निखालस सत्य /सार्वत्रिक सत्य अशी गोष्ट आहे काय?

प्रश्नः निखालस सत्य /सार्वत्रिक सत्य अशी गोष्ट आहे काय? उत्तरः निखालस अथवा सार्वत्रिक सत्य समजण्यासाठी, आपण सत्याची व्याख्या करण्याद्वारे सुरूवात केली पाहिजे. शब्दकोशानुसार, सत्य म्हणजे, “तथ्य अथवा वास्तविकतेशी अनुरूपता; असे विधान जे सत्य सिद्ध झाले आहे.” काही लोक म्हणतील की पूर्ण वास्तविकतेसारखी गोष्ट नाही, केवळ बोध आणि मते आहेत. इतर लोक हा वाद घलतील की…

प्रश्नः

निखालस सत्य /सार्वत्रिक सत्य अशी गोष्ट आहे काय?

उत्तरः

निखालस अथवा सार्वत्रिक सत्य समजण्यासाठी, आपण सत्याची व्याख्या करण्याद्वारे सुरूवात केली पाहिजे. शब्दकोशानुसार, सत्य म्हणजे, “तथ्य अथवा वास्तविकतेशी अनुरूपता; असे विधान जे सत्य सिद्ध झाले आहे.” काही लोक म्हणतील की पूर्ण वास्तविकतेसारखी गोष्ट नाही, केवळ बोध आणि मते आहेत. इतर लोक हा वाद घलतील की कुठली तरी निव्वळ वास्तविकता अथवा सत्य असले पाहिजे.

एक दृष्टिकोन असे म्हणतो की सत्याची व्याख्या करणारी तत्वे अथवा मूल्ये नाहीत. ह्या मताचे पालन करणारे लोग असा विश्वास धरतात की प्रत्येक गोष्टी ही आणखी कुठल्या गोष्टीशी सापेक्ष आहे, आणि अशाप्रकारे कुठलेही वास्तविक सत्य असू शकत नाही. यामुळे, शेवटी कुठलीच नैतिक मूल्ये नाहीत, एखादे कृत्य सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी कुठलाच नैतिक सिद्धांत नाही, कुठलाच अधिकार नाही हे मत “पारीस्थितीक सदाचाराकडे” नेते, हा विश्वास की जे योग्य किंवा अयोग्य आहे ते परीस्थितीस सापेक्ष आहे. काहीही योग्य किंवा अयोग्य नाही, म्हणून त्या वेळी आणि त्या परिस्थितीत जे योग्य वाटते अथवा दिसते ते योग्य आहे. अथात, पारीस्थितिक सदाचार आत्मनिष्ठ, “जे काही चांगले वाटते” त्या मानसिकतेकडे आणि जीवनशैलीकडे प्रवृत्त होतो. हा उत्तर-आधुनिकतावाद आहे, अशा समाजाची निर्मिती जी सर्व मूल्यांस, विश्वासमतांस, जीवनशैलींस, आणि सत्याचा प्रतिपादनास समान रूपात यथार्थ मानतो.

इतर मते ही आहेत की तेथे काही पूर्ण वास्तविकता आणि मापदंड आहेत जे ही व्याख्या करतात की खरे काय आहे आणि काय नाही. म्हणून, त्या निव्वळ मापदंडांनुसार ही कृत्ये कशी ठरतात यानुसार ती कृत्ये योग्य आहेत अथवा अयोग्य हे ठरविता येऊ शकते. जर सर्वमान्य सिद्धांत नसतील, वास्तविकता नसेल, तर गोंधळ उत्पन्न होईल. उदाहरणार्थ, गुरूत्वाकर्षणाचा नियम घ्या. जर तो सर्वमान्य सिद्धांत नसता, तर जोवर आम्ही हलण्याचा निर्णय घेतला नसता, तोवर आम्हाला हे निश्चित सांगता आले नसते की आपण एका जागी बसू शकतो किंवा नाही. अथवा जर दोन आणि दोन नेहमीच चार होत नसतील, तर संस्कृतीवर होणारे परिणाम भयंकर झाले असते. विज्ञान आणि भौतिक शास्त्राचे नियम असंबद्ध असते आणि वाणिज्य अशक्य झाले असते. हा केवळ गोंधळा असता! देवाची स्तुती असो, दोन आणि दोन चार होतात. हे पूर्ण सत्य आहे, आणि ते शोधता येते आणि समजून घेता येते.

