाकडे केलेल्या सर्व प्रार्थना त्याच्याकडे आहेत.

पवित्र शास्त्रामध्ये एकांतात प्रार्थना केल्याचा उल्लेख आहे (मत्तय 6:6). आपण स्वतःहून केलेल्या मोठ्या किंवा शांत प्रार्थनेमध्ये काय फरक आहे? अशा काही परिस्थिती असतात जिथे फक्त शांत प्रार्थना करणेच योग्य असते, उदा. अशा काही बाबींसाठी प्रार्थना करणे ज्या फक्त तुमच्या आणि देवामध्येच असणे गरजेचे आहे, कोणासाठी तरी प्रार्थना करणे जे उपस्थित आहेत, इत्यादी. प्रार्थना करण्याची तुम्हाला लाज वाटत नसेल तर शांत प्रार्थना करणे चुकीचे नाही.

1 थेस्सलनीकाकरांस पत्र 5:17: “निरंतर प्रार्थना करा” हे शांत प्रार्थनेचे औचित्य दाखविणारे सर्वोत्कृष्ट वचन आहे. निरंतर प्रार्थना करणे याचा अर्थ असा नाही की आपण सर्व वेळ मोठ्याने प्रार्थना करत आहोत. त्याऐवजी, याचा अर्थ असा आहे की आपणत सतत दैवीय-विवेक असलेल्या स्थितीत आहोत, जिथे आपण प्रत्येक विचार त्याच्याकडे बंदिवासात नेतो (2 करिंथकरांस पत्र 10: 5) आणि प्रत्येक घटना, योजना, भीती किंवा चिंता देवाच्या सिंहासनासमोर आणतो. निरंतर प्रर्थनेमध्ये बोललेल्या प्रार्थना, पुटपुटलेल्या प्रार्थना, ओरडून केलेल्या प्रार्थना, गाऊन केलेल्या प्रार्थना आणि शांत प्रार्थना यांच्या समावेश आहे ज्यांच्याद्वारे आपण स्तुतीचे विचार, विनवणी, मागणी आणि आभार देवाकडे सादर करतो.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

शांत प्रार्थना – हे पवित्र शास्त्रीय आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.