क्या बाइबल प्रेषितों की मृत्यु के विषय मंे लिखती है? प्रत्येक प्रेषित की मृत्यु कैसे हुई?

प्रश्नः क्या बाइबल प्रेषितों की मृत्यु के विषय मंे लिखती है? प्रत्येक प्रेषित की मृत्यु कैसे हुई? उत्तरः एकुलता एक प्रेषित ज्याच्या मृत्यूविषयी बायबलमध्ये लिहिलेले आहे तो आहे याकोब (प्रेषितांची कृत्ये 12:2). राजा हेरोद याने याकोबाचा “तलवारीने वध केला,” शक्य तो शिरोच्छेदाचा हा उल्लेख आहे. इतर प्रेषितांच्या मृत्यूंच्या परिस्थितींविषयी मंडळीच्या परंपरेद्वारे कळविले जाते, म्हणून आपण…

प्रश्नः

क्या बाइबल प्रेषितों की मृत्यु के विषय मंे लिखती है? प्रत्येक प्रेषित की मृत्यु कैसे हुई?

उत्तरः

एकुलता एक प्रेषित ज्याच्या मृत्यूविषयी बायबलमध्ये लिहिलेले आहे तो आहे याकोब (प्रेषितांची कृत्ये 12:2). राजा हेरोद याने याकोबाचा “तलवारीने वध केला,” शक्य तो शिरोच्छेदाचा हा उल्लेख आहे. इतर प्रेषितांच्या मृत्यूंच्या परिस्थितींविषयी मंडळीच्या परंपरेद्वारे कळविले जाते, म्हणून आपण इतर वर्णनांस फारसे महत्व देता कामा नये. प्रेषितांच्या मृत्यूसंबंधाने अत्यंत सामान्यपणे मान्य अशी मंडळीची परंपरा ही आहे की प्रेषित पेत्रास येशूच्या भविष्यवाणीची परिपूर्णता म्हणून रोममध्ये एक्स आकाराच्या वधस्तंभावर उलटे लटकवून मारण्यात आले होते (योहान 21:18). इतर प्रेषितांच्या मृत्यंूसंबंधाने खाली काही अत्यंत लोकप्रिय “परंपरा” दिलेल्या आहेतः

मत्तयास इथियोपिया येथे हौतात्म्य आले, तलवारीच्या वाराने त्याचा वध झाला. योहानास रोममधील छळाच्या लहरीत उकळत्या तेलाच्या मोठ्या पात्रात उकळण्यात आले. तथापि, तो अद्भुतरित्या मृत्यूपासून बचावला. त्यानंतर योहानास पात्म बेटावरील तुरंगातील खाणीत शिक्षा म्हणून पाठविण्यात आले. त्याने पात्म बेटावर प्रकटीकरणाचे भविष्यात्मक पुस्तक लिहिले. नंतर प्रेषित योहानास सोडून देण्यात आले आणि तो आधुनिक काळातील तुर्कस्थानास परतला. तो वृद्धपणात मेला, शांतीने मरणारा हाच काय तो एकमेव प्रेषित होता.

येशूचा भाऊ याकोब (अधिकृतरित्या प्रेषित नाही), यरूशलेमेतील मंडळीचा पुढारी होता. जेव्हा त्याने ख्रिस्तामधील त्याच्या विश्वासाचा अव्हेर करावयास नाकार दिला तेव्हा त्याला मंदिराच्या दक्षिणपूर्व कळसावरून (शंभर फीट खाली) फेकून देण्यात आले. जेव्हा त्यांना कळून आले की तो त्यातून बचावला आहे, तेव्हा याकोबाच्या शत्रूंनी त्याला गदेने मरेपर्यंत मारले. हा तोच कळस समजला जातो जेव्हा सैतान येशूला त्याच्या परीक्षेच्या वेळी घेऊन गेला होता.

बर्थलमय, याला नथनयेल म्हणूनही ओळखले जाते, आशियाचा मिशनरी होता. त्याने आधुनिक तुर्कस्थानास साक्ष दिली आणि अर्मेनिया येथे सुवार्ता गाजवित असतांना त्याला हौतात्म्य आले, त्याला मरेपर्यंत चाबकाने मारण्यात आले. अन्द्रियास याला ग्रीसमध्ये एक्स आकाराच्या वधस्तंभावर खिळण्यात आले. सात शिपायांद्वारे भयंकर चाबूक मारण्यात आल्यानंतर, त्यांनी त्याच्या वेदना वाढविण्यासाठी त्याचे शरीर दोरांनी वधस्तंभावर बांधून ठेविले होते. त्याच्या अनुयायांनी सांगितले की जेव्हा त्याला वधस्तंभाकडे नेले जात होते, तेव्हा अंद्रियाने ह्या शब्दांत अभिवादन केले: “मी अनेक दिवसांपासून ह्या सुखद घटकेची अपेक्षा करीत होतो. वधस्तंभ हा ख्रिस्ताचा देह त्यावर लटकण्यामुळे पवित्र झाला आहे.” मरेपर्यंत तो दोन दिवसपर्यंत आपल्या छळ करणार्यांस सुवार्ता सांगत राहिला. प्रेषित थोमा याला मंडळीची स्थापना करण्यासाठी मिशनरी प्रवासास जात असतांना भारतात भाला भोसकून मारण्यात आले. विश्वासघात करणारा यहूदा इस्कर्योत याची जागा घेण्यासाठी निवडलेला प्रेषित, मत्यिया, याला दगडमार करण्यात आला व नंतर त्याचे डोके उडविण्यात आले. प्रेषित पौलाचा छळ झाला आणि नंतर सन 67 मध्ये रोम येथील दुष्ट सम्राट नीरो याने त्याच्या सिरोच्छेद केला. इतर प्रेषितांसंबंधाने सुद्धा परंपरा आहेत, पण त्यांस विश्वसनीय ऐतिहासिक अथवा परंपरेचे समर्थन नाही.

प्रेषितांस कसे मरण आले हे महत्वाचे नाही. महत्वाची ही गोष्ट आहे की ते सर्व जण त्यांच्या विश्वासासाठी मरावयास तयार होते. जर येशूचे पुनरुत्थान झाले नसते, तर शिष्यांस ते कळले असते. जी गोष्ट खोटी आहे म्हणून लोक जाणतात त्यासाठी ते मरणार नाहीत. सर्व प्रेषित ख्रिस्तामधील त्यांच्या विश्वासाचा अव्हेर करावयास नाकार देऊन, भयंकर मृत्यूने मरावयास इच्छुक होते, हे तथ्य या गोष्टीचा प्रबळ पुरावा आहे की त्यांनी खरोखर येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष दिली होती.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

क्या बाइबल प्रेषितों की मृत्यु के विषय मंे लिखती है? प्रत्येक प्रेषित की मृत्यु कैसे हुई?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.