पूर्ण सत्य नाही असे विधान करणे असंगत आहे. तरीही, आज अनेक लोक सांस्कृतिक सापेक्षतावादाचा स्वीकार करीत आहेत जो कुठल्याही प्रकारच्या पूर्ण सत्याचा नाकार करतो. जे लोक असे म्हणतात की “पूर्ण सत्य नाही” त्यांस विचारता येईल असा उत्तम प्रश्न हा आहे: “आपणास याविषयी पूर्ण खात्री आहे काय?” जर ते “होय” म्हणत असतील, तर त्यांनी एक निखालस विधान केले आहे — जे स्वतः परम सत्याचे अस्तित्व सुचविते. ते म्हणत आहेत की परम सत्य नाही हे तथ्यच एकमेव पूर्ण सत्य आहे.

स्वतःचे खंडन करण्याच्या समस्येशिवाय, इतर अनेक तर्कपूर्ण समस्या आहेत आणि पूर्ण अथवा सार्वत्रिक सत्ये नाहीत असा विश्वास धरण्यासाठी ह्या समस्यांवर विजय मिळविला पाहिजे. एक समस्या ही आहे की सर्व मनुष्यांजवळ मर्यादित ज्ञान आणि मर्यादित बुद्धी आहे आणि, म्हणून ते तार्किकदृष्ट्या पूर्ण नकारात्मक विधाने करू शकत नाहीत. व्यक्ती तार्किकरित्या असे म्हणू शकत नाही, “देव नाही” (जरी अनेक लोक असे करतात), कारण, अशाप्रकारचे विधान करण्यासाठी, त्याला आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण विश्वाचे पूर्ण ज्ञान असणे जरूरी आहे. हे अशक्य आहे म्हणून, कोणीही तार्किकदृष्ट्या जास्तीत जास्त असे म्हणेल, “मजजवळ असलेल्या मर्यादित ज्ञानाने, मी असा विश्वास धरीत नाही की देव आहे.”

पूर्ण सत्याच्या/सार्वत्रिक सत्याच्या नाकाराची दुसरी समस्या ही आहे की आमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीत, आमच्या स्वतःच्या अनुभवांत, आणि आम्ही खर्या जगात जे पाहतो त्यात जे खरे आहे म्हणून आपण जाणतो त्यानुसार जगण्यास ते चुकते. जर पूर्ण सत्य अशा सारखी गोष्ट नसेल, तर शेवटी कोणत्याही गोष्टीविषयी काहीही योग्य किंवा अयोग्य नाही. जे आपणासाठी “योग्य” असेल याचा अर्थ असा नाही की ते माझ्यासाठी “योग्य” असेल. वरकणी पाहता अशाप्रकारचा सापेक्षतावाद आकर्षक दिसतो, त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण जगण्यासाठी आपले स्वतःचे नियम मांडतो आणि जे काही त्याला योग्य वाटते त्यानुसार तो करतो.

अपरिहार्यपणे, एका व्यक्तीचा योग्यतेचा बोध लवकरच इतर व्यक्तीच्या बोधाशी टक्कर देतो. वाहतुकीच्या दिव्यांकडे, ते लाल असतांनाही, दुर्लक्ष करणे माझ्यासाठी “योग्य” असेल तर काय होते? मी अनेक जीवनांस धोक्यात पाडतो. अथवा आपली वस्तु चोरी करणे मला योग्य वाटत असेल, आणि आपणास वाटत असेल की ते योग्य नाही. स्पष्टपणे, योग्य व अयोग्य यांचे आमचे मापदंड परस्परविरोधी आहेत. जर पूर्ण सत्य नसेल, तर योग्य आणि अयोग्य यांच्या कुठल्याही मापदंडास आपण सर्व जबाबदार ठरणार नाही, मग आम्हाला कुठल्याही गोष्टीची खात्री वाटणार नाही. लोक वाटेल ते करावयास स्वतंत्र असतील — खून, बलात्कार, चोरी, लबाडी, ठकविणे, इत्यादी, आणि कोणीही असे म्हणणार नाही की या गोष्टी चुकीच्या आहेत. कुठलेच सरकार नसेल, कुठलेच कायदे नसतील, आणि कुठलाच न्याय नसेल, कारण कोणीही असे म्हणू शकणार नाही की बहुसंख्य लोकांस अल्पसंख्यक लोकांसाठी मानदंड ठरविण्याचा आणि तो लागू करण्याचा अधिकार आहे. परम सत्यावाचून जग अत्यंत भयानक जग असेल ज्याची कल्पनाही करता येत नाही.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता, अशा प्रकारच्या सापेक्षतावादाचा परिणाम धार्मिक गोंधळात होतो, ज्यात एकही खरा धर्म नसतो आणि देवासोबत योग्य नाते स्थापन करण्याचा मार्ग नसतो. सर्वच धर्म म्हणून खोटे सतील कारण ते सर्व मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधाने निव्वळ प्रतिपादन करतात. आज असा विश्वास करणे लोकांसाठी असामान्य नाही की दोन पूर्णपणे विरुद्ध धर्म दोन्ही सारखेच “खरे” असे शकतात, जरी दोन्ही धर्म असे प्रतिपादन करतात की स्वर्गास जाण्याचा तेच एकमेव मार्ग आहेत अथवा दोन पूर्णपणे विपरीत “सत्ये” शिकवितात. जे लोक पूर्ण सत्यावर विश्वास ठेवीत नाहीत ते ह्या प्रतिपादनांकडे दुर्लक्ष करतात आणि आणखी सहिष्णू सार्वत्रिकतावादाचा स्वीकार करतात जो हे शिकवितो की सर्व धर्म समान आहेत आणि सर्व मार्ग स्वर्गाकडे जातात. जे लोक ह्या विश्वदृष्टिकोनाचा स्वीकार करतात ते मोठ्या आवेशाने इव्हेन्जिलिकल खिस्ती लोकांचा विरोध करतात जे बायबलवर विश्वास धरतात जे म्हणते की येशू हाच “मार्ग, सत्य व जीवन” आहे आणि तो सत्याचे अंतिम प्रकटीकरण आहे आणि स्वर्गास नेणारा एकमेव मार्ग आहे (योहान 14:6).

