देवाने आपले निवडलेले लोक म्हणून इस्राएलची निवड का केली?

प्रश्नः देवाने आपले निवडलेले लोक म्हणून इस्राएलची निवड का केली? उत्तरः इसा्रएल राष्ट्राविषयी बोलतांना, देव अनुवाद 7:7-9 या वचनांत आम्हास सांगतो, “परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता; पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहांतून, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या…

प्रश्नः

देवाने आपले निवडलेले लोक म्हणून इस्राएलची निवड का केली?

उत्तरः

इसा्रएल राष्ट्राविषयी बोलतांना, देव अनुवाद 7:7-9 या वचनांत आम्हास सांगतो, “परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे; उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता; पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहांतून, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातांतून सोडवून बाहेर आणिले ह्याचे कारण हेच की, तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. तेव्हा हे लक्षात घे की, तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करितात व त्याच्या आज्ञा पाळितात त्यांच्या हजारो पीढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो.”

देवाने इस्राएल राष्ट्राची निवड त्याचे लोक म्हणून केली ज्यांच्याद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्म होणा होता — पाप आणि मृत्यू यापासून तारणारा (योहान 3:16). आदाम आणि हव्वा पापात पडल्यानंतर देवाने प्रथम मसीहाचे अभिवचन दिले (उत्पत्ति अध्याय 3). नंतर देवाने या गोष्टीची पुष्टी केली की ख्रिस्त अथवा मशीहा अब्राहाम, इसहाक आणि याकोबाच्या वंशातून येईल (उत्पत्ति 12:1-3). देवाने आपले विशेष लोक होण्यासाठी इस्राएलास का निवडले याचे अंतिम कारण येशू ख्रिस्त हा आहे. देवाला निवडलेला लोकांची गरज नव्हती, पण त्याने ते त्या पद्धतीने करण्याचे ठरविले. येशूला कुठल्या तरी राष्ट्रातील लोकांतून यावयाचे होते, आणि त्याने इस्राएलाची निवड केली.

तथापि, इस्राएल राष्ट्राची निवड करण्याचे देवाचे एकमेव कारण ख्रिस्तास उत्पन्न करण्याचा हेतू नव्हते. इस्राएलसाठी देवाची इच्छा ही होती की त्यांनी जाऊन इतरांस त्याच्याविषयी शिकवावे. इस्राएलास याजकांचे, संदेष्ट्यांचे, जगाप्रत मिशनरींचे राष्ट्र व्हावयाचे होते. इस्राएलसाठी देवाचा हेतू हा होता की त्यांनी विशिष्ट लोक बनावे, असे राष्ट्र बनावे जे इतरांस देवाकडे आणि तारणारा, ख्रिस्त, त्राता म्हणून असलेल्या त्याच्या कराराच्या तरतूदीकडे मार्गदर्शन करावे. बहुतांशी, इस्राएल ह्या कार्यात अपयशी ठरले. तथापि, इस्राएलसाठी देवाचा अंतिम हेतू — ख्रिस्ताला जगात आणण्याचा — येशू खिस्ताच्या व्यक्तिमत्वात सिद्धरित्या पूर्ण झाला.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

देवाने आपले निवडलेले लोक म्हणून इस्राएलची निवड का केली?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.