प्रभूचा दूत कोण आहे?

प्रश्नः प्रभूचा दूत कोण आहे? उत्तरः “प्रभूच्या दूताची” नेमकी ओळख बायबलमध्ये दिलेली नाही. तथापि, त्याच्या ओळखीचे बरेच महत्त्वपूर्ण “संकेत” आहेत. “प्रभूचे दूत,” “प्रभूचा एक दूत” आणि “प्रभूचा दूत” यांचा जुन्या आणि नवीन करारात उल्लेख आहे. इंग्रजीत जेव्हा “द“ ह्या निश्चित आर्टिकलचा उपयोग केला जातो तेव्हा तो इतर देवदूतांपेक्षा वेगळा असा उल्लेख करतो, एका अद्वितीय व्यक्तीचा….

प्रश्नः

प्रभूचा दूत कोण आहे?

उत्तरः

“प्रभूच्या दूताची” नेमकी ओळख बायबलमध्ये दिलेली नाही. तथापि, त्याच्या ओळखीचे बरेच महत्त्वपूर्ण “संकेत” आहेत. “प्रभूचे दूत,” “प्रभूचा एक दूत” आणि “प्रभूचा दूत” यांचा जुन्या आणि नवीन करारात उल्लेख आहे. इंग्रजीत जेव्हा “द“ ह्या निश्चित आर्टिकलचा उपयोग केला जातो तेव्हा तो इतर देवदूतांपेक्षा वेगळा असा उल्लेख करतो, एका अद्वितीय व्यक्तीचा. प्रभूचा दूत देवासमान बोलतो, तो स्वतःला देवाबरोबर दाखवतो आणि देवाच्या जबाबदार्‍या पूर्ण करतो (उत्पत्ति 16:7-12; 21:17-18; 22:11-18; निर्गम 3:2; शास्ते 2:1- 4; 5:23; 6:11-24; 13:3-22; 2 शमुवेल 24:16; जखर्‍या 1:12; 3:1; 12:8). यापैकी कित्येक दर्शनांमध्ये, ज्यांनी प्रभूच्या दूताला पाहिले त्या सर्वांना मृत्यूची भीती वाटली कारण त्यांनी “प्रभूला पाहिले आहे.” म्हणूनच, हे स्पष्ट आहे की कमीतकमी काही घटनांमध्ये, प्रभूचा दूत एक साक्षात्कार आहे, जो भौतिक स्वरूपात देवाचे दर्शन आहे.

ख्रिस्ताच्या देहधारणानंतर प्रभूच्या दूताचे दर्शन थांबले. नवीन करारामध्ये देवदूतांचा उल्लेख अनेकदा करण्यात आला आहे परंतु ख्रिस्ताच्या जन्मानंतर नवीन करारामध्ये “प्रभूचा दूत” असा उल्लेख कधीच केलेला नाही. मत्ती 28:2 विषयी काही गोंधळ आहे, जेथे केजेव्ही बायबल संस्करण म्हणते की “प्रभूचा दूत” स्वर्गातून खाली आला आणि त्याने येशूच्या कबरेवरून दगड बाजूला केला. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मूळ ग्रीक भाषेत देवदूतासमोर आर्टिकल नाही; ते इंग्रजीत “द एन्जल” किंवा “अॅन एन्जल” असू शकते, पण हा आर्टिकल भाषांतरकारांनी पुरविला पाहिजे. केजेव्हीशिवाय इतर भाषांतरे म्हणतात की तो “एक देवदूत” होता, जी उत्तम शब्दरचना आहे.

हे शक्य आहे की प्रभूच्या देवदूताचे दर्शन येशूच्या देहधारणापूर्वी येशूचे प्रकटीकरण होते. येशूने घोषणा केली तो “अब्राहामापूर्वी” अस्तित्त्वात होता (योहान 8:58), म्हणूनच तो जगात सक्रिय व प्रगट होईल हे तर्कसंगत आहे. काहीही असो, प्रभूचा दूत ख्रिस्त (ख्रिस्तोफनी अर्थात ख्रिस्ताचा साक्षात्कार) पूर्व अवतार होता किंवा परमेश्वरपित्याचे दर्शन (थिओफनी किंवा परमेश्वराचा साक्षात्कार) शक्यता ही आहे की “प्रभूचा दूत” ह्या वाक्यप्रचाराचे परमेश्वराच्या भौतिक दर्शनाशी साम्य आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

प्रभूचा दूत कोण आहे?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.