पवित्र शास्त्र कर्माबद्दल काय सांगते?

प्रश्नः पवित्र शास्त्र कर्माबद्दल काय सांगते? उत्तरः कर्मा ही एक देवपरीज्ञान शास्त्रविषयक संकल्पना आहे, जी बौद्ध आणि हिंदू धर्मामध्ये आढळून येते. ही एक अशी कल्पना आहे की आपण आपले जीवन कसे जगातो यावर आपल्या पुनर्जन्मानंतरच्या जीवनाची गुणवत्ता निश्चित होते. या आयुष्यामध्ये तुम्ही निःस्वार्थ, दयाळू आणि पवित्र असाल तर तुम्हाला पुनर्जन्म (नवीन पार्थिव शरीरामध्ये पुनर्जन्म) आनंददायी…

प्रश्नः

पवित्र शास्त्र कर्माबद्दल काय सांगते?

उत्तरः

कर्मा ही एक देवपरीज्ञान शास्त्रविषयक संकल्पना आहे, जी बौद्ध आणि हिंदू धर्मामध्ये आढळून येते. ही एक अशी कल्पना आहे की आपण आपले जीवन कसे जगातो यावर आपल्या पुनर्जन्मानंतरच्या जीवनाची गुणवत्ता निश्चित होते. या आयुष्यामध्ये तुम्ही निःस्वार्थ, दयाळू आणि पवित्र असाल तर तुम्हाला पुनर्जन्म (नवीन पार्थिव शरीरामध्ये पुनर्जन्म) आनंददायी जीवन हे बक्षीस मिळेल. तथापि, तुम्ही स्वार्थी आणि वाइटाचे जीवन जगल्यास, तुम्हास पुनर्जन्मानंतर कमी-आनंददायी जीवनशैली प्राप्त होईल. दुसऱ्या शब्दांमध्ये, तुम्ही या जीवनामध्ये जे पेरता त्याचीच पुढच्या जीवनामध्ये कापणी करता. कर्मा पुनर्जन्माच्या देवपरीज्ञान शास्त्रविषयक विश्वासावर आधारित आहे. पवित्रशास्त्र पुनर्जन्माच्या कल्पनेस नाकारत असल्यामुळे ते कर्माच्या कल्पनेला समर्थन देत नाही.

इब्रीकरांस पत्र 9:27 मध्ये असे म्हटले आहे, “ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे…” पवित्र शास्त्रामधील या वचनामध्ये ख्रिस्ती लोकांसाठी पुनर्जन्म आणि कर्मा अशा दोन महत्त्वाच्या संभाव्यतेस नाकारण्यात आले आहे. प्रथम, असे म्हटले आहे की आपण “एकदाच मरणार असे नमूद करण्यात आले आहे” याचा अर्थ मनुष्य फक्त एकदाच जन्माला येतो आणि एकदाच मरतो. पुनर्जन्माच्या सिद्धांतामध्ये जीवन, मृत्यू आणि पुनर्जन्म यांच्या कोणत्याही अंतहीन चक्राची कल्पना नाही. दुसरे, असे म्हटले आहे की मृत्यूनंतर आपल्याला न्यायाचा सामना करावा लागनार आहे, म्हणजे पुनर्जन्म आणि कर्माप्रमाणेच उत्तम जीवन जगण्याची कोणतीही दुसरी संधी देण्यात येणार नाही. आपणाला आयुष्यामध्ये एकच संधी मिळाली आहे आणि आपण देवाच्या योजनेनुसारच त्यास जगणे आवश्यक आहे. आणि तेवढेच ते आहे.

पवित्र शास्त्रामध्ये कापणी आणि पेरण्याविषयी बरेच काही सांगण्यात आले आहे. ईयोब 4:8 म्हणते, “माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.” स्तोत्रसंहिता 126:5 म्हणते, “जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील.” लूक 12:24 म्हणते, “कावळ्यांचा विचार करा; ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत; त्यांना कणगी नाही व कोठारही नाही; तरी देव त्यांचे पोषण करतो; पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात!” या प्रत्येक घटनांमध्ये, तसेच कापणी व पेरणीच्या इतर सर्व संदर्भामध्ये, आपल्या कृत्यांचे प्रतिफळ मिळविण्याची क्रिया भविष्यातील जीवनामध्ये नव्हे तर या जीवनामध्ये घडते. हा एक आजचा उपक्रम आहे, आणि हे स्पष्ट आहे की आपण कापणी केलेले फळ आपण केलेल्या कृतीसह अनुकूल असेल. या व्यतिरिक्त, आपण या जीवनामध्ये पेरलेल्या पेरणीचा परिणाम आपल्या नंतरच्या जीवनामधील प्रतिफळावर किंवा शिक्षेवर होईल.

ह्या नंतरच्या जीवनाला पृथ्वीवर दुसर्‍या शरीरात पुनर्जन्म किंवा पुनरुत्थान नाही. हे एकतर नरकामधील अनंतकाळचे दुःख आहे (मत्तय 25:46) किंवा येशूबरोबर स्वर्गात अनंतकाळचे जीवन आहे, तो मरण पावला जेणेकरून आपण त्याच्याबरोबर अनंतकाळ जगू शकू. पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. प्रेषित पौलाने गलतीकरांस पत्र 6:8-9, मध्ये लिहिले, “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”

शेवटी, आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की तो येशू ज्याच्या वधस्तंभावरच्या मरणामुळे आपल्याला अनंतकाळचे जीवन प्राप्त झाले आणि त्यामुळे जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला हे अनंतकाळचे जीवन मिळते. इफिसकरांस पत्र 2:8-9 आपल्याला सांगते की, “कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे – कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही.” म्हणूनच, आपण पाहतो की पुनर्जन्म आणि कर्मा ह्या संकल्पना जीवन, मृत्यूबद्दल आणि अनंतकाळच्या जीवनाविषयीची पेरणी आणि कापणी यांची पवित्र शास्त्रामधील शिकवण विसंगत आहे.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

पवित्र शास्त्र कर्माबद्दल काय सांगते?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.