सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय?

प्रश्नः सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय? उत्तरः सहस्त्राब्दिपूर्ववाद हे मत आहे की ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या हजार वर्षांच्या राज्यापूर्वी घडून येईल, आणि सहस्त्राब्दि राज्य हे अक्षरशः ख्रिस्ताचे पृथ्वीवरील हजार-वर्षांचे राज्य होय. शेवटच्या काळातील घटनांशी संबंधित पवित्र शास्त्रातील परिच्छेद समजण्यासाठी आणि त्यांचा अर्थ लावण्यासाठी, दोन गोष्टी स्पष्टपणे समजल्या पाहिजेत: पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्याची योग्य पद्धत आणि इस्राएल (यहूदी)…

प्रश्नः

सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय?

उत्तरः

सहस्त्राब्दिपूर्ववाद हे मत आहे की ख्रिस्ताचे दुसरे आगमन त्याच्या हजार वर्षांच्या राज्यापूर्वी घडून येईल, आणि सहस्त्राब्दि राज्य हे अक्षरशः ख्रिस्ताचे पृथ्वीवरील हजार-वर्षांचे राज्य होय. शेवटच्या काळातील घटनांशी संबंधित पवित्र शास्त्रातील परिच्छेद समजण्यासाठी आणि त्यांचा अर्थ लावण्यासाठी, दोन गोष्टी स्पष्टपणे समजल्या पाहिजेत: पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्याची योग्य पद्धत आणि इस्राएल (यहूदी) आणि चर्च (ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणार्यांची मंडळी) यांच्यातील फरक.

सर्वप्रथम, पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्यासाठी अथवा त्याची व्याख्या करण्यासाठी पवित्र शास्त्राचा अर्थ अशा पद्धतीने लावला जावा जो त्याच्या संदर्भाशी संगतवार आहे. याचा अर्थ असा की परिच्छेदाचा अर्थ अशा पद्धतीने लावला जावा जी त्या श्रोत्यांस साजेशी असावी ज्यांच्यासाठी तो लिहिण्यात आला आहे, ज्यांच्याविषयी तो लिहिण्यात आला आहे, ज्याच्याद्वारे तो लिहिण्यात आला आहे, इत्यादी. लेखक कोण आहे हे, श्रोते कोण असावेत हे, आणि आम्ही व्याख्या करीत असलेल्या प्रत्येक परिच्छेदाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी जाणून घेणे महत्वाचे आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मांडणी बहुधा परिच्छेदाचा योग्य अर्थ प्रगट करील. हे देखील स्मरण करणे महत्वाचे आहे की पवित्र शास्त्र हे पवित्र शास्त्राचा अर्थ लावते. अर्थात, बरेचदा परिच्छेदात असा विषय असतो ज्यास बायबलमध्ये इतरत्र देखील संबोधित केलेले असते. ह्या सर्व परिच्छेदांचा संगतवारपणे एकमेकांशी अर्थ लावणे महत्वाचे आहे.

शेवटी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, जोवर परिच्छेदाचा संदर्भ हे दाखवीत नाही की त्याचे स्वरूप अलंकारिक आहे तोवर परिच्छेदांचा अर्थ त्यांच्या सामान्य, नियमित, स्पष्ट, शाब्दिक अर्थात लावला जावा. शब्दशः केलेली व्याख्या वापरण्यात आलेल्या अलंकाराची शक्यता खारीज करीत नाही. तर, तो परिच्छेद व्याख्याकारास प्रोत्साहन देतो की जोवर अलंकारिक भाषेचा अर्थ त्या संदर्भासाठी योग्य ठरत नाही तोवर त्याने त्याचा अर्थ लावता कामा नये. हे निर्णयाक आहे की मांडण्यात आलेल्या अर्थापेक्षा “सखोल, जास्त आध्यात्मिक” अर्थ कधीही शोधता कामा नये. परिच्छेदाचे आध्यात्मिकरण हे धोक्याचे आहे कारण ते पवित्र शास्त्राच्या यथार्थ अर्थबोधाचा आधार वाचकाच्या मनापर्यंत पोहोचविते. मग, अर्थबोधासाठी अथवा व्याख्यासाठी कुठलाच वस्तुनिष्ठ मापदंड राहू शकत नाही; त्याऐवजी, पवित्र शास्त्र प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीत त्याचा अर्थ काय आहे ह्या स्वतःच्या मतावर अवलंबून राहतो. दुसरे पेत्र 1:20-21 आम्हास स्मरण घडवून देते की “शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला.”

बायबलच्या व्याख्यासाठी अथवा अर्थबोधासाठी हे सिद्धांत लागू करीत असतांना, हे पाहिले पाहिजे की इस्राएल (अब्राहामाचे शारीरिक वंशज) आणि चर्च (सर्व नवीन कराराचे विश्वासणारे) दोन विशिष्ट समूह आहेत. हे ओळखणे महत्वाचे आहे की इस्राएल आणि मंडळी भिन्न आहेत कारण, जर याचा चुकीचा अर्थ लावला गेला, तर पवित्र शास्त्राचा चुकीचा अर्थ लावला जाईल. विशेषेकरून त्या परिच्छेदांचा चुकीचा अर्थ लावणे शक्य आहे जे इस्राएलास देण्यात आलेल्या अभिवचनांशी संबंधित आहेत (पूर्ण झालेले आणि पूर्ण न झालेले). अशी अभिवचने मंडळीस लागू करता कामा नयेत. लक्षात ठेवा, परिच्छेदाचा संदर्भ हे ठरविल की तो कोणास संबोधित करण्यात आला आहे आणि सर्वाधिक योग्य व्याख्याकडे निर्देश करील.

