स्वर्गामध्ये लग्न असेल काय?

प्रश्नः स्वर्गामध्ये लग्न असेल काय? उत्तरः पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, “पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदुतांप्रमाणे असतात” (मत्तय 22:30). एका स्त्रीने तिच्या आयुष्यात अनेक लग्न केली असतील तर ती स्वर्गामध्ये कोणाची पत्नी होईल? (मत्तय 22:23-28) या प्रश्नाच्या प्रतिसादात हे येशूचे उत्तर होते. स्पष्टपणे, स्वर्गामध्ये…

प्रश्नः

स्वर्गामध्ये लग्न असेल काय?

उत्तरः

पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की, “पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदुतांप्रमाणे असतात” (मत्तय 22:30). एका स्त्रीने तिच्या आयुष्यात अनेक लग्न केली असतील तर ती स्वर्गामध्ये कोणाची पत्नी होईल? (मत्तय 22:23-28) या प्रश्नाच्या प्रतिसादात हे येशूचे उत्तर होते. स्पष्टपणे, स्वर्गामध्ये लग्न यासारखी गोष्ट नसणार आहे. याचा अर्थ असा नाही की पती आणि पत्नी स्वर्गामध्ये एकमेकांना ओळखणार नाहीत. याचा अर्थ असा सुद्धा नाही की पती आणि पत्नी यांच्यात स्वर्गामध्ये जवळचे नातेसंबंध नसणार आहे. हे काय सूचित करते, असे दिसते, की, पती आणि पत्नी हे स्वर्गामध्ये विवाहित असे नसणार आहेत.

बहुधा, स्वर्गामध्ये लग्न नाही कारण तेथे त्याची गरज भासणार नाही. जेंव्हा देवाने लग्नाची स्थापना केली, तेंव्हा काही विशिष्ठ गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने तसे केले. पहिल्यांदा, त्याने पहिले की आदमला एका सहकाऱ्याची गरज आहे. “मग परमेश्वर देव बोलला, ‘मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन’” (उत्पत्ती 2:18). हव्वा ही आदमच्या एकटेपणाच्या प्रश्नाचे उत्तर होती, त्याचबरोबर त्याला ज्या एका “मदतनीस” ची गरज होती, जी त्याच्याबरोबर त्याची सहकारी म्हणून येईल आणि आयुष्यभर त्याच्याबरोबर राहील अशी ती होती. तथापि, स्वर्गामध्ये, एकटेपणा नसेल, तसेच तेथे कोणत्याही मदतनीसची गरज भासणार नाही. आपण सर्वजन विश्वासणाऱ्यांच्या आणि देवदूतांच्या जमावाने वेढलेले असू (प्रकटीकरण 7:9), आणि आपल्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील, ज्यामध्ये मदतनीसच्या गरजेचा देखील समावेश असेल.

दुसरे, देवाने उत्पत्तीचे साधन म्हणून आणि पृथ्वीला मनुष्यांनी भरून टाकण्यासाठी लग्नाची निर्मिती केली. तथापि, स्वर्गाला, उत्पत्तीने वसविले जाणार नाही. जे कोणी स्वर्गामध्ये जातील ते तेथे येशू ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासाने जातील; तेथे त्यांना पुनरुत्पादनाच्या साधनाने निर्माण केले जाणार नाही. म्हणून, स्वर्गामध्ये उत्पत्ती किंवा एकटेपणा नाही त्यामुळे तेथे लग्नाचे कोणतेही प्रयोजन नाही.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

स्वर्गामध्ये लग्न असेल काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.