शेवटच्या काळाचा प्रिटेरिस्ट म्हणजे भूतकालिक दृष्टिकोण काय आहे?

प्रश्नः शेवटच्या काळाचा प्रिटेरिस्ट म्हणजे भूतकालिक दृष्टिकोण काय आहे? उत्तरः प्रिटेरिझमनुसार बाइबलची सर्व भविष्यवाणी खरोखर इतिहास आहे. पहिल्या शतकातील प्रिटेरिस्टद्वारे करण्यात आलेली पवित्र शास्त्राची व्याख्या प्रकटीकरणाच्या पुस्तकास पहिल्या शतकातील संघर्षांचे प्रतिकात्मक चित्र म्हणून करते, शेवटच्या काळी काय घडेल त्याचे वर्णन म्हणून नव्हे. प्रिटेरिझम हा शब्द लैटिन भाषेतील प्रेटेर ह्या शब्दातून आला आहे, त्याचा अर्थ आहे…

प्रश्नः

शेवटच्या काळाचा प्रिटेरिस्ट म्हणजे भूतकालिक दृष्टिकोण काय आहे?

उत्तरः

प्रिटेरिझमनुसार बाइबलची सर्व भविष्यवाणी खरोखर इतिहास आहे. पहिल्या शतकातील प्रिटेरिस्टद्वारे करण्यात आलेली पवित्र शास्त्राची व्याख्या प्रकटीकरणाच्या पुस्तकास पहिल्या शतकातील संघर्षांचे प्रतिकात्मक चित्र म्हणून करते, शेवटच्या काळी काय घडेल त्याचे वर्णन म्हणून नव्हे. प्रिटेरिझम हा शब्द लैटिन भाषेतील प्रेटेर ह्या शब्दातून आला आहे, त्याचा अर्थ आहे “भूतकाळ.” अशाप्रकारे, प्रिटेरिझम असा दृष्टिकोण आहे की “शेवटच्या काळासंबंधाने” बायबलच्या भविष्यवाण्या आधीच पूर्ण झाल्या आहेत — भूतकाळात. प्रिटेरिझम हे फ्यूचरिझम म्हणजे भविष्यकाळवादाच्या विरुद्ध आहे, जे शेवटच्या काळातील भविष्यवाण्यांकडे भविष्यातील परिपूर्णता या दृष्टीने पाहते.

प्रिटेरिझमचे दोन प्रकार आहेत: पूर्ण (अथवा सतत) भूतकालिक आणि आंशिक भूतकालिक. ह्या लेखात आपली चर्चा पूर्ण भूतकालिकपुरती मर्यादित आहे (किंवा जसे काही लोक म्हणतात त्याप्रमाणे, हायपर-प्रिटेरिझम).

प्रिटेरिझम प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या भविष्यातील भविष्यवादी गुणाचा नाकार करतो. प्रिटेरिस्ट चळवळ मुख्यत्वेकरून हे शिकविते की नव्या करारातील सर्व युगाच्या समाप्तीच्या भविष्यवाण्या सन् 70 मध्ये पूर्ण झाल्या जेव्हा रोमने यरूशलेमवर हल्ला केला व त्याचा नाश केला. प्रिटेरिझम हे शिकविते की प्रत्येक घटना सामान्यतः शेवटच्या काळाशी — ख्रिस्ताच्या द्वितीय आगमानाशी, क्लेशकाळाशी, मृतांच्या पुनरुत्थानाशी, शेवटच्या न्यायाशी संबंधित आहेत — त्या आधीच घडून चुकल्या आहेत. (शेवटच्या न्यायाबाबत, ती प्रक्रिया अद्याप पूर्ण होत आहे.) पृथ्वीवर येशूचे आगमन “आध्यात्मिक” असेल, भौतिक नव्हे.

प्रिटेरिझम हे शिकविते की नियमशास्त्र सन 70 मध्ये पूर्ण झाले होते आणि इस्राएलासोबत देवाचा करार पूर्ण झाला होता. प्रकटीकरण 21:1 मध्ये म्हटलेले “नवे आकाश व नवी पृथ्वी”, प्रिटेरिस्ट म्हणजे भूतकाळवाद्यासाठी, नवीन कराराधीन जगाचे वर्णन आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीस “नवी उत्पत्ति” असे घडविण्यात आले आहे (करिंथकरांस 2 रे पत्र 5:17), त्याचप्रमाणे नवीन कराराधीन जग ही “नवीन पृथ्वी” आहे. प्रिटेरिझमचा हा पैलू सहज प्रतिस्थापन धर्मविज्ञानातील श्रद्धेकडे सहज प्रवृत्त करू शकतो.

आपल्या वादविवादास बळ देण्यासाठी प्रिटेरिस्ट सामान्यतः येशूच्या जैतून डोंगरावरील व्याख्यानातील एका परिच्छेदाकडे इशारा करतात. युगाच्या समाप्तीच्या काही घटनांचे वर्णन केल्यानंतर, येशू म्हणतो, “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही” (मत्तय 24:34). प्रिटेरिस्ट याचा अर्थ असा लावतात की मत्तय 24 मध्ये येशू जे काही म्हणतो ते त्याच्या बोलण्याच्या एक पीढीच्या आत घडलेले असावे — म्हणून सन 70 मध्ये यरूशलेमेचा नाश “न्यायाचा दिवस” होता.

प्रिटेरिझमशी संबंधित अनेक समस्या आहेत. कारण पहिले म्हणजे, इस्राएलासोबत देवाचा करार सनातनकाळचा आहे (यिर्मया 31:33-36), आणि भविष्यात इस्राएलचे पुनस्र्थापन होईल (यशया 11:12). प्रेषित पौलाने अशा लोकांविरुद्ध ताकीद दिली आहे जे, हुमनाए व फिलेतप्रमाणे, चुकीने शिकवितात “की पुनरुत्थान होऊन गेले आहे, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात” (तीमथ्याला 2 रे पत्र 2:17-18). आणि आपण “ही पिढी” म्हणून येशूने केलेल्या उल्लेखाचा असा अर्थ लावावा की जी पिढी मत्तय 24 मध्ये वर्णन करण्यात आलेल्या घटनांची सुरूवात पाहण्यास जीवंत आहे.

युगाची समाप्ती हा गुंतागुंतीचा विषय आहे, आणि अनेक भविष्यवाण्यांचे कथन करण्यासाठी बायबलच्या शेवटच्या काळाच्या प्रतिमासृष्टीने शेवटच्या काळातील घटनांच्या विविध व्याख्या तयार केल्या आहेत. ह्या गोष्टींबाबत ख्रिस्ती लोकांत काही मतभेदांसाठी जागा आहे. तथापि, पूर्ण भूतकाळवादात काही गंभीर दोष आहेत ज्यात तो ख्रिस्ताच्या दुसर्या आगमनाच्या भौतिक सत्यतेचा नाकार करतो आणि त्या घटनांस यरूशलेमाच्या पतनापुरते मर्यादित करून क्लेशकाळाचे भयानक स्वरूप कमी करते.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

शेवटच्या काळाचा प्रिटेरिस्ट म्हणजे भूतकालिक दृष्टिकोण काय आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.