बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?

प्रश्नः बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय? उत्तरः यशया 53:5, ज्याचा संदर्भ पेत्राचे 1 ले पत्र 2:24 यात घेण्यात आला आहे, आरोग्यदानाविषयीचे मुख्य वचन आहे, पण बरेचदा त्याविषयी गैरसमज केला जातो अथवा चुकीच्या जागी ते उपयोग केले जाते. “खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हास…

प्रश्नः

बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?

उत्तरः

यशया 53:5, ज्याचा संदर्भ पेत्राचे 1 ले पत्र 2:24 यात घेण्यात आला आहे, आरोग्यदानाविषयीचे मुख्य वचन आहे, पण बरेचदा त्याविषयी गैरसमज केला जातो अथवा चुकीच्या जागी ते उपयोग केले जाते. “खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हास शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली, आणि त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले.” ज्या शब्दाचे भाषांतर “आरोग्य प्राप्त झाले” असे करण्यात आले आहे त्याचा अर्थ एकतर आध्यात्मिक आरोग्य असू शकतो अथवा भौतिक आरोग्य असू शकतो. तथापि, यशया 53 आणि पेत्राचे 1 ले पत्र 2र्या अध्यायाचा संदर्भ हे स्पष्ट करतो की हे वचन आध्यात्मिक आरोग्याविषयी बोलत आहे. “त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही ‘वाहून’ खांबावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.” (पेत्राचे 1 ले पत्र 2:24). हे वचन पाप आणि नीतिमत्वाविषयी बोलत आहे, आजार आणि रोगाविषयी नाही. म्हणून, ह्या दोन्ही वचनांत “आरोग्य” प्राप्त होणे क्षमा प्राप्त होणे आणि तारण पावणे याविषयी बोलत आहे, भौतिकरित्या आरोग्य प्राप्त करण्याविषयी नाही.

बायबल भौतिक आरोग्याचा संबंध आध्यात्मिक आरोग्याशी विशिष्टरित्या लावत नाही. कधी कधी जेव्हा लोक ख्रिस्ताठायी त्यांचा विश्वास ठेवतात तेव्हा ते भौतिकरित्या बरे होतात, पण असे नेहमी नसते. कधी कधी बरे करणे ही देवाची इच्छा असते, पण कधी कधी नसते. प्रेषित योहान आम्हाला योग्य दृष्टिकोन देतो: “त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल; आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे; म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेहि आपल्याला ठाऊक आहे” (योहानाचे 1 ले पत्र 5:14-15). देव आजही चमत्कार करतो. देव आजही लोकांस बरे करतो. आजार, रोग, यातना, आणि मृत्यू आज जगात खरोखर आहेत. प्रभु येईपर्यंत, आज जिवंत असलेल्या प्रत्येकास, मरण येईल, आणि त्यापैकी बहुसंख्य लोक (यात ख्र्रिस्ती लोकांचाही समावेश आहे) भौतिक समस्याचा (रोग, आजार, अपघात) परिणाम म्हणून मृत्यू पावतील. आम्हास शारीरिकरित्या बरे करणे ही नेहमीच देवाची इच्छा नसते.

शेवटी, आमचे पूर्ण भौतिक आरोग्य स्वर्गात आमची वाट पाहत आहे. स्वर्गात, दुख, रोग, आजार, यातना, अथवा मृत्यू नसेल (प्रकटीकरण 21). आम्हा सर्वांस ह्या जगात आमच्या भौतिक परिस्थितींत कमी तल्लीन होण्याची व आमच्या आध्यात्मिक दशेविषयी अधिक चिंता करण्याची गरज आहे (रोमकरांस पत्र 12:1-2). मग आपण आपली हृदये स्वर्गाकडे लावू शकू जेथे आम्हाला आमच्या भौतिक समस्यांना तोंड देण्याची गरज भासणार नाही. प्रकटीकरण 21:4 खर्या आरोग्यप्राप्तीचे वर्णन करते ज्याची अभिलाषा आम्ही धरली पाहिजे: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हीहि नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.