परमेश्वराने सैतानास व दुरात्म्यांस पाप का करू दिले?

प्रश्नः परमेश्वराने सैतानास व दुरात्म्यांस पाप का करू दिले? उत्तरः देवदूत आणि मानव या दोघांनाही, देवाने निवड करण्याची संधी दिली आहे. बायबलमध्ये सैतान आणि त्याच्यासोबत पतन पावलेल्या देवदूतांच्या बंडखोरीविषयी जास्त माहिती दिलेली नसली तरी असे दिसते आहे की सैतान हा बहुधा सर्व देवदूतांपेक्षा थोर होता (यहेज्केल 28:12-18) – त्याने गर्वाने देवाविरुद्ध बंड करण्याचे निवडले स्वतःचा…

प्रश्नः

परमेश्वराने सैतानास व दुरात्म्यांस पाप का करू दिले?

उत्तरः

देवदूत आणि मानव या दोघांनाही, देवाने निवड करण्याची संधी दिली आहे. बायबलमध्ये सैतान आणि त्याच्यासोबत पतन पावलेल्या देवदूतांच्या बंडखोरीविषयी जास्त माहिती दिलेली नसली तरी असे दिसते आहे की सैतान हा बहुधा सर्व देवदूतांपेक्षा थोर होता (यहेज्केल 28:12-18) – त्याने गर्वाने देवाविरुद्ध बंड करण्याचे निवडले स्वतःचा देव होण्यासाठी. सैतानाला (ल्यूसिफर) देवाची उपासना करावयाची नव्हती किंवा आज्ञा पाळायची नव्हती त्याला देव व्हायचे होते (यशया 14:12-14). असे समजले जाते की प्रकटीकरण 12:4 हे सैतानाच्या बंडखोरीच्या वेळी एक तृतीयांश देवदूतांनी सैतानाचे अनुसरण करण्याची निवड केली आणि ते पतीत देवदूत – दुरात्मे बनले.

परंतु, मानवजातीच्या विपरीत, देवदूतांनी सैतानाचे अनुसरण करण्याची किंवा देवाला विश्वासू राहण्याची निवड करणे ही शाश्वत निवड होती. बायबलमध्ये पडलेल्या देवदूतांना पश्चात्ताप करण्याची आणि क्षमा करण्याची कोणतीही संधी उपलब्ध नाही. तसेच बायबलमध्ये असेही सूचित केले जात नाही की आणखी देवदूतांचे पाप करणे शक्य आहे. जे देवदूत परमेश्वरा विश्वासू राहतात त्यांचे वर्णन “निवडलेले देवदूत” (1 तीमथ्य 5:21) असे केले जाते.

सैतान आणि पतीत देवदूत परमेश्वराच्या सर्व वैभवात त्याला ओळखत होते. देवाबद्दल त्यांना सर्वकाही ठाऊक असूनही त्यांचे बंड करणे, अतिशय वाईट होते. याचा परिणाम म्हणून, देव सैतान आणि इतर पतीत देवदूतांना पश्चात्ताप करण्याची संधी देत नाही. शिवाय, देवाने त्यांना संधी दिली असती तरीही ते पश्चात्ताप करतील यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण बायबल देत नाही (1 पेत्र 5:8). परमेश्वराची आज्ञा पाळावी की नाही याविषयी आदाम आणि हव्वेला परमेश्वराने जी संधी दिली होती, तीच संधी त्याने सैतानासुद्धा दिली. देवदूतांना निवडण्याची स्वतंत्र इच्छा होती; देवाने कोणत्याही देवदूतास पाप करण्यास भाग पाडले नाही किंवा प्रोत्साहन दिले नाही. सैतान आणि पतीत देवदूतांनी त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छेने पाप केले आणि म्हणूनच ते अग्नीच्या सरोवरात देवाच्या अनंत क्रोधास पात्र आहेत.

परिणाम काय होणार हे त्याला ठाऊक असतांनाही देवाने देवदूतांना ही निवड का दिली? देवाला माहित होते की एक तृतीयांश देवदूत बंड करतील आणि म्हणून त्यांना सार्वकालिक अग्नीचा दण्ड दिला जाईल. देवाला हे देखील ठाऊक होते की सैतान त्याच्या बंडखोरीस पुढे नेण्यासाठी मानवजातीला पापाच्या मोहात पाडेल. तर मग, देवाने त्यास परवानगी का दिली? बायबल या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे देत नाही.

जवळजवळ कोणत्याही वाईट कृतीबद्दलही असेच विचारले जाऊ शकते. देव परवानगी का देतो? शेवटी, हे त्याच्या निर्मितीवरील देवाच्या सार्वभौमतेकडे परत येते. स्तोत्रकर्ता आपल्याला सांगतो, “देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे” (स्तोत्र 18:30). जर देवाचे मार्ग “परिपूर्ण” आहेत तर आपण हा विश्वास ठेवू शकतो की तो जे काही करतो व जे काही करण्याची तो अनुमती देतो ते देखील परिपूर्ण आहेत. तर आपल्या परिपूर्ण देवाची परिपूर्ण योजना होती पापांना परवानगी देणे. यशया 55:8 मध्ये तो आपल्याला आठवण करून देतो, आमच्या कल्पना देवाच्या कल्पना नाहीत, आमचे मार्ग देवाचे मार्ग नाहीत.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

परमेश्वराने सैतानास व दुरात्म्यांस पाप का करू दिले?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.