उत्तर-आधुनिक समाजाचा एकमेव मुख्य गुण आहे सहिष्णुता, एक परम सत्य, आणि, आणि म्हणून, असहिष्णुता हाच एकमेव दुर्गुण आहे. कोणत्याही कट्टर विश्वासाकडे — विशेषेकरून पूर्ण सत्यावरील विश्वासाकडे — असहिष्णुता, अंतिम पाप म्हणून पाहिले जाते. जे पूर्ण सत्याचा नाकार करतात ते बहुधा असे म्हणतात की जोवर आपण आपली मते इतरांवर थोपत नाही, तोवर जे आपणास हवे त्यावर विश्वास करणे तोवर चांगले आहे. पण हा दृष्टिकोण स्वतः काय योग्य आणि अयोग्य आहे याविषयीचे मत आहे, आणि जो ह्या मताचे अनुसरण करतात ते निश्चितच इतरांवर ते लादण्याचा प्रयत्न करतात. ते आचरणाचा मापदंड तयार करतात ज्याचे अनुसरण केले जावे असा ते आग्रह करतात, ज्याद्वारे ज्या मताचे पालन करण्याचा दावा ते करतात अगदी त्याचे उल्लंघन करतात — स्वतःचे खंडन करणारे दुसरे मत. जे अशा मताचे पालन करतात ते स्वतःच्या कृत्यांसाठी जबाबदार ठरू इच्छित नाहीत. जर पूर्ण सत्य असेल, तर योग्य आणि अयोग्य गोष्टींचे पूर्ण मापदंड आहेत, आणि आम्ही त्या मापदंडांस जबाबदार आहोत. पूर्ण सत्याचा नाकार करीत असतांना, ह्याच उत्तरदायित्वाचा अथवा जबाबदारीचा लोक खरोखर अव्हेर करीत आहेत.

पूर्ण सत्याचा/सार्वत्रिक सत्याचा नाकार आणि त्याद्वारे येणारा सांस्कृतिक सापेक्षतावाद अशा समाजाचा परिणाम आहे ज्याने उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतास जीवनाचे स्पष्टीकरण म्हणून स्वीकार केले आहे. जर नैसर्गिक उत्क्रांतीवाद खरा आहे तर जीवनास काहीच अर्थ नाही, आम्हाला काहीच हेतू नाही, आणि कुठलेही पूर्ण योग्य अथवा अयोग्य नाही. मग मनुष्य त्याला वाटेल तसे वागावयास स्वतंत्र आहे आणि तो त्याच्या कृत्यांसाठी कोणालाही जबाबदार नाही. तरीही पातकी मनुष्य देवाच्या अस्तित्वाचा आणि पूर्ण सत्याचा कितीही नाकार का करीत असे ना, ते एके दिवशी त्याच्यापुढे न्यायासाठी उभे राहतील. बायबल घोषणा करते की, “कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामथ्र्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरुन ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखूनसुध्दा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्यांचे आभार मानिले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत् झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले” (रोमकरांस पत्र 1:19-22).

