ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन म्हणजे काय?

प्रश्नः ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन म्हणजे काय? उत्तरः “विश्वदृष्टिकोन” एका विशिष्ट दृष्टिकोनातून जगाच्या सर्वसमावेशक संकल्पनेचा उल्लेख करतो. तर, “ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन,” ही ख्रिस्ती दृष्टिकोनातून जगाची सर्वसमावेशक संकल्पना आहे. वैय्यक्तिक विश्वदृष्टिकोन त्याचे “मोठे चित्र” आहे, जगाविषयीच्या त्याच्या सर्व विश्वासमतांचा समन्वय. सत्यास समजण्याची ही त्याची पद्धत आहे. व्यक्तीचा विश्वदृष्टिकोन रोजचे निर्णय घेण्याचा आधार आहे आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण आहे. मेजावर…

प्रश्नः

ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन म्हणजे काय?

उत्तरः

“विश्वदृष्टिकोन” एका विशिष्ट दृष्टिकोनातून जगाच्या सर्वसमावेशक संकल्पनेचा उल्लेख करतो. तर, “ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन,” ही ख्रिस्ती दृष्टिकोनातून जगाची सर्वसमावेशक संकल्पना आहे. वैय्यक्तिक विश्वदृष्टिकोन त्याचे “मोठे चित्र” आहे, जगाविषयीच्या त्याच्या सर्व विश्वासमतांचा समन्वय. सत्यास समजण्याची ही त्याची पद्धत आहे. व्यक्तीचा विश्वदृष्टिकोन रोजचे निर्णय घेण्याचा आधार आहे आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण आहे.

मेजावर ठेवलेले सफरचंद अनेक लोकांस दिसते. वनस्पतीशास्त्रज्ञ सफरचंदाकडे पाहून त्याचे वर्गीकरण करतो. कलाकार त्याचे स्थिर-चित्र पाहतो आणि त्याचे चित्र काढतो. वाणी त्यात ठेवा आणि मालसाठा पाहतो. मूल दुपारचे जेवण पाहतो आणि ते खाऊन टाकतो. आम्ही एकंदर जगाकडे कसे पाहतो त्याचा प्रभाव एखाद्या परिस्थितीकडे कसे पाहतो त्यावर पडतो. प्रत्येक विश्वदृष्टिकोन, ख्रिस्ती आणि गैर-ख्रिस्ती, कमीत कमी ह्या तीन प्रश्नांस देत असतो:

1) आम्ही कोठून आलो? (आणि आम्ही येथे का आहोत?)

2) जगाचे काय चुकले आहे?

3) आम्ही ते कसे ठीक करू शकतो?

आज प्रचलित विश्वदृष्टिकोन आहे निसर्गवाद, जो ह्याप्रकारच्या तीन प्रश्नांची उत्तरे देतो: 1) आम्ही निसर्गाच्या अनियत क्रियेची निर्मिती आहोत आणि आमचा कुठलाही वास्तविक हेतू नाही. 2) आम्ही जसा राखावा तसा निसर्गाचा मान राखत नाही. 3) आम्ही पर्यावरणशास्त्र आणि संवर्धन याद्वारे जगाचे रक्षण करतो. निसर्गवादी विश्व दृष्टिकोन अनेक संबंधित तत्वज्ञानांस जन्म देतो जसे नैतिक सापेक्षतावाद म्हणजे मारल रिलेटिविजम, अस्तित्ववाद, फळवाद, आणि अस्थितादर्शवाद अर्थात यूटोपियावाद.

दुसरीकडे, ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन, त्या तीन प्रश्नांची उत्तरे बायबलच्या आधारे देतो: आम्ही देवाची उत्पत्ती आहोत, जगावर राज्य करण्यासाठी आणि त्याच्याशी सहभागित्व करण्यासाठी आम्ही रचलो गेलो (उत्पत्ती 1:27-28; 2:15). 2) आम्ही देवाविरुद्ध पाप केले आणि संपूर्ण जग श्रापाधीन झाले (उत्पत्ती 3). 3) स्वतः देवाने त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या बलिदानाद्वारे जगास मुक्त केले आहे (उत्पत्ती 3:15; लूक 19:10), आणि एक दिवस सृष्टीस तिच्या सिद्ध पूर्वस्थितीत आणील (यशया 65:17-25). ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन आम्हास नैतिक नियम, चमत्कार, मानव प्रतिष्ठा, आणि मुक्तीची शक्यता यावर विश्वास करण्यास प्रेरित करतो.

हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की विश्वदृष्टिकोन हा सर्वसमावेशक आहे. तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रास प्रभावित करतो, पैश्यापासून तो नैतिकतेपर्यंत, राजकारणापासून तो कलेपर्यंत. खरे ख्रिस्तीत्व हे मंडळीत उपयोग करता येणार्या कल्पनांपेक्षा अधिक आहे. बायबलमध्ये शिकविण्यात आलेले ख्रिस्ती जीवन स्वतः विश्वदृष्टिकोन आहे. बायबल कधीही “धार्मिक” आणि “ऐहिक” जीवनात तफावत करीत नाही; ख्रिस्ती जीवन हेच एकमात्र जीवन आहे. येशूने स्वतः, “मार्ग, सत्य, व जीवन” असल्याची घोषणा केली (योहान 14:6) आणि, असे करतांना, आमचा विश्वदृष्टिकोन बनला.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

ख्रिस्ती विश्वदृष्टिकोन म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.