प्रणालीबद्ध धर्मविज्ञान म्हणजे काय?

प्रश्नः प्रणालीबद्ध धर्मविज्ञान म्हणजे काय? उत्तरः “प्रणालीबद्ध” एखाद्या अशा गोष्टीचा उल्लेख करते ज्यास प्रणालीत टाकण्यात आले आहे. म्हणून, प्रणालीबद्ध धर्मविज्ञान हा धर्मविज्ञानाचा असा विभाग आहे जो प्रणालींत आहे जी त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे स्पष्टीकरण करते. उदाहरणार्थ, बायबलची अनेक पुस्तके स्वर्गदूतांविषयी माहिती देतात. कोणतेही एक पुस्तक स्वर्गदूतांविषयी संपूर्ण माहिती देत नाही. पद्धतशीर धर्मविज्ञान बायबलच्या सर्व पुस्तकांतून सर्व…

प्रश्नः

प्रणालीबद्ध धर्मविज्ञान म्हणजे काय?

उत्तरः

“प्रणालीबद्ध” एखाद्या अशा गोष्टीचा उल्लेख करते ज्यास प्रणालीत टाकण्यात आले आहे. म्हणून, प्रणालीबद्ध धर्मविज्ञान हा धर्मविज्ञानाचा असा विभाग आहे जो प्रणालींत आहे जी त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे स्पष्टीकरण करते. उदाहरणार्थ, बायबलची अनेक पुस्तके स्वर्गदूतांविषयी माहिती देतात. कोणतेही एक पुस्तक स्वर्गदूतांविषयी संपूर्ण माहिती देत नाही. पद्धतशीर धर्मविज्ञान बायबलच्या सर्व पुस्तकांतून सर्व माहिती घेते आणि त्यास एका प्रणालीत संघटित करते ज्यास दूतविज्ञान म्हणतात. प्रणालीबद्ध धर्मविज्ञान हेच आहे — बायबलच्या शिकवणींस स्पष्ट प्रवर्गीय क्रमांत संघटित करणे.

तर्कसंगत धर्मविज्ञान अथवा पितृविज्ञान देवपित्याचा अभ्यास आहे. ख्रिस्तविज्ञान देवपुत्राचे, प्रभु येशू ख्रिस्ताचे अध्ययन आहे. न्यूमॅटालाजी हे देव पवित्र आत्म्याचे अध्ययन आहे. बिब्लिओलाजी हा बायबलचा अभ्यास आहे. तारणशास्त्र किंवा सोटेरियालाजी हे तारणाचे अध्ययन आहे. इक्लेझियालाजी म्हणजे मंडळीशास्त्र हा मंडळीचा किंवा चर्चचा अभ्यास आहे. एस्कॅटोलाजी हा शेवटच्या काळांचा अभ्यास आहे. एन्जेलोलाजी हा स्वर्गदूतांचा अभ्यास होय. ख्रिश्चन डिमनालाजी हा ख्रिस्ती दृष्टिकोनातून दुरात्म्यांचा अभ्यास आहे. ख्रिस्ती मानववंशशास्त्र हा ख्रिस्ती दृष्टिकोनातून मानवजातीचा अभ्यास होय. हॅमर्टियालाजी म्हणजे पापाचा अभ्यास. प्रणालीबद्ध किंवा क्रमबद्ध धर्मविज्ञान बायबल समजण्यात व सुनियोजित पद्धतीने बायबल शिकविण्यात आमची मदत करणारे महत्वाचे साधन होय.

प्रणालीबद्ध धर्मविज्ञानाशिवाय, धर्मविज्ञानाचे विभाजन करण्याच्या इतर पद्धती आहेत. बायबल आधारित धर्मविज्ञान बायबलच्या एका विशिष्ट पुस्तकाचा (अथवा पुस्तकांचा) अभ्यास आहे आणि ते धर्मविज्ञानाच्या वेगवेगळ्या पद्धतींवर जोर देते. उदाहरणार्थ, योहानाचे शुभवर्तमान हे अत्यंत ख्रिस्तकेंद्रित आहे कारण ते ख्रिस्ताच्या दैवीय गुणावर इतके अधिक लक्ष देते (योहान 1:1, 14; 8:58; 10:30; 20:28). ऐतिहासिक धर्मविज्ञान हा सिद्धांतांचा आणि ख्रिस्ती मंडळीच्या शतकांत त्यांचा कसा विकास झाला याचा अभ्यास आहे. कट्टर धर्मविज्ञान हा काही विशिष्ट ख्रिस्ती गटांच्या सिद्धांतांचा अभ्यास होय ज्यांनी सिद्धांतास क्रमबद्ध केले — उदाहरणार्थ, कॅल्विनवादी धर्मविज्ञान आणि युगवादी धर्मविज्ञान. समकालीन धर्मविज्ञान अशा सिद्धांतांचा अभ्यास आहे ज्यांच्या अलीकडील काळात विकास अथवा उदय झाला. धर्मविज्ञानाच्या कोणत्या पद्धतीचा अभ्यास केला जातो याचे महत्व नाही, महत्वाचे हे आहे की धर्मविज्ञानाचा अभ्यास केला जात आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

प्रणालीबद्ध धर्मविज्ञान म्हणजे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.