पूर्ण सत्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे काय? होय. सर्वप्रथम, मनुष्याची विवेकबुद्धी, आमच्याठायी निश्चित “असे काही” जे आम्हास सांगते की जग असे असले पाहिजे, की काही गोष्टी योग्य आहेत आणि काही गोष्टी अयोग्य आहेत. आमची विवेकबुद्धी आम्हास विश्वास करून देते की यातना, उपासमार, बलात्कार, दुःख आणि वाईट यात काहीतरी चुकीचे आहे, आणि ते आम्हास जाणीव घडवून देते की प्रीती, औदार्य, कळवळा, आणि शांती सकारात्मक गोष्टी आहे ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व समयी सर्व संस्कृतींत सार्वत्रिकरित्या खरे आहे. रोमकरांस पत्र 2:14-16 ह्या वचनांत बायबल मानव विवेकबुद्धीच्या भूमिकेचे वर्णन करते: “कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रांत जे आहे ते स्वभावतः करीत असतात तेव्हा, त्यांना नियमशास्त्र नाही तरी, ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रतील आचार आपल्या अंतःकरणांत लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद्विवेकबुद्धिही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू खिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.”

पूर्ण सत्याच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा विज्ञान आहे. विज्ञान हे केवळ ज्ञानाचे अनुसरण होय, जे आम्हास माहीत आहे त्याचा अभ्यास आणि जे आम्ही आणखी जाणू इच्छितो त्याचा शोध. म्हणून, सर्व शास्त्रीय अथवा वैज्ञानिक अभ्यास ह्या मतावर आधारित असला पाहिजे की ह्या जगात काही वस्तुनिष्ठ सत्ये अस्तित्वात आहेत आणि ह्या सत्यांचा शोध घेता येतो आणि त्यांस सिद्ध करता येते. पूर्ण सत्यावाचून, अभ्यास करावयासाठी काय राहील? विज्ञानाचे शोध खरे आहेत हे आम्हाला कसे कळेल? खरे म्हणजे, विज्ञानाचा नियम पूर्ण सत्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे.

पूर्ण सत्याच्या/सार्वत्रिक सत्याच्या अस्तित्वाचा तिसरा पुरावा धर्म आहे. जगातील सर्व धर्म जीवनास अर्थ व व्याख्या देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा जन्म मात्र अस्तित्वापेक्षा अधिक असे काही प्राप्त करण्याच्या मानवजातीच्या इच्छेतून घडून आला. धर्माच्या माध्यामाने, मनुष्य देवाचा शोध घेतो, भविष्याची, पापांच्या क्षमेची, संघर्षात शांतीची, आणि आमच्या सखोल प्रश्नांत उत्तरांची आशा धरतो. धर्म हा खरोखर ह्या गोष्टीचा पुरावा आहे की मानवजात ही उच्च प्रतीने उत्क्रांत झालेल्या प्राण्यापेक्षा अधिक आहे. ती उच्च हेतूचा आणि वैय्यक्तिक आणि हेतूपूर्ण उत्पन्नकत्र्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे ज्याने मनुष्यात त्याला जाणून घेण्याची इच्छा रोपिली आहे. आणि जर खरोखर एक उत्पन्नकर्ता आहे, तर तो पूर्ण सत्याचा मापदंड ठरतो, आणि त्याचा अधिकार त्या सत्यास प्रमाणित करतो.

सुदैवाने, असा उत्पन्नकर्ता आहे, आणि त्याने आम्हास त्याचे वचन, बायबलद्वारे आपले सत्य प्रकट केले आहे. परम सत्य/सर्वमान्य सत्य हे केवळ अशा व्यक्तीसोबत व्यक्तीगत नात्याद्वारे शक्य आहे जो सत्य असल्याचा दावा करतो — येशू ख्रिस्त. येशूने एकमेव मार्ग, एकमेव सत्य, आणि एकमेप जीवन, व देवाकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन केले (योहान 14:6). परम सत्य आहे की वस्तुस्थिती ह्या सत्याकडे अंगुलीनिर्देश करते की सार्वभौम परमेश्वर आहे ज्याने आकाश व पृथ्वीची उत्पत्ती केली आणि ज्याने स्वतःस आम्हावर प्रकट केले यासाठी की आम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे त्याला व्यक्तिगतरित्या जाणावे. हे परम सत्य होय.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

निखालस सत्य /सार्वत्रिक सत्य अशी गोष्ट आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.