ह्या संकल्पना मनात ठेवून, आपण पवित्र शास्त्राच्या अशा विभिन्न परिच्छेदांकडे पाहू शकतो जे सहस्त्राब्दिपूर्व दृष्टिकोण उत्पन्न करतात. उत्पत्ती 12:1-3: “परमेश्वराने अब्रामास सांगितले, ‘तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखविन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन; तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभीष्ठ चिंतितील त्यांचे मी अभीष्ठ करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.'”

देव येथे अब्राहामास तीन गोष्टींचे अभिवचन देत आहेः अब्राहामाद्वारे अनेक वंश उत्पन्न होतील, ह्या राष्ट्राजवळ एक देश असेल व ते त्यात वस्ती करतील, आणि अब्राहामाच्या वंशाद्वारे (यहूदी) अखील मानवजातीस सार्वत्रिक आशीर्वाद प्राप्त होईल. उत्पत्ती 15:9-17 यात, देव अब्राहामासोबत त्याच्या करारास मंजूदी देतो. ज्या पद्धतीने हे केले जाते, त्याद्वारे देव कराराची एकमात्र जबाबदारी स्वतःवर घेतो. अर्थात, अब्राहामास करता येईल असे काही नव्हते ज्याद्वारे अथवा तो तसे करावयास चुकल्यास देवाने केलेला करार व्यर्थ ठरला असता. तसेच ह्या परिच्छेदात, त्या देशाच्या सीमा ठरविण्यात आले आहेत ज्यात यहूदी शेवटी वस्ती करतील. सीमांच्या सविस्तर यादीसाठी, पाहा अनुवाद 34. भूमीच्या अभिवचनाशी संबंधित इतर परिच्छेद आहेत अनुवाद 30:3-5 आणि यहेजकेल 20:42-44.

2 शमुवेल 7:10-17 यात, आपण देवाने दावीद राजास केलेले अभिवचन पाहतो. येथे, देवाने दाविदास हे अभिवचन दिले की त्याला संतती होईल, आणि त्या वंशांतून देव एक सनातन राज्य स्थापन करील. हे सहस्त्राब्दिकाळात आणि सदासाठी ख्रिस्ताच्या राज्याचा उल्लेख करते. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की हे अभिवचन अक्षरशः पूर्ण झाले पाहिजे आणि अद्याप घडलेले नाही. काही लोक असा विश्वास धरतील की शलमोनाचे राज्य ह्या भाकिताची शब्दशः परिपूर्ती होती, पण याच्यात एक समस्या आहे. ज्या प्रदेशावर शलमोन राज्य करीत असे तो आज इस्राएलच्या हाती नाही, आणि शलमोन आज इस्राएलवर राज्य करीत नाही. लक्षात ठेवा की देवाने अबं्राहामास अभिवचन दिले होते की त्याच्या संततीस सर्वकाळसाठी भूमी प्राप्त होईल. तसेच, 2 शमुवेल 7 म्हणते की देव एक राजा स्थापन करील जो सदाकाळपर्यंत राज्य करील. शलमोन दाविदास करण्यात आलेल्या ह्या अभिवचनाची परिपूर्ती ठरू शकत नाही. म्हणून, हे अभिवचन अद्याप पूर्ण व्हावयाचे आहे.

आता, हे सर्वकाही लक्षात घेता, प्रकटीकरण 20:1-7 मध्ये जे नमूद करण्यात आलेले आहे त्याचे परीक्षण करा. ह्या परिच्छेदात वारंवार ज्या हजार वर्षांचा उल्लेख करण्यात आला आहे तो पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अक्षरशः 1000-वर्षाच्या राज्याशी संगत आहे. राजासंबंधाने दाविदास करण्यात आलेले अभिवचन अक्षरशः पूर्ण व्हावयास हवे होते आणि अद्याप पूर्ण झालेले नाही हे स्मरण करा. सहस्त्राब्दिपूर्ववाद ह्या परिच्छेदाकडे या दृष्टीने पाहतो की सिंहासनावर ख्रिस्ताच्या विराजमान होण्याद्वारे भविष्यात ते अभिवचन पूर्ण होईल. देवाने अब्राहाम आणि दावीद या दोघांसोबत विनाअट करार केला. ह्या करारांपैकी कोणताही पूर्णपणे अथवा कायमचा पूर्ण झालेला नाही. हे करार केवळ ख्रिस्ताचे शब्दशः, भौतिक राज्य स्थापन झाल्यावरच पूर्ण होतील जसे देवाने त्याबाबत अभिवचन दिले आहे.

पवित्र शास्त्रास अर्थबोधाची शब्दशः पद्धत लागू करण्याचा परिणाम म्हणून कूटप्रश्नाचे खांडोळे एकत्र जुळुन येतात. जुन्या करारातील येशूच्या प्रथम आगमनाची सर्व भाकिते अक्षरशः पूर्ण झाली होती. म्हणून, आपण अपेक्षा केली पाहिजे की त्याच्या दुसर्या आगमनासंबंधीची भाकिते देखील शब्दशः अथवा अक्षरशः पूर्ण होतील. सहस्त्राब्दिपूर्ववाद एकमेव पद्धत आहे जी देवाच्या करारांच्या आणि शेवटच्या काळाच्या भाकिताच्या अक्षरशः अर्थबोधाशी सहमत आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

सहस्त्राब्दिपूर्ववाद म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.