येशूला इतके दुःख का अनुभव करावे लागले?

प्रश्नः येशूला इतके दुःख का अनुभव करावे लागले? उत्तरः येशूने त्याचा खटला, छळ, आणि वधस्तंभारोहण याद्वारे अतिशय दुःख सहन केले (मत्तय 27; मार्क 15; लूक 23; योहान 19). त्याचे दुःख भौतिक होते: यशया 52:14 घोषित करते, “ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो…

प्रश्नः

येशूला इतके दुःख का अनुभव करावे लागले?

उत्तरः

येशूने त्याचा खटला, छळ, आणि वधस्तंभारोहण याद्वारे अतिशय दुःख सहन केले (मत्तय 27; मार्क 15; लूक 23; योहान 19). त्याचे दुःख भौतिक होते: यशया 52:14 घोषित करते, “ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),” त्याचे दुःख भावनात्मक होते: “त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले” (मत्तय 26:56). त्याचे दुःख आत्मिक होते: “ज्याला पाप ठाऊक नव्हते, त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले” (2 करिंथ. 5:2). येशूवर संपूर्ण जगाचा पापांचा भार होता (1 योहान 2:2). पापामुळे येशूने आक्रोश केला, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला” (मत्तय 27:46). येशूचे क्रूर शारीरिक दुःख यामुळे वाढले होते कारण त्याला आमच्या पापांचा दोष सहन करावा लागला आणि आमचा दंड देण्यासाठी मरावे लागले (रोम. 5:8).

यशयाने येशूच्या दुःखाचे भाकित केले: “तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.“ (यशया 53:3, 5). हा परिच्छेद येशूच्या दुःखाचे कारण सांगतो: “आमच्या अपराधांकरिता,“ आमच्या आरोग्याकरिता, आणि आम्हास शांति देण्यासाठी.

येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की त्याचे दुःख सहन करणे निश्चित होते: “आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”” (लूक 9:22; तुलना करा 17:25). अगत्य या शब्दाकडे लक्ष द्या – त्याला दुःख सहावे लागेल, आणि त्याचा वध करण्यात येईल ख्रिस्ताचे दुःख जगाच्या तारणासाठी देवाची योजना होती.

स्तोत्र 22:14-18 ही वचने ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा काही तपशील देतात: “मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे. माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस. कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत. मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.” ही आणि इतर भाकिते पूर्ण व्हावी म्हणून, येशूला दुःख सहावे लागले.

येशूला इतक्या वाईटप्रकारे दुःख का सहावे लागले? अपराध्यांसाठी निष्पाप व्यक्तीने मरण्याचा सिद्धांत एदेन बागेत निश्चित करण्यात आला होता: आदाम आणि हव्वेला त्यांची लज्जा झाकण्यासाठी प्राण्याच्या कातड्याची वस्त्रे प्राप्त झाली (उत्पत्ति 3:21) – अशाप्रकारे, एदेन बागेत रक्त वाहिले गेले. नंतर, हा सिद्धांत मोशेच्या नियमशास्त्रात मांडण्यात आला: “रक्तानेच प्रायश्घ्चित्त होते.” (लेवी 17:11; तुलना करा इब्री. 9:22). येशूला दुःख सहावे लागले कारण दुःख हा बलिदानाचा एक भाग आहे, आणि येशू “जगाचे पाप वाहून नेणारा देवाचा कोकरा!” होता (योहान 1:29). येशूचा भौतिक छळ आमच्या पापांसाठी आवश्यक किंमतीचा भाग होता. आम्हास “ निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने” मुक्ति मिळाली आहे (1 पेत्र 1:19).

वधस्तंभावर येशूचे दुःख सोसण्याद्वारे पापाचा भयंकर स्वभाव, देवाचा क्रोध, मानवजातीचा क्रूरपणा, आणि सैतानाची घृणा दिसून आली. कलवरीवर, मानवजातीस मुभा देण्यात आली की त्याने मनुष्याच्या पुत्रासोबत सर्वाधिक वाईट व्यवहार करावा कारण तो मानवजातीचा त्राता बनला होता. सैतानाला वाटले असावे की त्याने मोठा विजय मिळविला आहे, पण वधस्तंभाद्वारे मनुष्याचा पुत्र सैतान, पाप, आणि मृत्यूवर विजयी झाला. “आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल” (योहान 12:31; तुलना करा कलस्सै. 2:15).

विश्वास करणाऱ्या सर्वांसाठी येशूने दुःख सोसले व तो मरण पावला. त्याच्या अटकेच्या रात्री, गेथशेमानी बागेत येशू प्रार्थना करीत असतांना, त्याने आपले सर्वस्व या कामासाठी सोपून दिले, ““हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे” (लूक 22:42). दुःखाचा प्याला ख्रिस्ताकडून काढून टाकण्यात आला नाही; त्याने तो आम्हां सर्वांसाठी पिऊन टाकला. तारण प्राप्त करण्याचा आमच्याजवळ दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.

[English]



[मराठीच्या पहिल्या पानावर वापस या]

येशूला इतके दुःख का अनुभव करावे लागले?

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.